उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) वेळापत्रक
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने (HSC SSC Exam Timetable) पुणे, नागपूर, छ.संभाजीनगर मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवडयात व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवडयात आयोजित केल्या जातात. सदर परीक्षांचा ऑनलाईन निकाल अनुक्रमे मे अखेरीस व जूनच्या पहिल्या आठवडयात जाहीर करण्यात येतो.
त्यानंतर अनुत्तीर्ण तसेच श्रेणीसुधार अंतर्गत प्रविष्ट विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्टची पुरवणी परीक्षा साधारणतः जुलैच्या तिसऱ्या आठवडयापासून घेतली जाते.
इ.१२वी/इ.१०वी परीक्षा वेळापत्रक – HSC SSC Exam Timetable:
विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया वेळेवर होणे, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा या मंडळाच्या परीक्षेनंतर आयोजित केल्या जात असल्याने अशा परीक्षांचा अभ्यास करण्यास विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा तसेच पुरवणी परीक्षा लवकर घेवून त्याचा निकाल लवकर जाहीर करणे, या बाबींचा सारासार विचार करता सन २०२५ ची फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणारी इ.१२वी व इ.१० वीची परीक्षा नेहमीपेक्षा ०८ ते १० दिवस आधी आयोजित करण्याचा मंडळाचा मानस असून त्याअनुषंगाने लेखी, प्रात्यक्षिक व इतर परीक्षा पुढील तारखांना घेण्याचे नियोजित आहे.
अ.क्र. | तपशील | लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा कालावधी |
१ | उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षा (सर्वसाधारण व व्दिलक्षी विषय) व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम | मंगळवार, दि. ११ फेब्रुवारी, २०२५ ते मंगळवार, दि. १८ मार्च २०२५ |
प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन | शुक्रवार, दि. २४ जानेवारी २०२५ ते सोमवार, १० फेब्रुवारी २०२५ | |
२ | माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षा | शुक्रवार, दि. २१ फेब्रुवारी, २०२५ ते सोमवार दि. १७ मार्च, २०२५ |
प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन | सोमवार, ०३ फेब्रुवारी २०२५ ते गुरूवार, २० फेब्रुवारी २०२५ |
शाळा / कनिष्ठ महाविद्यालय व विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याचे हेतूने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याचे दृष्टीने फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेच्या वरीलप्रमाणे नियोजित तारखा जाहीर करण्यात येत आहे.
प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व लेखी परीक्षांचे सविस्तर विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे मंडळाच्या संकेतस्थळावर यथावकाश जाहीर करण्यात येईल.
सदर तारखांबाबत काही सूचना, हरकती असल्यास त्या शुक्रवार, दि.२३.०८.२०२४ पर्यंत secretary.stateboard@gmail.com या संकेत स्थळावर पाठवाव्यात. या तारखेनंतर प्राप्त होणाऱ्या सूचनांवर विचार केला जाणार नाही. उपरोक्त बाबत सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.
हेही वाचा – कोटक सुरक्षा स्कॉलरशिप – Kotak Suraksha Scholarship 2024-25
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!