वृत्त विशेषसरकारी योजनास्पर्धा परीक्षा

राजर्षी शाहू महाराज शिष्यवृती योजना – Rajarshi Shahu Maharaj Scholarship Scheme

परदेशातील नामांकित विद्यापिठामध्ये प्रवेश मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर व पी.एच.डी. अभ्यासक्रमाकरिता ही शिष्यवृती देण्यात येते.

योजनेच्या अटी व शर्ती:

  • महाराष्ट्राचा रहिवासी असावा
  • पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ३५ वर्षे पीएचडीसाठी ४० वर्षे ही कमाल वयोमर्यादा असेल.
  • विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ६ लाखापेक्षा जास्त नसावे.
  • जागतिक क्रमवारीमध्ये पहिल्या १०० विद्यापीठामध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना उत्पन्न मर्यादा लागू नाही.
  • परदेश शिष्यवृती योजनेअंतर्गत दोन वर्षे कालावधीचाच एमबीए अभ्यासक्रम अनुज्ञेय राहील.
  • भारतीय आयुर्विज्ञान परीषदेच्या संकेतस्थळावरील एमडी व एमएस अभ्यासक्रमच प्रवेशासाठी पात्र असणार आहे.
  • परदेशातील शिक्षण संस्था ही जागतिक क्रमवारीत ३०० च्या आत असावा

योजनेअंतर्गत लाभ:

  • विद्यार्थ्यांस वार्षिक निर्वाह भत्ता अमेरिका व इतर राष्ट्रांसाठी यु.एस. डॉलर १५ हजार ४०० तर यु.के. साठी जी.बी. पौंड ९ हजार ९०० इतका अदा करण्यात येतो.
  • विद्यार्थ्याला आकस्मिक खर्चासाठी यु. एस. ए. व इतर देशांसाठी यू.एस. डॉलर १ हजार ५०० तर यु. के साठी जी.बी. पौंड १ हजार १०० इतके देण्यात येतात.

संपर्क: अधिक माहितीसाठी जिल्हा समाज कल्याण आयुक्तालय येथे संपर्क साधावा.

हेही वाचा – महाडीबिटी शिष्यवृत्ती / फ्रीशीप योजनांकरिता ऑनलाईन अर्ज सुरु – Apply Online For Maha DBT Scholarship

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.