कृषी योजनामहाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेषसरकारी योजना

राष्ट्रीय फलोत्पादन अभियान (MIDH); फुल शेती, मसाले पिके, फळबाग लागवड अनुदानासाठी अर्ज सुरू

केंद्र शासनाने दिनांक १ एप्रिल २०१४ पासून राष्ट्रीय फलोत्पादन अभियान (NHM), उत्तर पूर्व आणि हिमालयीन राज्यासाठी फळबाग अभियान (HMNEH), राष्ट्रीय बागवानी मंडळ (NHB), नारळ विकास मंडळ (CDB) व केंद्रीय फलोत्पादन संस्था (CIH) या सर्व योजनांचे एकत्रिकरण करुन एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान (Mission for Integrated Development of Horticulture) राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यात राबविला जाणाऱ्या राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाचा समावेश एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानात झालेला आहे. सदर अभियान केंद्र पुरस्कृत कृषी उन्नती योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. एकात्मिक फलोत्पादन अभियान ही फळे, भाजीपाला, कंदमुळे, मश्रूम, मसाले, फूल, सुगंधी वनस्पती, नारळ, काजू, कोको आणि बांबू इ. उत्पादनांच्या चतुरस्त्र विकासाकरिता राबविण्यात येणारी केंद्रपुरस्कृत योजना आहे. सदर योजना सन २०१५-१६ पासून केंद्र व राज्य हिस्सा ६०:४० या प्रमाणात राबविण्यात येत आहे.

अभियानांतर्गत समाविष्ट पिकांच्या उत्पादकतेत वाढ करणे, शेत जमीनीची सुपिकता व उत्पादकता यात वाढ करणे, रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणे व एकूणच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे ही या योजनेची मुख्य उद्दिष्टे आहेत. सन २०२२-२३ मध्ये राज्यात कृषी उन्नती योजना – एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान राबविण्यासाठी रुपये १४०००.०० लाख रक्कमेचा नवीन कार्यक्रम तसेच रुपये ५९३३.९७ लाख रक्कमेचा स्पील ओव्हर/कमीटेड कार्यक्रम अशा एकूण रुपये १९९३३.९७ लाख रकमेच्या वार्षिक आराखडयास संदर्भाधीन क्रमांक ३ च्या पत्रान्वये केंद्र शासनाने मंजूरी दिली आहे. त्यामुळे सन २०२२-२३ करिता एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाच्या रुपये १९९३३.९७ लाख रकमेच्या वार्षिक कृति आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्याची विनंती संचालक, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, पुणे यांनी संदर्भाधीन क्रमांक ४ च्या पत्रान्वये केली आहे.

कृषी उन्नती योजना- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान सन २०२२-२३ मध्ये राज्यात राबविण्यासाठी अर्थसंकल्पित केलेली तरतुद तसेच केंद्र शासनाने मंजूर केलेला वार्षिक कृती आराखडा विचारात घेता सदरहू योजनेची सन २०२२-२३ मध्ये अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्याची बाब विचाराधीन होती. त्याबाबत शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे.

राष्ट्रीय फलोत्पादन अभियान (MIDH); फुल शेती, फळबाग, मसाले पिके लागवड अनुदानासाठी अर्ज सुरू:

कृषी उन्नती योजना – एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान सन २०२२-२३ मध्ये राज्यात राबविण्यासाठी रुपये १९९३३.९७ लाख (रुपये एकशे नव्याण्णव कोटी तेहतीस लाख सत्याण्णव हजार फक्त) एवढया निधीच्या कार्यक्रमास खालीलप्रमाणे प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

(रक्कम रु. लाख)
प्रवर्गहिस्साअर्थसंकल्पिय तरतूद (सन २०२२-२३)आवश्यक प्रशासकीय मान्यता
सर्वसाधारण (८१%)केंद्र१२०००.००९६८७.९१
राज्य८०००.००६४५८.६१
एकूण२००००.००१६१४६.५२
अनुसुचित जाती (१०%)केंद्र१८४४.००११९६.०४
राज्य९००.००७९७.३६
एकूण२७४४.००१९९३.४०
अनुसुचित जमाती (९%)केंद्र१६५९.००१०७६.४३
राज्य६००.००७१७.६२
एकूण२२५९.००१७९४.०६
एकूणकेंद्र१५५०३.००११९६०.३८
राज्य९५००.००७९७३.५९
एकूण२५००३.००१९९३३.९७

सन २०२२-२३ मध्ये अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या वरील रुपये १९९३३.९७ लाख रक्कमेमध्ये सन २०२१-२२ मधील रुपये ५९३३.९७ लाख रक्कमेच्या स्पील ओव्हर/कमीटेड कार्यक्रमाचा समावेश आहे.

राष्ट्रीय फलोत्पादन अभियान (MIDH) सूचना:

1) कृषि उन्नती योजना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान राबविणेसाठी महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, पुणे हे अंमलबजावणी यंत्रणा म्हणून कार्यान्वित राहील. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार व वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार सदर अभियानाची अंमलबजावणी करण्यात यावी.

2) राज्य शासन सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी व्यवस्थापकीय संचालक तथा आयुक्त (कृषी), महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, पुणे यांना BDS प्रणालीद्वारे निधी वितरित करेल. सदर निधीचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांना PFMS प्रणालीद्वारे वितरण करावे व त्यांनी लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर PFMS प्रणालीद्वारे अनुदान जमा करावे.

3) सन २०२२-२३ करिता एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाचा मंजूर कृति आराखडा या शासन निर्णयासोबत “परिशिष्ट अ” म्हणून जोडला आहे. या कृति आराखड्यातील मंजूर घटकानुसार अभियानाची अंमलबजावणी करावी. यामध्ये मागील दायित्व प्राधान्याने पूर्ण करावे.

4) सदर योजनेसाठी उपलब्ध होणारा अर्थसंकल्पीत निधी केंद्र शासनाने विहित केल्याप्रमाणे सर्वसाधारण, अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती प्रवर्गासाठी पुढील लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा.

5) या अभियानाकरिता वितरित करण्यात येणारा निधी कोषागारातून आहरित करण्याकरिता लेखाधिकारी, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून आणि व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, तथा आयुक्त (कृषी), पुणे यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.

6) सदर योजनेंतर्गत वेळोवेळी उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या निधीच्या विनियोगाबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र आयुक्त (कृषी) यांनी शासनास सादर करावे.

7) या योजनेअंतर्गत वितरित करण्यात येणारा निधी जिल्हा स्तरावरुन खर्च करण्यात यावा.

फळबाग लागवड अनुदान (फलोत्पादन) योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया:

योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी आपला मोबाईल क्रमांक आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे. खालील संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर आधार क्रमांक टाकून फॉर्मर पोर्टल वर लॉगिन करा.

https://mahadbt.maharashtra.gov.in/

शेतकरी मोबाईल, संगणक/लॅपटॅाप/टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतीतील आपले सरकार केंद्र इ. माध्यमातून महाडीबीटी या संकेतस्थळावर अर्ज करू शकतात.

महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन झाल्यावर सर्व वैयक्तिक तपशील भरा आणि पुढे आपल्याला “अर्ज करा” वर क्लिक करायचे आहे.

फॉर्मर लॉगिनच्या अर्जामध्ये विविध योजनेचे पर्याय आहेत, पण आपणाला फळबाग लागवड अनुदान योजनेसाठी “फलोत्पादन” हा पर्याय निवडून “बाबी निवडा” वर क्लिक करा.

आता अर्जदारास तपशील प्रविष्ट करणे आवश्यक आहे आणि त्यानंतर जतन करा बटणावर क्लिक करणे आवश्यक आहे.

अप्लिकेशन सबमिट केल्यावर ते सबमिशनच्या पुष्टीकरणासाठी पॉप अप संदेश दर्शवितो. “ओके” बटणावर क्लिक केल्यावर ते पेमेंट वर पुनर्निर्देशित होईल जिथे अर्जदार पैसे भरण्यास सक्षम असेल. मेक पेमेंट बटणावर क्लिक केल्यास ते पेमेंट गेटवे पोर्टलकडे पुनर्निर्देशित होईल. पेमेंट केल्यानंतर अर्जदार पेमेंट पावतीची प्रिंट आउट घेऊ शकतो.

कृषी,पशुसंवर्धन,दुग्ध विकास व मत्स्य व्यवसाय विभाग शासन निर्णय :

सन 2022-23 मध्ये कृषी उन्नती योजना-एकात्मक फलोत्पादन विकास अभियान (MIDH) अंतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान राज्यात राबविण्यास प्रशासकीय मान्यता देणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा – महाडीबीटी पोर्टलवर फळबाग लागवड अनुदान (फलोत्पादन) योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरू, असा करा ऑनलाईन अर्ज

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.