नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 4था हप्ता बँकेमध्ये जमा होण्यास सुरवात !
महाराष्ट्र सरकारनं नमो शेतकरी सन्मान योजनेच्या चौथ्या (Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana 4th Installment Update) हप्त्यासाठी दोन हजार कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात या (NSMNY) योजनेच्या तीन हप्त्यांची रक्कम जमा झालेली आहे. आता राज्य सरकारनं या योजनेच्या चौथ्या हप्त्यासाठी खर्चाला मान्यता दिली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. यामुळं राज्यातील शेतकऱ्यांना आगामी काळात चौथ्या हप्त्याचे दोन हजार रुपये मिळणार आहेत.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 4था हप्ता बँकेमध्ये जमा होण्यास सुरवात ! Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana 4th Installment Update:
सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली. त्यास अनुसरुन केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत देण्यात येणा-या प्रति वर्ष, प्रति शेतकरी रु. ६०००/- या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी रु. ६०००/- इतक्या निधीची भर घालणारी “नमो शेतकरी महासन्मान निधी” ही योजना राबविण्यास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.
मो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत लाभार्थीना लाभ अदा करणेसाठी एक व राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणा-या राज्य प्रकल्प संनियंत्रण कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी एक अशी एकूण दोन स्वतंत्र बचत खाती उघडण्यास मान्यता देण्यात आली आहे. प्रस्तुत योजने अंतर्गत पहिला हप्ता (माहे एप्रिल ते जुलै) लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रु. १७२० कोटी इतका निधी, दुसरा हप्ता (माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर) लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रु. १७९२ कोटी इतका निधी तसेच, तिसरा हप्ता (माहे डिसेंबर ते मार्च) लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रु. २००० कोटी इतका निधी अशा प्रकारे एकूण रु. ५५१२ कोटी इतका निधी वितरीत करण्यात आला आहे.
आता संचालक (वि.प्र.), कृषि आयुक्तालय, पुणे यांनी केलेल्या विनंतीस अनुसरून, सन २०२४-२५ मध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लेखाशिर्षा अंतर्गत मंजूर तरतूदीमधून प्रस्तुत योजने अंतर्गत चौथा हप्ता (माहे एप्रिल ते जुलै) लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एकूण रक्कम रू. २०४१.२५ कोटी व योजने अंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी रक्कम रु.२०.४१ कोटी अशा प्रकारे एकूण रक्कम रु. २०६१.६६ कोटी इतका निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत चौथा (Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana 4th Installment Update) हप्ता (माहे एप्रिल ते जुलै) लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रु. २०४१.२५ कोटी इतका निधी वितरीत करण्यास व योजने अंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी रु. २०.४१ कोटी, असा एकूण रु. २०६१.६६ कोटी इतका निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग शासन निर्णय (NSMNY GR):
नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत चौथा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी, तसेच, प्रशासकीय खर्चासाठी निधी वितरीत करणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – नमो शेतकरी महासन्मान निधी योजना खात्याचे किंवा २००० हप्त्याचे स्टेट्स चेक करा !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!
सरकार मधील काही भाडखाऊ व्यवसायिक दृष्टीने सरकार चालवितात मागील दहा वर्षात शेतकरी व त्याचे मुलांचे वाटोळे केले आणि आज योजना देतात भिकारी सारखी सरकार चालवणारे हे खरंच त्यांचे आईबा चे पोटचे आहेत का ? की आलत्या भलत्याची पैदास आहेत. पीकले त्याला किमंत नाही शेतकरी च हिस्काऊन लोकांना फूकट वाटून नाव कमाई चे काम करतात आणि शेतकरी मध्ये जे भाडखाऊ पुढारी पैदास झाले मुळात तेच छिनालचे आहेत. ते प्रामाणिक नाही.