आपले सरकार - महा-ऑनलाईनवृत्त विशेषस्कॉलरशिप - शिष्यवृत्ती

कोटक बँक स्कॉलरशिप : १०वी नंतर शिक्षणासाठी ७३,५०० मिळवा – आत्ताच अर्ज करा!

भारतातील अनेक विद्यार्थी गुणवत्ता असूनही केवळ आर्थिक मर्यादांमुळे शिक्षणाच्या प्रवासात अडथळ्यांना सामोरे जातात. अशा विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण ठरतो तो म्हणजे कोटक बँक (Kotak Bank Scholarship) स्कॉलरशिप. Kotak Education Foundation (KEF) द्वारे राबविण्यात येणारी Kotak Junior Scholarship Program 2025-26 ही एक महत्त्वपूर्ण शिष्यवृत्ती योजना आहे. या योजनेद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ पार्श्वभूमी असलेल्या पण गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, शैक्षणिक मार्गदर्शन आणि करिअर सपोर्ट दिला जातो.

कोटक बँक स्कॉलरशिप – Kotak Bank Scholarship:

कोटक महिंद्रा ग्रुपचा एक भाग असलेल्या Kotak Education Foundation (KEF) ची स्थापना 2006 मध्ये झाली. शिक्षणाच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांचे जीवनमान उंचावणे हा यामागचा उद्देश आहे. ही संस्था शाळा, महाविद्यालय, कौशल्यविकास, शिक्षणवृत्ती आणि शिष्यवृत्ती या क्षेत्रांत कार्यरत आहे. कोटक बँक (Kotak Bank Scholarship) स्कॉलरशिप हा या संस्थेचा एक मुख्य उपक्रम आहे.

शिष्यवृत्तीचा लाभ:

कोटक बँक (Kotak Bank Scholarship) स्कॉलरशिप अंतर्गत निवडलेल्या विद्यार्थ्यांना खालील लाभ मिळतात:

  • रु. ३,५००/- प्रती महिना शिष्यवृत्ती (एकूण २१ महिन्यांसाठी म्हणजेच ११ वी आणि १२ वी साठी रु. ७३,५००/-)

शिष्यवृत्तीची रक्कम त्रैमासिक किंवा सहामाही स्वरूपात विद्यार्थ्याच्या खात्यावर जमा केली जाते. ही रक्कम केवळ शैक्षणिक गरजांसाठी वापरण्यात येते, जसे की ट्युशन फी, पुस्तकं, स्टेशनरी, प्रवासखर्च इत्यादी.

पात्रता निकष (Eligibility Criteria):

कोटक बँक (Kotak Bank Scholarship) स्कॉलरशिपसाठी अर्ज करताना खालील अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे:

  1. इयत्ता १० वी (SSC/CBSE/ICSE) मध्ये किमान ८५% गुण मिळवलेले असावेत (2025 परीक्षेतील)

  2. इयत्ता ११ वी मध्ये MMR परिसरातील मान्यताप्राप्त कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतलेला असावा

  3. उमेदवाराचा वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रु. ३,२०,०००/- पेक्षा कमी असावा

  4. विद्यार्थ्याचे सध्याचे वास्तव्य मुंबई महानगर प्रदेशात असावे

  5. Kotak Foundation किंवा Buddy4Study मधील कर्मचाऱ्यांची मुले अर्ज करू शकत नाहीत.

आवश्यक कागदपत्रे:

अर्ज करताना खालील कागदपत्रांची PDF/स्कॅन कॉपी अपलोड करावी लागते:

  • १० वी चा मार्कशीट (SSC/CBSE/ICSE)

  • उत्पन्नाचा दाखला (सरकारद्वारे प्रमाणित)

  • अलीकडील पासपोर्ट साईज फोटो

  • विद्यार्थी आणि पालकांचा आधार कार्ड

  • कमावणाऱ्या पालकाचा PAN कार्ड

  • शाळा सोडल्याचा दाखला

  • IT रिटर्न (जर कुणी भरले असेल तर – ऐच्छिक)

  • एकट्या पालक असल्यास मृत्यू प्रमाणपत्र

  • विद्यार्थ्याच्या बँक खात्याचा तपशील (पासबुक/स्टेटमेंट)

कोटक बँक स्कॉलरशिपसाठी ऑनलाईन अर्ज करा (Apply Online for Kotak Bank Scholarship) :

इच्छुक विद्यार्थी खालील लिंकचा वापर करून शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात:

https://www.buddy4study.com/page/kotak-junior-scholarship

  • पोर्टल ओपन केल्यानंतर ‘Apply Now‘ बटणावर क्लिक करा.
  • अर्ज पेज’ वर नोंदणीकृत ID वापरून Buddy4Study मध्ये लॉग इन करा.
  • Buddy4Study वर नोंदणीकृत नसल्यास – आपल्या ईमेल/मोबाईल/फेसबुक/जीमेल खात्यासह Buddy4Study वर नोंदणी करा.
  • तुम्हाला आता ‘Kotak Junior Scholarship Program 2025-26’ अर्ज फॉर्म पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल.
  • अर्ज प्रक्रिया सुरू करण्यासाठी ‘Start Application‘ बटणावर क्लिक करा.
  • ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्जामध्ये आवश्यक तपशील भरा.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • ‘नियम आणि अटी’ (Terms and Conditions) स्वीकारा आणि ‘Preview‘ वर क्लिक करा.
  • जर अर्जदाराने भरलेले सर्व तपशील पूर्वावलोकन स्क्रीनवर योग्यरित्या दर्शवत असतील तर, अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ‘Submit‘ बटणावर क्लिक करा.

कोटक जूनियर स्कॉलरशिप (Kotak Bank Scholarship) प्रोग्रॅम खास करून मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आला आहे. या शिष्यवृत्तीचा मुख्य उद्देश म्हणजे गुणवत्तावान पण आर्थिक दृष्ट्या दुर्बल अशा विद्यार्थ्यांना इयत्ता ११ वी आणि १२ वीच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत आणि करिअर मार्गदर्शन प्रदान करणे.

कोटक बँक (Kotak Bank Scholarship) स्कॉलरशिप म्हणजे केवळ आर्थिक मदत नव्हे तर विद्यार्थ्याच्या संपूर्ण शैक्षणिक प्रवासात एक मजबूत आधारस्तंभ आहे. केवळ स्कॉलरशिपच नाही, तर विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणारी सर्व प्रकारची मदत या योजनेतून मिळते. आर्थिक अडचणींमुळे शिक्षण थांबवण्याची वेळ येऊ नये म्हणून ही योजना एक महत्वाचा टप्पा ठरते. जर आपण किंवा आपल्याला ओळख असलेल्या कोणत्याही विद्यार्थ्याने १० वी उत्तम गुणांसह उत्तीर्ण केली असेल तर नक्कीच या संधीचा लाभ घ्या.

अधिक माहितीसाठी संपर्क:

संपर्क: 011-430-92248 (Ext-325) (सोमवार ते शुक्रवार – सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत)
इ:मेल: kotakjunior@buddy4study.com

या लेखात, आम्ही कोटक बँक स्कॉलरशिप (Kotak Bank Scholarship) विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

खालील लेख देखील वाचा !

  1. महाडीबिटी शिष्यवृत्ती / फ्रीशीप योजनांकरिता ऑनलाईन अर्ज सुरु – Apply Online For Maha DBT Scholarship
  2. पंडित दीनदयाळ उपाध्याय शिष्यवृत्ती योजना
  3. लेडी मेहेरबाई डी टाटा एज्युकेशन ट्रस्ट शिष्यवृत्ती
  4. दीनदयाल स्पर्श योजना : भारतीय डाक विभागा मार्फत विद्यार्थ्यांना मिळणार ६ हजार रूपये प्रती वर्षी !
  5. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुधारित !
  6. परदेश शिष्यवृत्तीच्या निकषांमध्ये बदल; शासन निर्णय जारी !
  7. महात्मा जोतीराव फुले गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना\
  8. सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत विद्यार्थ्यांना परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजना सुरु करणेबाबत शासन निर्णय
  9. महावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती
  10. एकलव्य आर्थिक सहाय्य योजना – Eklavya Scholarship
  11. अपार आयडी ‘एक राष्ट्र, एक ओळखपत्र’ प्रत्येक विद्यार्थ्याला बनवावे लागणार !
  12. ARTI : मातंग समाजासाठी अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) ची स्थापना; शासन निर्णय!
  13. ‘आर्टी’च्या प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नोंदणी सुरु !
  14. संगणक टंकलेखन व लघुलेखन प्रशिक्षण योजना : टायपिंग कोर्स केलेल्यांना ६,५०० रुपये अर्थसहाय्य मिळणार !
  15. शासकीय दाखल्यांसाठी लागणारे कागदपत्रे !
  16. दहावी नंतर करिअर पर्याय : टेक्निकल आणि औद्योगिक क्षेत्रातील संधी!
  17. अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु २०२५-२६
  18. आय.टी.आय प्रवेश प्रक्रिया २०२५

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.