वृत्त विशेष

नवीन शेतीपंप वीज जोडणीसाठी, असा करा ऑनलाईन अर्ज

नवीन वीज धोरणानुसार ज्या कृषिपंपाचे अंतर लघुदाब वाहिनीपासून ३० मीटरच्या आत व वितरण रोहित्रावर पर्याप्त क्षमता उपलब्ध आहे, अशा सर्व नवीन कृषिपंपास १ महिन्याच्या आत वीज जोडणी देण्यात येईल. ज्या कृषीपंपाचे अंतर २०० मीटरच्या आत व वितरण रोहित्रावर पर्याप्त क्षमता उपलब्ध आहे अशा सर्व नवीन कृषीपंपास ३ महिन्याच्या आत एरियल बंच केबलद्वारे वीजजोडणी देण्यात येईल. तथापि त्याकरिता आवश्यक असणारी लघुदाब वाहिनी अर्जदारास सुरुवातीस स्वखर्चाने उभारावी लागणार आहे व त्याचा परतावा त्या ग्राहकाच्या वीजबिलामधून करण्यात येईल.

नवीन शेतीपंप वीज जोडणीसाठी ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया:

नवीन शेतीपंप वीज जोडणीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील महावितरणची वेब पोर्टल ओपन करा

https://www.mahadiscom.in/solar/AG_Policy/index_mr.php

महावितरणची वेब पोर्टल ओपन झाल्यावर त्यामध्ये वरील टॅब मध्ये “शेतीपंप ग्राहकांसाठी सुविधा” मध्ये “नवीन शेतीपंप वीज जोडणीसाठी अर्ज” या पर्यायावर क्लिक करा.

आता आपण पाहू शकतो “A-1 Application Form” असा फॉर्म ओपन होईल. यामध्ये खालील माहिती भरायची आहे.
नवीन शेतीपंप वीजपुरवठ्यासाठी “नवीन अर्जाची नोंदणी” हा पर्याय निवडायचा आहे, तसेच अगोदर पैसे भरून प्रतीक्षा यादीमध्ये प्रलंबित असल्यास दुसरा पर्याय निवडायचा आहे.

शेतीपंपासाठी भार प्रविष्ट करायचा आहे.

शेतीपंप वीजपुरवठ्यासाठी खालील पैकी “पारंपरिक वीज पुरवठा” योजना निवडायची आहे.

पुढे खालील पैकी एक पर्याय निवडून “मी/आम्ही अटी व शर्तींशी सहमत आहोत.” यावर क्लिक करून सबमिट बटन वर क्लिक करा.
पारंपरिक वीज पुरवठ्यासाठी येणारा प्रत्यक्ष खर्च, मी ना परतावा तत्वावर स्वतः करावयास तयार आहे व वीज जोडणीसाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधेचे काम पूर्ण झाल्यानंतर, मला वीज जोडणी उपलब्ध करून देण्यात येईल.

पारंपरिक वीज जोडणी साठी लागणाऱ्या निधीची तरतूद शासनातर्फे अथवा महसुली जमा रकमेनुसार उपलब्ध कृषी आकस्मिक निधी मधून होईपर्यंत मी प्रतीक्षा करेन. प्रतीक्षा यादीतील ज्येष्ठतेनुसार मला वीज जोडणी दिली जाईल.

पारंपरिक वीज पुरवठ्यासाठी येणारा एकूण खर्च सुरुवातीला स्वतः करून, प्रत्यक्ष खर्च व ६०० मी. अंतरापर्यंतच्या पायाभूत सुविधेसाठी लागणारा खर्च यापैकी कमी असणाऱ्या खर्चाचा परतावा मिळेल.

A-1 Application Form

सबमिट केल्यावर एक नोटिफिकेशन येईल ती वाचून तिथे ओके वर क्लिक करा.

पुढे “Individual” निवडून अर्जाचा तपशील, पावतीचा तपशील, कृषी माहिती, विनंती केलेला भार / कराराची मागणी / पुरवठा प्रकार,इत्यादी माहिती भरून ग्राहकाचे हमीपत्र वाचून क्लिक करा आणि “Generate OTP” वर क्लिक करून सेव्ह वर क्लिक करा.

अर्ज सेव्ह केल्यानंतर अप्लिकेशन नंबर मिळेल नंतर कागदपत्रे अपलोड करायची आहेत.

आपला अर्ज सबमिट झाल्यानंतर विदयुत अधिकारी पाहणी करून कोटेशन दिले जाईल. आपले जर ३० मीटर च्या आतील जर कनेक्शन असेल तर तात्काळ जोडणी करून दिली जाईल.

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.