महाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेष

राज्यातील लोक कलावंतांच्या पथकांना अनुदान पॅकेज जाहीर

महाराष्ट्र राज्याला सांस्कृतिक कला व परंपरांचा मोठा वारसा लाभला आहे. लोककला हा या पंरपरेचा महत्वपूर्ण भाग आहे. लोककलांचे जतन व संवर्धन करण्यासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या कलापथकांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने विभागाच्या उपर्निर्दिष्ट १ येथील शासन निर्णयान्वये वेशभूषा, वाद्य, रंगभूषा, साहित्य, तंबू साहित्य, वीज, ध्वनी साहित्य व वाहन इत्यादींसाठी भांडवली स्वरुपाच्या खर्चासाठी तसेच कलापथकांना प्रयोगासाठी अनुदान देण्याची योजना सुरु करण्यात आलेली आहे. त्यानुषंगाने, सन २०२२- २३ या आर्थिक वर्षात लोककलावंतांच्या कला पथकांना भांडवली खर्चासाठी व प्रयोगासाठी अनुदान मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

राज्यातील लोक कलावंतांच्या पथकांना अनुदान पॅकेज जाहीर शासन निर्णय :-

राज्यातील लोककलावंताच्या पथकांना अनुदान पॅकेज अंतर्गत सन २०२२- २३ या आर्थिक वर्षाकरीता भांडवली खर्चासाठी परिशिष्ट-अ मधील पात्र २८ कलापथकांना रुपये १२.०० लक्ष व प्रयोगासाठी परिशिष्ट-ब मधील पात्र ३७ कलापथकांना रुपये ७१.०० लक्ष असे एकूण रुपये ८३.०० लक्ष (अक्षरी रुपये त्र्याऐंशी लक्ष फक्त) इतक्या सहाय्यक अनुदानास या शासन निर्णयान्वये वित्तीय मान्यता देण्यात येत आहे.

सदर खर्च लेखाशिर्ष मागणी क्र. झेडी-२,२२०५ कला व संस्कृती, १०२ कला व संस्कृती यांचे प्रचालन, (०२) (०९) कला व सांस्कृतिक संस्थांना सहाय्यक अनुदान (२२०५ १५३४) ३१ सहाय्यक अनुदान (वेतनेत्तर) या लेखाशिर्षाखाली सन २०२३-२४ या वर्षासाठी मंजूर असलेल्या आर्थिक तरतुदीतून भागविण्यात येईल.

यासाठी संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांना नियंत्रण अधिकारी तसेच लेखाधिकारी, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.

सदर खर्च वित्त विभागाच्या शासन निर्णय क्र. विअप्र-२०१३/विनिमय, दिनांक १७ एप्रिल, २०१५, वित्तीय अधिकार नियम पुस्तिका १९७८, भाग-पहिला, उपविभाग-३, अ.क्र. ४ परिच्छेद क्र. २७ (२) (अ) अन्वये प्रशासकीय विभागास प्राप्त अधिकारानुसार मंजूर करण्यात येत आहे.

सदर प्रकरणी वित्त विभागाच्या शासन निर्णय क्र. अर्थसं २०२३/ प्र.क्र.४०/ अर्थ-३, दिनांक १२ एप्रिल, २०२३ मधील सर्व परिच्छेद व परिशिष्टातील अटींनुसार कार्यवाही करण्याची जबाबदारी संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांची राहील.

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग शासन निर्णय : राज्यातील लोक कलावंतांच्या पथकांना अनुदान पॅकेज अंतर्गत भांडवली खर्चासाठी व प्रयोगासाठी सन २०22-23 या आर्थिक वर्षात अनुदान मंजूर करणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – कलाकार मानधन योजना – Kalakar Mandhan Yojana

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.