वृत्त विशेषमहाराष्ट्र शासन निर्णय - GRसरकारी कामेसरकारी योजना

शिधावाटप/रास्त भाव दुकानांमध्ये भाजीपाला व फळे विक्रीसाठी ठेवण्यास प्रायोगिक तत्वावर परवानगी

रास्त भाव दुकानदारांचे उत्पन्न वाढावे यासाठी केंद्र तसेच राज्य शासनाकडून विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी विविध शासन निर्णयांद्वारे रास्त भाव दुकानांतून विविध उत्पादने/वस्तू विकण्यास परवानगी देण्यात आली आहे जेणेकरून रास्त भाव दुकानदार आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन त्यांच्या दैनंदिन कामकाजात स्थैर्य येईल. या उद्देशाने राज्य शासनाने विविध शासन निर्णयान्वये विविध प्रकारच्या वस्तू/उत्पादने/कृषिमाल शिधावाटप/रास्त भाव दुकानांमार्फत विकण्यास परवानगी दिलेली आहे. या धर्तीवर नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपनीस (F.P.O.) सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत शिधावाटप/रास्त भाव दुकानांमधून सभासद शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला भाजीपाला व फळे विक्रीसाठी प्रायोगिक तत्वावर परवानगी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शिधावाटप/रास्त भाव दुकानांमध्ये भाजीपाला व फळे विक्रीसाठी ठेवण्यास प्रायोगिक तत्वावर परवानगी:

१. शाश्वत कृषी विकास इंडिया शेतकरी उत्पादक कंपनी, पुणे या शेतकरी उत्पादक कंपनीस पुणे जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत रास्त भाव दुकानांमधून फार्म फिस्ट फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी लि., नाशिक या शेतकरी उत्पादक कंपनीस मुंबई – ठाणे शिधावाटप क्षेत्रातील ई – परिमंडळ व फ – परिमंडळ मध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत शिधावाटप दुकानांमार्फत शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला भाजीपाला व फळे विक्रीसाठी प्रायोगिक तत्वावर सहा महिन्यांकरिता परवानगी देण्यात येत आहे.

शिधावाटप/रास्त भाव दुकानांमध्ये भाजीपाला व फळे विक्रीसाठी अटी व शर्ती:

>

१) सदरची परवानगी रास्त भाव दुकानदारांचे उत्पन्न वाढावे या उद्देशाने देण्यात येत असल्यामुळे कंपनी रास्त भाव दुकानदारांवर कोणत्याही मालाच्या विक्रीची सक्ती करणार नाही.

२) कंपनी सदर शासन निर्णयातील परवानगी देण्यात आलेला माल/उत्पादने/वस्तू इ. व्यतिरिक्त इतर कोणत्याही बाबींची विक्री शासनाच्या परवानगीशिवाय करणार नाही.

३) केंद्र व राज्य शासनाच्या त्या त्या वेळी प्रचलित असलेल्या शासकीय नियमांनुसार त्यांचे पालन करण्यास संबंधित कंपनी बांधील असेल.

४) हा व्यवहार संबंधित कंपनी व त्यांचे घाऊक व किरकोळ वितरक आणि रास्त भाव दुकानदार यांमध्ये राहील. यामध्ये शासनाचा सहभाग अथवा हस्तक्षेप असणार नाही.

५) सदरची परवानगी अस्थायी तात्पुरत्या स्वरुपात देण्यात आली असून सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या स्वरुपात वेळोवेळी होणाऱ्या बदलाच्या अनुषंगाने त्यामध्ये बदल करता येईल. तसेच सदरची परवानगी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्याचा हक्क राज्य शासन राखून ठेवत आहे. शाश्वत कृषी विकास इंडिया शेतकरी उत्पादक कंपनी, पुणे यांनी उप आयुक्त (पुरवठा), पुणे भाग यांच्याकडे व फार्म फिस्ट फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी लि., नाशिक यांनी नियंत्रक शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई यांच्याकडे रु. १००/- च्या स्टॅम्प पेपर वर अटी व शर्ती मान्य असल्याचे हमीपत्र सादर करणे आवश्यक आहे.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग शासन निर्णय:

शेतकरी उत्पादक कंपनीस सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत शिधावाटप/रास्त भाव दुकानांमध्ये भाजीपाला व फळे विक्रीसाठी ठेवण्यास प्रायोगिक तत्वावर परवानगी देणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा – रेशनकार्डवर आपल्याला किती धान्य मिळते हे ऑनलाईन कसे तपासायचे? जाणून घ्या सविस्तर माहिती

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.