RTE 25% Online Admission 2024 : आरटीई राखीव प्रवेशाला आजपासून सुरवात !
शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाची प्रक्रिया अखेर प्राथमिक शिक्षण विभागाने सुरू केली आहे. बालकांच्या शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील प्रवेशासाठी पालकांना ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया मंगळवारपासून (ता. १६) सुरू होणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार (आरटीई) आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. त्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागातर्फे केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविली जाते, परंतु राज्य सरकारने आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाच्या प्रक्रियेत बदल केला आहे.
या नव्या बदलानुसार आता सरकारी किंवा अनुदानित शाळेच्या एक किलोमीटर परिसरात खासगी शाळा असेल, तर संबंधित शाळेत या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेश दिला जाणार नाही, असे निश्चित करण्यात आले.
त्यानुसार, आता राज्यात ही प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. आरटीईअंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाच्या मार्गदर्शक सूचना प्राथमिक शिक्षण विभागाने एप्रिलच्या सुरवातीला जाहीर केल्या होत्या. त्यात प्रवेश प्रक्रियेअंतर्गत शाळा प्रवेशाचा प्राधान्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यात, संबंधित बालकांच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरच्या अंतरावर अनुदानित, शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा नसतील, आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळा असेल तर अशा परिस्थितीत त्या स्वंयअर्थसहाय्यित शाळेत मुलांना २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश मिळेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरवर्षी राज्यातील लाखो पालक आरटीईअंतर्गत होणाऱ्या या प्रवेश प्रक्रियेच्या प्रतीक्षेत असतात, परंतु यंदा एकूणच प्रवेश प्रक्रियेला झालेला विलंब आणि त्यातही कायद्याच्या तरतुदीत केलेला बदल यामुळे पालक हवालदिल झाले होते. अखेर शिक्षण विभागाने ही प्रवेश प्रक्रिया जाहीर केल्याने पालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
RTE 25% Admission Guidelines : आरटीई प्रवेशाबाबत प्राथमिक शिक्षण विभागाकडून मार्गदर्शक सूचना !
प्राथमिक शिक्षण विभागाने आरटीई अंतर्गत २५ टक्के (RTE 25% Admission) राखीव जागांवरील प्रवेशाच्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या त्यानुसार वंचित, दुर्बल, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना २५ टक्के राखीव जागांअंतर्गत महापालिका, नगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायत, कॅन्टोमेंट बोर्ड, जिल्हा परिषद (प्राथमिक), महापालिका (स्वयंअर्थसहाय्यित), जिल्हा परिषद (माजी शासकीय), खासगी अनुदानित (अंशत: अनुदानित वगळून) आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये प्रवेश मिळणार आहे.
यामध्ये अपवादात्मक परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरच्या आत अनुदानित शाळा, सरकारी शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळा नसल्यास तीन किलोमीटरच्या अंतरावरील शाळांमध्ये प्रवेश घेण्यास प्राधान्य दिले जाईल. विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून, शिक्षण विभागाने सांगितले आहे.
RTE 25 टक्के नावनोंदणीनुसार प्राधान्य देताना सर्व प्रकारच्या शाळा जसे की अनुदानित शाळा, सरकारी/स्थानिक संस्था शाळा आणि विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून एक किलोमीटर अंतरावरील स्वयं-वित्तपोषण शाळा उपलब्ध असतील. शाळांना प्राधान्य दिले आहे. त्यानुसार लवकरच प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
RTE 25% प्रवेशाबाबत पालकांसाठी महत्त्वाचे:
- पालकांना अनुदानित शाळांऐवजी शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांची निवड करता येणार.
- यापूर्वी आरटीईअंतर्गत प्रवेश घेतला असल्यास त्यांना पुन्हा अर्ज करता येणार नाही.
- अर्ज भरताना चुकीची माहिती भरून प्रवेश घेतल्यास प्रवेश रद्द होईल.
- पालकांनी आरटीई पोर्टलवरील माहितीवर लक्ष ठेवावे.
असा असेल क्रम
- अनुदानित शाळा.
- शासकीय शाळा/स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा.
- स्वंयअर्थसहाय्यित शाळा.
RTE 25% प्रवेशासाठी कागदपत्रे:
- निवासी पुरावा.
- भाडेतत्त्वावर राहणाऱ्यांसाठी भाडेकरार.
- जन्मतारखेचा पुरावा.
- जात प्रमाणपत्र पुरावा.
- उत्पन्नाचा दाखला.
- छायाचित्र.
३० एप्रिलपर्यंत भरता येणार अर्ज
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील प्रवेश प्रक्रिया जाहीर झाली आहे. या प्रवेश प्रक्रियेत शाळा नोंदणी आणि शाळांची पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून, आता २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाकरिता पालकांना मंगळवारपासून (ता. १६) ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. पालकांना ३० एप्रिलपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत, अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली.
Rte २५ % प्रवेश सन २०२४-२५ साठी ऑनलाईन अर्ज पोर्टल:
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील महाराष्ट्र शालेय शिक्षण RTE २५% आरक्षण प्रवेश पोर्टलला भेट द्या.
https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new
हेही वाचा – RTE 25% Admission Guidelines : आरटीई प्रवेशाबाबत प्राथमिक शिक्षण विभागाकडून मार्गदर्शक सूचना !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!