महाज्योती मार्फत मोफत महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) संयुक्त गट परीक्षा (गट ‘ब’ व ‘क’) परीक्षापूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज सुरु – २०२३-२४

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) संयुक्त गट परीक्षा (गट ‘ब’ व ‘क’) परीक्षेकरीता इतर मागासवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 2023-24 या वर्षामध्ये MPSC संयुक्त गट परीक्षा (गट ‘ब’ व ‘क’) परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑफलाईन व -अनिवासी पद्धतीने महाज्योती मार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याकरीता इच्छुक विद्यार्थ्याकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

महाज्योती मार्फत मोफत महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) संयुक्त गट परीक्षा (गट ‘ब’ व ‘क’) परीक्षापूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज सुरु – २०२३-२४:

• प्रशिक्षणासाठी एकुण मंजूर विद्यार्थी संख्या 1500

• प्रशिक्षणाचा कालावधी 08 महिने

• विद्यावेतन 10,000/- प्रतिमाह (75% उपस्थिती असल्यास)

• आकस्मिक निधी 12,000/- (एकवेळ)

योजनेच्या लाभासाठी पात्रता :

1. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा/ असावी.

2. विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा/ असावी.

3. विद्यार्थी नॉन-क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा/ असावी.

4. विद्यार्थी पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे किंवा पदवीच्या अंतिम वर्षाला असणारे विद्यार्थी सुद्धा या प्रशिक्षणाकरीता अर्ज करु शकतात.

5. महाज्योतीच्या कोणत्याही योजनांचा कोणत्याही स्वरुपात लाभ घेतलेल्या विद्यार्थ्याने चालू योजनेसाठी पुन्हा अर्ज करु नये, त्यांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाही.

6. विद्यार्थ्याची अंतिम निवड छाननी परिक्षेद्वारे करण्यात येईल.

7. विद्यार्थ्याचे किमान वय 19 वर्ष व कमाल वय 43 वर्ष पेक्षा जास्त असू नये. दिव्यांग व्यक्तीकरीता वय 45 वर्षेपेक्षा अधिक असू नये.

लाभार्थी निवड प्रक्रिया :

1. महाज्योती मार्फत लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी महाज्योतीच्या संकेतस्थळावरै ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.

2. प्राप्त अर्जाची निकषानुसार छाननी करण्यात येईल.

3. छाननीमध्ये पात्र विद्यार्थ्यांची राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या धर्तीवर व अभ्यासक्रमानुसार चाळणी परीक्षा घेण्यात येईल.

4. चाळणी परीक्षेत प्राप्त गुणांकनानुसार मेरीटच्या आधारे व आरक्षित जागांच्या प्रमाणात पात्र विद्यार्थ्यांची यादी व प्रतीक्षा यादी महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

प्रशिक्षणाचे स्वरूप :

1. विद्याथ्यांना परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण देण्यात येईल.

2. प्रशिक्षण अनिवासी स्वरुपाचे असेल.

3. प्रशिक्षण हे ऑफलाईन स्वरुपाचे देण्यात येईल.

आरक्षण

सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षण पुढीलप्रमाणे:

अ.क्र. सामाजिक प्रवर्ग टक्केवारी निवड करावयाच्या लाभार्थ्यांची संख्या
1 इतर मागास वर्ग (OBC) 59% 885
2 निरधीसुचीत जमाती – अ (VJ-A ) 10% 150
3 भटक्या जमाती – ब ( NT-B) 8% 120
4 भटक्या जमाती – क (NT-C) 11% 165
5 भटक्या जमाती – ड (NT-D) 6% 90
6 विशेष मागास प्रवर्ग (SBC) 6% 90
एकूण 100% 1500

समांतर आरक्षण पुढीलप्रमाणे :

1. प्रवर्गनिहाय महिलांसाठी 30% जागा आरक्षित आहे.

2. दिव्यांगाकरिता 4% जागा आरक्षित आहे.

3. अनाथांसाठी 1% जागा आरक्षित आहे.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

1. आधार कार्ड

2. जातीचे प्रमाणपत्र (Cast Certificate)

3. रहिवासी दाखला (Domicile Certificate)

4. वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र (नॉन-क्रिमी लेयर).

5. पदवीचे प्रमाणपत्र / मार्कशीट / अंतिम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी मागील वर्षी उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक जोडावे.

6. पासबूक किंवा रद्द केलेला धनादेश

7. दिव्यांग असल्यास दाखला (दिव्यांग असल्यास)

8. अनाथ असल्यास दाखला

अटी व शर्ती :

1. अर्ज करण्याचा अंतिम दि. 15/05/2023 राहील.

2. पोस्टाने किंवा ई-मेल व्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.

3. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्विकारणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती यांचे राहतील.

4. प्रशिक्षणाकरीता निवड झालेले विद्यार्थी ज्या दिनांकास संस्थेत प्रशिक्षणाकरीता रुजु होतील त्या दिनांकापासून त्यांना महाज्योतीच्या धोरणानुसार विद्यावेतन लागू होईल. तथापि प्रत्यक्ष प्रशिक्षणास 75% उपस्थिती असणान्यांनाच विद्यावेतन देय राहिल.

5. कोणत्याही माध्यमातुन व अंतीम निवड प्रक्रियेच्या तसेच प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांनी सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण व दिशाभूल करणारी असल्यास किंवा या पूर्वी सदर योजनेचा लाभ घेतल्याचे आढळल्यास तसेच महाराष्ट्र राज्य शासनाच्या ‘सारथी ‘या कडून योजनेचा लाभ घेतला असल्यास त्यांची निवड रद्द करण्यात येईल.

6. महाज्योतीच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतला असल्यास विद्यार्थी या प्रशिक्षणास अपात्र ठरेल.

7. नमुद निकषांची पूर्तता न करणाऱ्या, अपूर्ण अर्ज सादर करण्याऱ्या किंवा अर्जासोबत कागदपत्रे न सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचा अर्ज बाद करण्यात येईल.

8. विद्यार्थाचे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असणे आवश्यक आहे.

अर्ज कसा करावा

1. महाज्योतीच्या संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधील “Application for MPSC Group B & C 2023-24 Training” यावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा.

2. अर्जासोबत तपशीलात नमुद सर्व कागदपत्रे स्वाक्षांकीत करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करुन जोडावे.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : 

अधिक माहितीसाठी संपर्क: अर्ज भरतांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या Call Centre वर संर्पक करावा संपर्क क्र. 0712-2870120/21 E-mail Id: [email protected]

हेही वाचा – केंद्रीय राखीव पोलीस दलात भरती – CRPF Recruitment 2023

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.