वृत्त विशेषसरकारी कामे

भारत सरकारचे दामिनी अ‍ॅप वीज पडण्यापूर्वी नागरिकांना करणार सावधान !

मान्सून कालावधीत विशेषतः जुन व जुलै या महिन्यात विज पडून जिवीत हानी होत असते. विज पडुन जिवीत हानी होऊ नये या करीता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन पृथ्वी मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांनी “दामिनी (Damini Lightning Alert App)” अँप तयार केले असुन सदरचे ॲप गूगल प्लेस्टोअर वर उपलब्ध आहे. करीता सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून आपले अधिनस्त तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणा, शासकीय अधिकारी/कर्मचारी, नागरिक, क्षेत्रीय तलाठी, अधिकारी/मंडळ अधिकारी, अव्वल कारकुन महसूल सहायक गाव स्तरावरील सरपंच, पोलिस ग्रामसेवक, कृषीसेवक, कोतवाल, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, ग्रामपंचायत डाटा एंन्ट्री ऑपरेटर यांना सदरचे अ‍ॅप डाऊनलोड करुन त्याचा वापर करणेबाबत प्रवृत्त करण्यात यावे तसेच सदरचे अ‍ॅप GPS लोकेशन ने काम करीत असून विज पडण्याच्या १५ मिनिटापुर्वी सदरच्या अ‍ॅपमध्ये स्थिती दर्शविण्यात येते.

आपले अ‍ॅप मध्ये आपले सभोवताल विज पडत असल्यास सदरचे ठिकाणापासुन सुरक्षीत स्थळी जावे तसेच सदर वेळी झाडाचा आश्रय घेऊ नये याबाबतचे त्यांना निर्देश देण्यात यावे. तसेच इतर सामान्य नागरीक यांना हे अ‍ॅप डाऊनलोड करण्यास प्रवृत्त करावे याबाबतचा सूचना आपले स्तरावरुन निर्गमित करण्यात याव्यात तसेच याबाबत आपले स्तरावरुन व्हिडीओ कॉन्फरन्स आयोजित करुन दामीनी अ‍ॅप प्लेस्टोअर डाऊनलोड करणे व वापरणे याबाबत माहीती दयावी व त्याबाबतचा अहवाल या कार्यालयास सादर करावा, अशा सूचना पृथ्वी विज्ञान मंत्रालय भारत सरकारने दिल्या आहेत.

गावातील सर्व स्थानिक शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना सदर अ‍ॅप डाउनलोड करुन त्यामध्ये प्राप्त होणाऱ्या Alert नुसार आवश्यक पूर्वसुचना गावातील सर्व नागरिकांना देऊन होणारी जीवितहानी टाळण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यास कळविण्यात यावे, अशा सूचना पृथ्वी विज्ञान मंत्रालय भारत सरकारने दिल्या आहेत.

दामिनी अ‍ॅप काय आणि कसे काम करते? Damini Lightning Alert App:

पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपीकल मेटरोलॉजी (IITM) ही भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाअंतर्गत येणारी या स्वायत्त संशोधन संस्था आहे. या संस्थेनं 2020 मध्ये ‘दामिनी (Damini Lightning Alert App) लाईटनिंग’ ॲप विकसित केलं आहे. संस्थेनं वीज प्रवण क्षेत्र अचूकरित्या शोधण्यासाठी देशभरात 83 ठिकाणी लाईटनिंग लोकेशन नेटवर्क उभारले आहेत. या नेटवर्कचा सेंट्रल प्रोसेसर हा IITM या संस्थेत आहे. हा प्रोसेसर या नेटवर्ककडून आलेले सिग्नल रिसिव्ह करतो , त्यावर प्रक्रिया करतो आणि मग 500 मीटर पेक्षा कमी अचूकतेसह वीज पडणारं ठिकाण ओळखतो.

हे ॲप संपूर्ण भारतात घडणाऱ्या विजेच्या हालचालींवर लक्ष ठेवत आहे. व्यक्तीच्या जीपीएस लोकेशेनद्वारे तो राहत असलेल्या ठिकाणापासून 20 ते 40 किलोमीटर अंतरावर वीज पडणार की नाही, याची पूर्वसूचना हे ॲप देतं. तुम्ही जर वीज पडणार अशा क्षेत्रात असात तर काय खबरदारी घ्यायची याच्यासुद्धा सूचना या अॅपमध्ये दिल्या आहेत. आता हे ॲप कसं वापरायचं ते जाणून घेऊया.

गडगडाटी वादळ झाल्यास काय करावे हे देखील अ‍ॅप सांगते.

या अ‍ॅपमध्ये बरीच माहितीपूर्ण माहिती खाली दिली आहे. वीज पडल्यास कसे वाचवायचे हे सांगितले आहे. सुरक्षिततेच्या उपायांसोबतच प्रथमोपचाराची माहितीही दिली जाते. वीज पडण्याची घटना मानव आणि गुरांसाठी जीवघेणी आहे. हे थांबवता येत नाही, पण टाळता येते.

विजांच्या स्थितीबाबत जागरुकता असणे अत्यंत गरजेचे आहे. याचा अंदाज दामिनी (Damini Lightning Alert App) अ‍ॅपच्या माध्यमातून वर्तवण्यात आला असून अशा परिस्थितीत लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. म्हणजेच वेळीच सावध राहून जीवित व वित्तहानी टाळता येते.

चेतावणी (Alert) मिळाल्यावर काय करावे?
  1. तुमच्या परिसरात वीज कोसळल्यास दामिनी (Damini Lightning Alert App) अ‍ॅप तुम्हाला आगाऊ चेतावणी देईल.
  2. अशा परिस्थितीत वीज पडू नये म्हणून मोकळ्या मैदानात, झाडांखाली, डोंगराळ भागात, खडकांवर थांबू नका.
  3. धातूची भांडी धुणे टाळा आणि आंघोळ टाळा.
  4. पाऊस टाळा आणि जमिनीवर जिथे पाणी साचते तिथे उभे राहू नका.
  5. छत्री कधीही वापरू नका. इलेक्ट्रिकल हाय-टेन्शन वायर आणि टॉवर्सपासून दूर राहा.
  6. घराच्या आत जा. जर तुम्ही बाहेर कुठे असाल आणि घरी जाणे शक्य नसेल तर कान बंद करून मोकळ्या जागी गुडघ्यावर बसा. धोका संपल्यावर घरी जा.

दामिनी अ‍ॅप डाउनलोड (Damini Lightning Alert App): दामिनी अ‍ॅप (Damini Lightning Alert App) मोबाईल मध्ये डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

पृथ्वी विज्ञान मंत्रालय भारत सरकारचे अधिकृत संकेतस्थळ: https://www.moes.gov.in

संपर्क क्रमांक: 1800220161

दामिनी अ‍ॅप (Damini Lightning Alert App) हे एक तांत्रिकदृष्ट्या अत्यंत प्रभावी व उपयुक्त साधन आहे. वीज कोसळण्याच्या संभाव्य घटनांबाबत नागरिकांना जागरूक करण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित स्थळी जाण्यासाठी वेळ देण्यासाठी हे अ‍ॅप मोलाची भूमिका बजावत आहे. फक्त अ‍ॅप डाऊनलोड करून वापरणेच नव्हे, तर इतरांनाही याच्या वापराबाबत प्रेरित करणे, हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे.

आजच्या हवामान बदलाच्या काळात अशा प्रकारच्या अचूक व तत्पर डिजिटल साधनांचा वापर हाच आपला आत्मनिर्भरतेचा आणि सुरक्षिततेचा खरा मार्ग आहे. म्हणूनच, आपल्या सुरक्षेसाठी दामिनी अ‍ॅप डाउनलोड करा आणि विजेच्या संकटावर सजग रहा!

खालील लेख देखील वाचा !

  1. सचेत प्रणाली- आपत्ती काळातील ‘संदेशदुत’
  2. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना : शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये मदत मिळवण्यासाठी या गोष्टी करा !
  3. नैसर्गिक संकटात शेतीचं नुकसान झालंय? मग पीक विम्याचा दावा करताना या गोष्टी लक्षात ठेवल्यास नुकसान भरपाई मिळू शकते !
  4. नैसर्गिक आपत्ती – शेती पिके नुकसान भरपाई अनुदानाची स्थिती ऑनलाईन चेक करा !
  5. महाराष्ट्र “मुख्यमंत्री सहाय्यता निधी” योजना
  6. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजना
  7. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीसाठी मोबाईल ॲप तथा व्हॉट्सॲप हेल्पलाईन !
  8. आयुष्मान कार्ड ऑनलाईन डाऊनलोड कसे करायचे? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस!
  9. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ योजना : रुग्णांना मिळणार विविध आरोग्य सेवा !
  10. ई-संजीवनी ॲप रुग्णांसाठी संजीवनी!
  11. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत मृत्यू झाल्यास व्यक्तीच्या वारसांना आता मिळणार २५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य !
  12. CGHS लाभार्थी आयडी आयुष्मान भारत हेल्थ आयडीला लिंक करण्याची ऑनलाईन प्रोसेस !
  13. प्रधानमंत्री जन औषधी केंद्रांवर औषधे माफक दरात उपलब्ध !
  14. ई-श्रम यूएएन कार्डसाठी अशी करा ऑनलाईन नोंदणी!
  15. MJPJAY : महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना
  16. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
  17. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
  18. पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना – Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana (PMJJBY)
  19. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आता राज्यातील सर्व कुटुंबांना लागू !
  20. आयुष्मान कार्ड ऑनलाईन डिजिलॉकर मधून डाऊनलोड कसे करायचे? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस!
  21. शासकीय कामे होत नसतील तर ऑनलाईन पद्धतीने तक्रार कशी करायची? जाणून घ्या सविस्तर – (आपले सरकार तक्रार निवारण प्रणाली) Grievances Maharashtra

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.