पिक कर्ज मागणी अर्ज सुरू २०२२; पीक कर्जासाठी असा करा ऑनलाईन नोंदणी अर्ज – Crop Loan Demand Registration
पिक कर्ज मागणी नोंदणी २०२२ साठी ऑनलाईन अर्ज सुरु झाले आहेत. प्रत्येक जिल्ह्यासाठी एक लक्षांक निश्चित करून कर्ज वाटपासाठी आता सुरवात झालेली आहे. आता प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर पीक कर्ज – २०२२ साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक पर्याय उपलब्ध करून देण्यास सुरुवात केलेली आहे. काही जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर दिसत नसतील तर लवकरच तो पर्याय दिसेल किंवा सर्च टॅब मध्ये पीक कर्ज किंवा Crop Loan असे सर्च करा, पुढे तुम्हाला पीक कर्जासाठी नोंदणी लिंक मिळेल.
पीक कर्ज मागणीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस:
प्रत्येकाने आपल्या जिल्ह्याचं नाव गूगल मध्ये लिहायचं आहे. आणि तुम्हाला डॉट nic.in किंवा gov.in ची वेबसाईट ओपन करायची आहे. मी या ठिकाणी जालना जिल्ह्याच्या संकेतस्थळावर पीक कर्ज मागणीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी गूगल मध्ये जालना लिहिणार आहे.
आता आपण इथे खालील जालना जिल्ह्याचे अधिकृत संकेतस्थळाची लिंक ओपन करणार आहोत.
जालना जिल्ह्याचे अधिकृत संकेतस्थळ ओपन झाल्यावर त्यामध्ये वर सर्व प्रथम आपली मराठी भाषा निवडा. नंतर पुढे “नवीन काय” /नवीन अपडेट या नोटिफिकेशन पर्यायामध्ये “पीक कर्ज मागणी नोंदणीसाठी संकेतस्थळ” या पर्यायावर क्लिक करा किंवा सर्च टॅब मध्ये “पीक कर्ज” / Crop Loanअसे सर्च करा, पुढे तुम्हाला पीक कर्जासाठी नोंदणी लिंक मिळेल. पुढे तपशील पहा वर क्लिक करा.

आता पीक कर्ज मागणी नोंदणीसाठी संकेतस्थळ या लिंक वर क्लिक करा.

पीक कर्ज मागणी नोंदणीसाठी संकेतस्थळ वर क्लिक केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय, जालना, जिल्हा अग्रणी बँक – पिक कर्ज नोंदणीची नवीन पोर्टल ओपन होईल.
यामध्ये नवीन कर्जसाठी येथे क्लिक करा या पर्यायावर वर क्लिक करा आणि अर्जाची सद्यःशिती पाहण्यासाठी त्याच्या खालील लिंक वर क्लिक करा.

आता आपण पीक कर्ज नोंदणी अर्जामध्ये खालील आवश्यक तपशील भरा आणि अर्ज सबमिट करा.
- शेतकऱ्याचे नाव (नाव – मध्यनाव – आडनाव), शेतकऱ्याचे नाव, वडिलांचे / नवऱ्याचे / आईचे नाव, आडनाव
- मोबाईल क्रमांक.
- आधार क्रमांक आणि पॅनकार्ड क्रमांक.
- राज्य व जिल्हा, तालुका निवडा आणि गावाचे नाव निवडा.
- आपल्या गावाशी संलग्न असलेली बँक.
- आपल्या बचत खात्याची माहिती भरा आणि बचत खाते ज्या बँकेत आहे त्याचे तालुका.
- बचत खाते ज्या बँकेत आहे त्याचे नाव आणि बचत खाते बँकेच्या शाखेचे नाव, खाते क्रमांक
- आपल्याला नवीन कर्जासाठी नोंदणी करायची आहे का? किंव्हा आपल्याला सध्याच्या कर्जाचे नुतनीकरण करावयाचे आहे का? त्याबाबत तपशील द्या.
- आपल्या कर्ज खात्याची माहिती भरा, कर्ज खाते ज्या बँकेत आहे त्याचे नाव, शाखेचे नाव, खाते क्रमांक.
- आपल्या शेत जमिनीची माहिती व लागवड केलेल्या पिकाची माहिती भरा. पिकाची माहिती भरल्या नंतर प्लस(+) बटण दाबावे. शेत जमिनीचे एकुण क्षेत्र (एकर मध्ये नमुद करावे), पिकाचे क्षेत्र, लागवड केलेल्या पिकाच्या जमिनीचे सर्वे क्रमांक.

अर्ज सबमिट केल्यांनतर आपल्या अर्जाची यशस्वीरित्या नोंदणी होईल. पुढील कार्यवाहीसाठी संबंधीत बँकेचे प्रतिनिधी आपणास संपर्क करतील किंव्हा आपण बँकेला ७ दिवसांचा आत संपर्क करावा. आपल्या अर्जाची सद्यस्थिती पाहण्यासाठी या संकेतस्थळावरील सद्यस्थिती ऑपशन वापर करावा. या साठी आपला आधार क्रमांक हे आपले लॉगिन आणि आपला मोबाईल नंबर म्हणजे आपला पासवर्ड आहे.
माहितीसाठी दोन जिल्ह्याच्या थेट लिंक देत आहे.
- जालना जिल्हा पीक कर्ज मागणी नोंदणीसाठी संकेतस्थळ
- हिंगोली जिल्हा पीक कर्ज मागणी नोंदणीसाठी संकेतस्थळ
- परभणी जिल्हा पीक कर्ज मागणी नोंदणीसाठी संकेतस्थळ
- लातूर जिल्हा पीक कर्ज मागणी नोंदणीसाठी संकेतस्थळ
- नांदेड जिल्हा पीक कर्ज मागणी नोंदणीसाठी संकेतस्थळ
हेही वाचा – प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) खरीप हंगाम 2022 व रब्बी हंगाम 2022-23
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!