आपले सरकार - महा-ऑनलाईनकृषी पशुसंवर्धन दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभागकृषी योजनावृत्त विशेषसरकारी योजना

कापूस-सोयाबीन अनुदानासाठी अशी करा ई-केवायसी !

खरीप २०२३ हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी खातेदारांनी (Kapus Soybean Anudan EKYC) ई-केवायसी करणे आवश्यक आहे, ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी (Kapus Soybean Anudan EKYC) केले नाही त्यांनी नजिकच्या कृषी कार्यालयांशी संपर्क करून ई-केवायसी (Kapus Soybean Anudan EKYC) करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेकरिता पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे. या पोर्टलवर पीक निहाय व गावनिहाय वैयक्तिक खातेदारांची यादी (Prefilled data) देण्यात आलेली आहे.

कापूस-सोयाबीन अनुदानासाठी अशी करा ई-केवायसी ! Kapus Soybean Anudan EKYC:

राज्यातील सन २०२३ च्या खरीप हंगामातील ई-पिक पहाणी पोर्टलवरील नोंदणीकृत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रु. १००० तर ०.२ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर रु. ५,००० (२ हेक्टरच्या मर्यादेत) अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.  याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावर कापूस सोयाबीन ची नोंद आहे, वनपट्टा धारक शेतकरी, ज्या गावातील भूमी अभिलेख संगणकीकरण झाले नाही, अशा गावातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी यांना हा लाभ देण्यात येणार आहे .

हे अर्थसहाय्य खातेदारांच्या आधार संलग्न बॅंक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून  जमा करण्यात येणार आहे. यासाठी सर्वसाधारण ९६ लाख खातेदारांपैकी  ६८ लाख खातेदारांनी आपले आधार संमती दिली आहे. या पैकी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत ४६.६८ लाख आधार क्रमांक जुळले आहेत. यांचे ई-केवायसी (Kapus Soybean Anudan EKYC) करण्याची आवश्यकता नाही.

मात्र या व्यतिरिक्त २१.३८ लाख खातेदार यांनी त्यांचे आधार (Kapus Soybean Anudan EKYC) ई-केवायसी करणे आवश्यक आहे. यापैकी २.३० लाख खातेदार यांनी  २५ सप्टेंबर २०२४ अखेर (Kapus Soybean Anudan EKYC) ई-केवायसी पूर्ण केले आहे. याव्यतिरिक्त शिल्लक १९ लाख खातेदार यांचे करिता पोर्टलवर खालीलप्रमाणे सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे.

ज्या शेतकऱ्यांचे ई-केवायसी (Kapus Soybean Anudan EKYC) करावयाचे आहे, त्यांची यादी गावात प्रदर्शित करण्यात आलेली आहे. या शेतकऱ्यांनी संबंधित कृषि सहाय्यकाशी संपर्क साधावा.

कृषि सहाय्यक त्यांचे लॉगीन मध्ये उपलब्ध सुविधेद्वारे संबंधित खातेदाराच्या आधार संलग्न मोबाईल क्रमांकावर येणाऱ्या ओटीपीच्या माध्यमातून (Kapus Soybean Anudan EKYC) ई-केवायसी करतील.

तसेच शेतकरी स्वतः सुद्धा या पोर्टलवर जाऊन ओटीपीच्या माध्यमातून किंवा बायोमॅट्रीकच्या माध्यमातून सेवा सुविधा केंद्रात सीएसी (CSC) जावून सुद्धा ई-केवायसी (Kapus Soybean Anudan EKYC) करु शकतात.

याकरिता पोर्टलच्या मुख्य पानावर डिस्बर्समेंट स्टेट्स (Disbursement status) येथे क्लिक केल्यानंतर शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक टाकावा. नंतर मोबाईलवर प्राप्त ओटीपी किंवा सीएसी केंद्रातील बायोमेट्रीक मशिनच्या माध्यमातून ते ई-केवायसी (Kapus Soybean Anudan EKYC) पूर्ण करु शकतात.

तरी शेतकऱ्यांनी तात्काळ ई-केवायसी (Kapus Soybean Anudan EKYC) करुन घ्यावे, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी नजिकच्या कृषी कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

कापूस-सोयाबीन अनुदानासाठी ई-केवायसी करण्याची प्रोसेस – Kapus Soybean Anudan EKYC:

कापूस-सोयाबीन अनुदान ई-केवायसीसाठी खालील अधिकृत वेबपोर्टलला भेट द्या.

https://scagridbt.mahait.org/

वेबपोर्टल ओपन केल्यानंतर ‘Disbursement Status’ या टॅबवर क्लिक करा.

Kapus Soybean Farmers Disbursement Status : Kapus Soybean farmers Beneficiary Status

‘Enter Aadhaar Number’ या रकान्यात आपल्या आधार क्रमांक टाका व पुढे captcha कोड टाका.

पुढे ई-केवायसीसाठी दोन पर्याय दिसतील १) OTP आधारित ई-केवायसी २) Biometric आधारित ई-केवायसी

Kapus Soybean Anudan EKYC
Kapus Soybean Anudan EKYC

आपण इथे OTP आधारित ई-केवायसी वर क्लिक करा. आता तुमच्या आधार-सांलग्न मोबाईल क्रमांकावर ओटीपी प्राप्त होईल.

पुढे OTP टाकून ‘Get Data’ या बटणावर क्लिक करा. अशा प्रकारे कापूस-सोयाबीन अनुदान ई-केवायसी OTP आधारित होईल.

पात्रतेचे निकष:

(१) राज्यातील सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रु. १००० तर ०.२ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर रु. ५,००० (२ हेक्टरच्या मर्यादेत) अर्थ सहाय्य अनुज्ञेय राहील.

(२) राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन २०२३ च्या खरीप हंगामामध्ये ई-पीक पाहणी अॅप/पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे असे नोंदणीकृत शेतकरीच अर्थसहाय्याकरीता पात्र राहतील.

(३) ई-पीक पाहणी अॅप/पोर्टल वर नोंद असलेल्या क्षेत्रानुसार व त्याप्रमाणातच परिगणना करून अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील.

(४) सदर शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतक-याच्या आधार लिंक्ड बँक खात्यामध्ये केवळ थेट लाभ हस्तांतरणाच्या (DBT) माध्यमातूनच अर्थसहाय्य जमा करण्यात येईल.

(५) सदर योजना फक्त सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीच मर्यादीत राहील.

हेल्पलाइन क्रमांक: तांत्रिक सहाय्यासाठी, हेल्पलाइन क्रमांक ०२२- ६१३१ ६४०१ कार्यालयीन कामकाजाची वेळ: सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६:१५ वा.

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग शासन निर्णय:

राज्यातील सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रु. १००० तर ०.२ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर रु. ५,००० (२ हेक्टरच्या मर्यादेत) अर्थ सहाय्य देण्यासाठीच्या प्रस्तावास मा. मंत्रिमंडळाच्या दि. ११ जुलै, २०२४ च्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने शासन निर्णय निर्गमित केला आहे.

  1. सन २०२३ च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
  2. २०२३ च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतची कार्यपद्धतीबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
  3. सन २०२३ च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांना अर्थसहाय्य देण्याकरिता पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध झालेला रु.4194.68 कोटी निधी पैकी रु.2516.80 कोटी निधी सन २०२४-२५ मध्ये वितरीत करण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

पुढील लेख देखील वाचा!

  1. कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५ हजार रुपये मिळणार !
  2. कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्याचे स्टेट्स ऑनलाईन चेक करा !
  3. कापूस-सोयाबीन अनुदान लाभार्थी यादी ऑनलाईन पहा !

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

One thought on “कापूस-सोयाबीन अनुदानासाठी अशी करा ई-केवायसी !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.