वृत्त विशेषजिल्हा परिषदमहानगरपालिकामहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीमहाराष्ट्र शासन निर्णय - GRसरकारी कामे

कृषि सेवक, ग्रामसेवक आणि शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ !

मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली कृषि सेवक, ग्रामसेवक आणि शिक्षण सेवकांच्या मानधन / निश्चित वेतनात वाढ करणेबाबत” मंत्रालय, मुंबई येथे दि. २२.०९.२०२२ रोजी आयोजित बैठक झाली. मानधनावर / निश्चित वेतनावर कार्यरत असलेल्या कृषि सेवक, ग्रामसेवक, शिक्षणसेवक, आरोग्य सेवक इत्यादी पदांच्या मानधनाबाबत सामाईक निर्णय घेण्याच्या दृष्टीने विचारविनियम करण्याकरीता संबंधित सर्व विभागांची एकत्रित बैठक मा. मुख्य सचिव यांचे अध्यक्षतेखाली दि. २२.०९.२०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीस खालील अधिकारी उपस्थित होते.

  • श्री. ओमप्रकाश गुप्ता, प्रधान सचिव (व्यय), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
  • श्री. एकनाथ डवले, प्रधान सचिव (कृषि), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई.
  • श्री. रणजितसिंह देओल, सचिव (शालेय शिक्षण), मंत्रालय, मुंबई.
  • श्रीमती सरिता बांदेकर देशमुख, सह सचिव, कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई.
  • श्री. का. गो. वळवी, उप सचिव, ग्रामविकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
  • श्री. तुषार महाजन, उप सचिव, शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.
  • श्री. दत्तात्रय शिंदे, कक्ष अधिकारी, शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.
  • श्रीमती ज्योत्स्ना अर्जुन, कक्ष अधिकारी (१६-ओ), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई.

कृषि सेवक, ग्रामसेवक, शिक्षणसेवक, आरोग्य सेवक इत्यादी पदांच्या मानधनाबाबत वाढ करण्याच्या विषयाबाबत बैठकीत चर्चा करुन खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला.

प्रधान सचिव (कृषि) यांनी बैठकीच्या सुरवातीस कृषि विभागातील क्षेत्रिय कृषि व पदुम कार्यालयातील कृषि सहाय्यकांची रिक्त पदे कृषि सेवक म्हणून दरमहा रु. २५००/- विभाग/ शालेय इतक्या निश्चित वेतनावर दि. ६.२.२००४ च्या शासन निर्णयान्वये भरण्यात येत शिक्षण विभाग होती. दि. १९.०३.२०१२ च्या शासन निर्णयान्वये कृषि सेवकांचे मानधन वाढवून ते रु. ६०००/- इतके करण्यात आले. अद्यापही कृषि सेवकांना प्रतिमाह रु. ६०००/- विभाग इतक्या तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत आहे. त्यामुळे कृषि सेवकांचे मानधन रु. १६०००/- इतके वाढविण्याचा कृषि विभागाचा प्रस्ताव असल्याचे नमूद केले.

तसेच ग्रामविकास विभागांतर्गतही ग्रामसेवकांना प्रतिमाह रु. ६०००/- इतके मानधन देण्यात येत असल्याचे निदर्शनास आणण्यात आले.

>

सचिव (शालेय शिक्षण) यांनी सद्यस्थितीत शिक्षणसेवक म्हणून मानधनावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना रु.६०००/- (प्राथमिक व उच्च प्राथमिक), रु. ८०००/- (माध्यमिक) आणि रु. ९०००/- उच्च माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालये) | देण्यात येत असल्याचे नमूद केले. तसेच शालेय शिक्षण विभागाने रिट याचिका क्र. १३६७/ २०२२ मध्ये मा. उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांनी दिलेला न्यायनिर्णय निदर्शनास आणला. सदर रिट याचिकेमध्ये मा. उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांनी दि. ३०.०६.२०२२ रोजी दिलेल्या न्यायनिर्णयामध्ये प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग आणि प्रधान सचिव, ग्रामविकास विभाग यांना निर्देशित केले आहे की, मानधन / निश्चित वेतनामध्ये किमान वेतनाच्या दराप्रमाणे सुधारणा करण्यात यावी आणि त्यामध्ये चार वर्षातून किमान एकदा सुधारणा करण्यासाठी विचार करावा. तसेच सदर कर्मचान्यांना किमान प्रतिमाह रु. १५००० ते रु.२०००० निश्चित वेतन अदा करण्यात यावे.

प्रधान सचिवाव्यय), वित्त विभाग यांनीही कृषि सेवक, ग्रामसेवक व शिक्षण सेवकांच्या मानधन / निश्चित वेतनात किमान वेतनानुसार सुधारणा करण्याच्या अनुषंगाने सकारात्मकता दर्शवून सदर प्रस्ताव मा. मंत्रीमंडळाच्या विचारार्थ ठेवणे आवश्यक असल्याचे नमूद केले.

चर्चेअंती रिट याचिका क्र. १३६७/२०२२ मधील मा. उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांचे निर्देश व सद्यस्थितीत सातव्या वेतन आयोगामध्ये देण्यात येणारे किमान वेतन रु. १५०००/- विचारात घेता, कृषि सेवक, ग्रामसेवक व शिक्षण सेवकांच्या निश्चित वेतनात खालीलप्रमाणे वाढ करण्यासंदर्भातील आवश्यक प्रस्ताव मान्यतेसाठी मा. मंत्रीमंडळासमोर सादर करण्याची कार्यवाही कृषि व पदुम विभाग, ग्रामविकास विभाग आणि शालेय शिक्षण व क्रीडा विभागांनी स्वतंत्रपणे करावी असे ठरले. सदर तीनही प्रस्ताव संबंधित प्रशासकीय विभागांनी एकाच वेळी मा. मंत्रीमंडळाच्या बैठकीत सादर करण्याच्या दृष्टीने पुढील आवश्यक ती कार्यवाही करावी असेही ठरले.

पदनाम सध्या देण्यात येणारे निश्चित वेतन प्रस्तावित सुधारित मानधन
कृषि सेवक रु. ६००० रु. १६०००
ग्रामसेवक रु. ६००० रु. १६०००
शिक्षण सेवक (प्राथमिक व उच्च प्राथमिक) रु. ६००० रु. १६०००
शिक्षण सेवक (माध्यमिक) रु. ८००० रु. १८०००
शिक्षण सेवक (उच्च माध्यमिक) रु. ९००० रु. २००००

कृषि सेवक, ग्रामसेवक आणि शिक्षण सेवकांच्या मानधन / निश्चत वेतनात वाढ करणेबाबत मा. मुख्य सचिव यांचेकडे आयोजित बैठकीचे इतिवृत्त पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – जिल्हा परिषद गट-क आरोग्य भरतीचे नवीन वेळापत्रक जाहीर २०२२-२०२३ – Health Department Recruitment

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.