कृषी योजनाजिल्हा परिषदमहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीवृत्त विशेषसरकारी कामेसरकारी योजना

‘पीएम किसान’ योजनेत ३१ जूलै पर्यंत ऑनलाईन ‘केवायसी’ करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन! – PMKisan eKYC

‘पीएम किसान’ योजनेचा लाभ घेत असलेल्या ; मात्र अद्याप ‘केवायसी’ (ग्राहकाची ओळख) न केलेल्या शेतकऱ्यांनी ३१ जूलै २०२२ पर्यंत ‘केवायसी’ ऑनलाईन करून घ्यावी. अन्यथा ‘केवायसी’ अभावी या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते. असे आवाहन ‘पीएम किसान’ योजनेचे जिल्हा समन्वयक अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्याची ऑनलाईन’केवायसी’ करण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम ‘मे २०२२’ पर्यंत राबविण्यात आली.

या मोहीमेस ३१ जूलै २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र अद्यापही जिल्ह्यातील लाभार्थ्याची ‘केवायसी’ प्रक्रिया पूर्ण झालेली नाही त्यांनी लवकरात लवकर केवायसी’ प्रक्रिया पूर्ण करावी.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पीएम किसानच्या संकेतस्थळावरील फॉर्मर कॉर्नर टॅब मध्ये किंवा ‘पीएम किसान’ अॅपमध्ये ओटीपी द्वारे लाभार्थीना स्वतः केवायसी प्रमाणीकरण मोफत करता येईल.

‘ग्राहक सेवा केंद्रा’वर १५ रूपयांच्या नाममात्र शुल्कात ‘केवायसी’ बायोमॅट्रिक पद्धतीने करता येईल. असे आवाहनही केले आहे.

हेही वाचा – PMKISAN नोंदणीकृत शेतकऱ्यांची OTP आधारित eKYC प्रोसेस घरबसल्या कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती (PMKisan OTP Based eKYC)

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.