एलपीजी ग्राहकांसाठी रिफिल बुकिंग पोर्टेबिलिटी सुविधा – आता गॅस भरा आपल्या पसंतीच्या वितरककडून !
एलपीजी ग्राहकांसाठी रिफिल बुकिंग पोर्टेबिलिटी (LPG Refill Booking Portability) सुविधा, आता आपल्या पसंतीच्या वितरककडून गॅस भरता येणार आहे. पुणे आणि इतर काही शहरात लवकरच ही अनोखी सुविधा उपलब्ध होणार आहे.
एलपीजी ग्राहकांना अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आणि सर्वांना परवडणारी ऊर्जा उपलब्ध करून देण्याच्या माननीय पंतप्रधानांच्या दृष्टीकोनातून, एलपीजी ग्राहकांना कोणत्या वितरकांकडून एलपीजी सिलिंडर पुन्हा भरून हवा आहे याची निवड ग्राहकांनी करण्यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे. तेल विपणन कंपनी (ओएमसी) मधील पत्त्यासह असलेल्या वितरकांच्या यादीमधून ग्राहकांना त्यांचा “वितरण वितरक” निवडता येईल. प्रायोगिक तत्वावर लवकरच चंडीगढ, कोयम्बतूर, गुडगाव, पुणे आणि रांची येथे ही अनोखी सुविधा उपलब्ध होणार आहे.
नोंदणीकृत लॉग इन वापरुन मोबाईल अॅप/ग्राहक पोर्टलवर एलपीजी सिलिंडर पुन्हा भरून घेण्यासाठी नोंदणी करताना वितरणाच्या वितरकांची यादी त्यांच्या कामगिरी क्रमवारीसह दर्शविली जाईल.
डिजिटल एलपीजी सेवा:
तंत्रज्ञानाचा लाभ घेत, ग्राहकांना डिजिटल मंचाद्वारे, एलपीजी सिलिंडर भरण्यासाठी नोंदणी आणि पैसे भरण्यास मदत करण्यासाठी तेल विपणन कंपन्यांनी खालील डिजिटल उपक्रम स्वीकारले आहेत:
उपरोक्त डिजिटल व्यवस्थे व्यतिरिक्त, ग्राहक उमंग (युनिफाइड मोबाइल अॅप फॉर न्यू गव्हर्नन्स) अॅप किंवा भारत बिल पे सिस्टम अॅप्स आणि मंचाद्वारे त्यांचे एलपीजी सिलिंडर भरून घेण्यासाठी नोंदणी करू शकतात. याव्यतिरिक्त ग्राहक त्यांच्या ई-कॉमर्स अॅप्सद्वारे सिलिंडर भरून घेण्यासाठी नोंदणी करू शकतात आणि पैसे भरू शकतात. उदा. ऍमेझॉन, पेटीएम इ.
एलपीजी ग्राहकांसाठी एलपीजी जोडणी पोर्टेबिलिटी:
त्याच भागात सेवा देणार्या दुसर्या वितरकाकडे एलपीजी जोडणीचे ऑनलाईन हस्तांतरण करण्याची सुविधा एलपीजी ग्राहकांना संबंधित तेल विपणन कंपन्यांचे वेब-पोर्टल तसेच त्यांच्या मोबाइल अॅप्सद्वारे प्रदान करण्यात आली आहे.
नोंदणीकृत लॉग इन वापरून ग्राहकांना त्यांच्या क्षेत्रातील वितरकांच्या यादीमधून त्यांच्या तेल विपणन कंपनीचा वितरक निवडता येईल आणि ग्राहकांना त्यांच्या एलपीजी जोडणीचा वितरक बदलून घेण्यासाठी पर्याय मिळेल
ही सुविधा विनामूल्य आहे आणि या सुविधेसाठी कोणतेही शुल्क किंवा हस्तांतरण शुल्क देय नाही. मे, 2021 मध्ये 55759 पोर्टेबिलिटी विनंत्या तेल विपणन कंपन्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत.
हेही वाचा – घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर ग्राहकांचे अधिकार
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!