अन्‍न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागमहाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेषसरकारी योजना

अतिवृष्टी व पूरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना मोफत अन्नधान्य !

अतिवृष्टी व पूरामुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवून निराधार होणाऱ्या कुटुंबांना प्रति कुटुंब १० किलो गहू व १० किलो तांदूळ मोफत पुरविण्यास शासन निर्णयान्वये शासनाने मान्यता दिली आहे. अतिवृष्टी व पूर यांसारख्या आपत्कालीन परिस्थितीत अतिवृष्टी व पूरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना अन्नधान्य कशाप्रकारे वितरीत करावे, अन्नधान्याकरीता आवश्यक असलेला निधी महसूल विभागाकडून कोणत्या दराने प्राप्त करून घ्यावा, याबाबतची कार्यपद्धती सर्व संबंधितांना कळविण्याच्या अनुषंगाने पुढील सूचना देण्यात येत आहेत :-

अतिवृष्टी व पूरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना अन्नधान्य वितरीत करण्याबाबतची कार्यपद्धती शासन परिपत्रक खालील प्रमाणे :-

अतिवृष्टी व पूरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना अन्नधान्य वितरीत करणे व सदर अन्नधान्याची प्रतिपूर्ती केंद्र शासनाकडून करून घेणे, याकरीता पुढीलप्रमाणे कार्यपद्धती अवलंबविण्यात यावीः

१) महसूल व वन विभागाच्या दि. ८.३.२०१९ च्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाल्याचे संबंधित जिल्हाधिकारी यांनी जाहीर करावे. (घोषणापत्र / अधिसूचना निर्गमित करावी).

२) जिल्हा पुरवठा अधिकारी / अन्नधान्य वितरण अधिकारी / उप नियंत्रक यांनी जिल्हास्तरावरील महसूल विभागाकडून अतिवृष्टी/पूरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांची संख्या, त्यांना आवश्यक असणारे गहू व तांदळाचे प्रमाण, बाधित कुटुंबांची यादी, बाधित झालेल्या एकूण व्यक्तींपैकी राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थी (NFSA beneficiaries) व non NFSA लाभार्थ्यांची संख्या, इ. आवश्यक बाबी प्राप्त करून घ्याव्यात.

३) सदर अन्नधान्याचे वाटप जिल्हा पुरवठा अधिकारी / अन्नधान्य वितरण अधिकारी / उप नियंत्रक यांनी त्यांच्याकडे लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिल्लक असलेल्या अन्नधान्यामधून तात्काळ करावे.

४) महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयामध्ये नमूद केल्यानुसार सदर अन्नधान्य आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यानंतर एक आठवड्यात वाटप करावयाचे असल्याने सदर वाटप पूर्ण झाल्यानंतर वाटप केलेल्या अन्नधान्याएवढ्या अन्नधान्याची अतिरिक्त मागणी जिल्हा पुरवठा अधिकारी / अन्नधान्य वितरण अधिकारी / उप नियंत्रक यांनी तात्काळ शासनाकडे करावी,

५) अन्नधान्याची मागणी शासनाकडे करतेवेळी जिल्हाधिकारी यांच्याकडून घोषित करण्यात आलेले घोषणापत्र/अधिसूचना शासनास सादर करावी.

६) सदर अन्नधान्यासाठी आवश्यक असलेला निधी केंद्र शासनाच्या संदर्भाधीन दि.१८.८.२०१७ च्या पत्रामध्ये नमूद केलेल्या दराने (MSP/ MSP derived rate) जिल्हा पुरवठा अधिकारी / अन्नधान्य वितरण अधिकारी / उप नियंत्रक यांनी जिल्हास्तरावरील महसूल विभागाकडून तात्काळ उपलब्ध करून घ्यावा.

७) राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडे सदर अन्नधान्याची मागणी केल्यानंतर व त्या अन्नधान्यास केंद्र शासनाची मंजूरी प्राप्त झाल्यानंतर त्या मंजूरी आदेशांच्या आधारे जिल्हा पुरवठा अधिकारी / अन्नधान्य वितरण अधिकारी / उप नियंत्रक यांनी भारतीय अन्न महामंडळाकडे प्रचलित MSP/MSP derived rate ने रकमा जमा करून अन्नधान्याची उचल करून अतिवृष्टी / पूर परिस्थिती मध्ये वाटप केलेल्या अन्नधान्याचे समायोजन करावे.

८) अतिवृष्टी / पूरग्रस्तांना वाटप केलेल्या अन्नधान्याचा तपशील, महसूल विभागाकडून अन्नधान्याकरीता प्राप्त झालेल्या रकमा, भारतीय अन्न महामंडळाकडे प्रचलित MSP/MSP derived rate ने जमा केलेल्या रकमा, अन्नधान्याचे समायोजन केलेल्या अन्नधान्याचा तपशील, बाधित झालेल्या एकूण व्यक्तींपैकी NFSA व non-NFSA लाभार्थ्यांचा तपशील, जिल्हाधिकारी यांच्याकडून घोषित करण्यात आलेले घोषणापत्र/अधिसूचना याबाबतची माहिती नापु-२२ कार्यासनास तसेच वित्तीय सल्लागार व उपसचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांना तात्काळ कळवावी.

अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग शासन निर्णय: अतिवृष्टी व पूरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना अन्नधान्य वितरीत करण्याबाबतची कार्यपद्धती शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – नैसर्गिक आपत्ती – शेती पिके नुकसान भरपाई अनुदानाची स्थिती ऑनलाईन चेक करा !

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.