माझी वसुंधरा अभियान-6.0 : हरित महाराष्ट्राची नवी दिशा
महाराष्ट्र शासनाने पर्यावरणीय संरक्षण आणि वातावरणीय बदलांवर सकारात्मक पाऊल उचलत सुरू केलेला माझी वसुंधरा (Majhi Vasundhara Abhiyan) अभियान हा उपक्रम आता आपल्या सहाव्या टप्प्यात म्हणजेच माझी वसुंधरा अभियान-6.0 (Majhi Vasundhara Abhiyan) मध्ये प्रवेश करत आहे. हा उपक्रम 2020 साली सुरू झाला आणि दरवर्षी नवीन संकल्पनांसह अधिक प्रभावी स्वरूपात राबवला जात आहे. 6.0 आवृत्तीचा कालावधी 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 असा निश्चित करण्यात आला आहे.
माझी वसुंधरा अभियान-6.0 – Majhi Vasundhara Abhiyan:
माझी वसुंधरा (Majhi Vasundhara Abhiyan) अभियानाचे उद्दिष्ट पंचमहाभूत तत्वांवर (भूमी, जल, वायु, अग्नी, आकाश) आधारित उपाययोजनांची अंमलबजावणी करून पर्यावरण रक्षण करणे आणि नागरिकांमध्ये जनजागृती करणे आहे. माझी वसुंधरा (Majhi Vasundhara Abhiyan)अभियानाचा उद्देश केवळ सरकारी पातळीवर न राहता सामान्य नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा सहभाग वाढवणे हा आहे.
माझी वसुंधरा अभियान 6.0 ची वैशिष्ट्ये
अधिक सहभाग: यंदा 28,317 स्थानिक स्वराज्य संस्था (422 नागरी संस्था व 27,895 ग्रामपंचायती) या अभियानात सहभागी आहेत.
सुव्यवस्थित मूल्यांकन प्रक्रिया: संस्थांनी राबविलेल्या उपक्रमांचे MIS पोर्टलवर सादरीकरण करून डेस्कटॉप व क्षेत्रीय मूल्यांकन केले जाणार आहे. यामध्ये 5 जून 2026 रोजी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थांचा सन्मान केला जाणार आहे.
नवीन टूलकिट: नागरी व ग्रामीण संस्थांसाठी स्वतंत्र प्रारूप टूलकिट तयार करण्यात आले असून विविध सूचकांक (इंडिकेटर्स) निश्चित केले आहेत.
अभियानांतर्गत प्रमुख घटक व उपक्रम
१. भूमी (Earth)
33% हरित क्षेत्र प्राप्त करण्याचा संकल्प.
वृक्षारोपण मोहिमा, नवीन हिरवळ क्षेत्रांची निर्मिती आणि देखभाल.
जैवविविधतेचे संरक्षण, बीज संकलन केंद्रांची उभारणी.
घनकचरा व्यवस्थापन व प्लास्टिक कचरा कमी करण्यासाठी उपाययोजना.
२. वायु (Air)
वायुप्रदूषण कमी करण्यासाठी उपाय योजना.
इलेक्ट्रिक वाहनांचे प्रोत्साहन, चार्जिंग स्टेशनची उभारणी.
कृषी कचऱ्याचे व्यवस्थापन आणि ध्वनी प्रदूषण कमी करणे.
३. जल (Water)
जलस्रोतांचे पुनरुज्जीवन आणि पाण्याचा शाश्वत वापर.
पावसाचे पाणी संकलन, भूजल पुनर्भरण.
जल लेखापरीक्षण आणि पाणी गुणवत्ता परीक्षण.
४. अग्नी (Energy)
नवीकरणीय ऊर्जा स्रोतांचा अवलंब.
सौर प्रकल्प उभारणी, हरित इमारतींची निर्मिती.
ऊर्जेची बचत व कार्बन उत्सर्जन कमी करण्यावर भर.
५. आकाश (Awareness & Enhancement)
जनजागृती मोहिमा, सोशल मिडिया व इतर माध्यमांतून प्रचार.
शाळांमध्ये पर्यावरण सेवा योजना.
विविध उपक्रमांत नागरिकांचा सक्रिय सहभाग.
मूल्यांकन व पुरस्कार:
माझी वसुंधरा (Majhi Vasundhara Abhiyan) अभियानाच्या कालावधीत स्थानिक स्वराज्य संस्था विविध सूचकांकांवर आधारित उपक्रम राबवतील. याचे डेस्कटॉप व नंतर क्षेत्रीय मूल्यांकन केले जाईल. कामगिरीनुसार संस्थांना गुण दिले जातील आणि 5 जून 2026 रोजी उत्कृष्ट संस्थांचा गौरव करण्यात येईल.
नागरिकांचा सहभाग आणि जबाबदारी:
माझी वसुंधरा (Majhi Vasundhara Abhiyan) अभियानात नागरिकांचा सहभाग हा महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येक व्यक्तीच्या लहान प्रयत्नातून मोठ्या सकारात्मक बदल शक्य आहेत. उदाहरणार्थ:
प्लास्टिक वापर कमी करणे.
घरच्या घरी ओला-सुका कचरा वेगळा करणे.
वृक्षारोपण आणि त्याचे पालनपोषण करणे.
माझी वसुंधरा (Majhi Vasundhara Abhiyan) अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांपासून ग्रामसेवकांपर्यंत जबाबदाऱ्या ठरवण्यात आल्या आहेत. तसेच प्रत्येक उपक्रमाचे दस्तऐवजीकरण (जिओ टॅग फोटो, कागदपत्रे) अनिवार्य आहे.
माझी वसुंधरा अभियान 6.0 (Majhi Vasundhara Abhiyan) ही केवळ योजना नाही, तर पर्यावरण संवर्धनासाठीचा एक जनआंदोलन आहे. महाराष्ट्राने दिलेला हा पर्यावरणपूरक संदेश प्रत्येक नागरिकाने स्वीकारून प्रत्यक्ष कृतीत आणण्याची आवश्यकता आहे. यामुळे शाश्वत विकासाचे उद्दिष्ट साध्य होईल आणि भावी पिढ्यांसाठी समतोल व सुरक्षित पर्यावरणाची ग्वाही मिळेल.
या लेखात, आम्ही माझी वसुंधरा अभियान-6.0 (Majhi Vasundhara Abhiyan) विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.
पुढील लेख देखील वाचा!
- महाडीबीटी अंतर्गत शेततळे अनुदान योजना
- मनरेगा अंतर्गत शेततळे अनुदान योजना
- शेततळे योजना (पोकरा अंतर्गत) ऑनलाईन अर्ज करा!
- नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत विविध पोकरा अनुदान योजना – POCRA Yojana
- मागेल त्याला योजना : फळबाग /ठिबक/ तुषार सिंचन/ शेततळे/ शेततळयाचे अस्तरीकरण/ शेडनेट/ हरितगृह/ आधुनिक पेरणीयंत्र (BBF) /कॉटन श्रेडर
- महाडीबीटी योजना लाभार्थी यादी ऑनलाईन डाउनलोड करा ! MahaDBT Yojana Beneficiary List Download Online!
- शेतकऱ्यांसाठी “अर्ज एक योजना अनेक”, महाडीबीटी पोर्टल योजना – MahaDBT Portal Scheme
- महाडीबीटी लॉटरी मध्ये निवड व पूर्व संमती मिळाल्यानंतर अपलोड करावयाची कागदपत्रे !
- पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरु !
- कुसुम सोलर पंपाचे दर, कंपनी संपर्क व लाभार्थी यादी पहा ऑनलाईन !
- कुसुम सौर कृषी पंप अर्ज नोंदणी सुरु; असा करा ऑनलाईन अर्ज ! – Kusum Solar Pump Yojana Online Registration
- पाईप व पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस!
- सर्व शेतकरी योजना आता “महाडीबीटी शेतकरी मोबाईल अॅप” वर – MahaDBT Farmer App
- या शेतकऱ्यांना मिळणार मोफत सोलर पंप; असा करा ऑनलाईन अर्ज !
- मागेल त्याला सौर कृषी पंप योजना; असा करा ऑनलाईन अर्ज!
- मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४; आता शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज!
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!