सरपंच व उपसरपंचांचे मानधन दुप्पट; शासन निर्णय जारी !
सरपंच व उपसरपंच यांचे मानधन (Sarpanch Upsarpanch Mandhan Duppat) दुप्पट केले असून, त्याबाबत शासन निर्णय जारी केला आहे. महाराष्ट्रातील सरपंच संघटना व लोकप्रतिनिधी यांनी वेळोवेळी केलेल्या मागणीनुसार व काळाच्या ओघात महागाई निर्देशांकात झालेली वाढ, कर्तव्यात झालेली वाढ विचारात घेऊन तसेच सरपंच संघटनांच्या आझाद मैदान येथिल आंदोलनकर्त्यांना मा. मंत्री (ग्राम विकास) यांनी सरपंच व उपसरपंचांच्या मानधनात वाढ करण्याबाबत दिलेल्या आश्वासनच्या अनुषंगाने सरपंच व उपसरपंचांच्या मानधनात वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होता. ग्रामपंचायतीची लोकसंख्यानिहाय वर्गवारी विचारात घेऊन सरपंच व उपसरपंचांना खालीलप्रमाणे दरमहा मानधन देण्यात येत होते.
सरपंच व उपसरपंचांचे मानधन दुप्पट ! Sarpanch Upsarpanch Mandhan Duppat:
मंत्री श्री.महाजन म्हणाले की, राज्यातील सरपंच व उपसरपंच यांचे मानधन दुप्पट (Sarpanch Upsarpanch Mandhan Duppat) करण्यात आले असून ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या 2000 पर्यंत आहे त्या सरपंचाचे मानधन रु. 3000 वरुन रु. 6000. तर उपसरंपचाचे मानधन 1000 रुपये वरुन 2000 रुपये करण्यात आले आहे. ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या 2000 ते 8000 पर्यंत आहे त्या सरपंचाचे मानधन रु. 4000 वरुन रु. 8000. तर उपसरपंचाचे मानधन 1500 वरुन रु. 3000 करण्यात आले आहे.ज्या ग्रामपंचायतींची लोकसंख्या 8000 पेक्षा जास्त आहे त्या सरपंचाचे (Sarpanch Upsarpanch Mandhan Duppat) मानधन 5000 रु. वरुन 10,000 रु. तर उपसरपंचाचे मानधन 2000 रुपये वरुन 4000 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.या मानधनवाढीपोटी राज्य शासनावर वार्षिक 116 कोटी रुपयांचा आर्थीक भार येणार आहे.
ग्रामपंचायतींची लोकसंख्यानिहाय वर्गवारी | सरपंचांना मानधनाची दरमहा रक्कम (रुपये) | उपसरपंचांना मानधनाची दरमहा रक्कम (रुपये) | शासन अनुदान टक्केवारी | सरपंचांसाठी शासन अनुदानाची रक्कम | उपसरपंचांसाठी शासन अनुदानाची रक्कम |
अ) ० ते २००० पर्यंत लोक संख्येच्या ग्रामपंचायती | ३,०००/- | १,०००/- | ७५.००% | २,२५०/- | ७५०/- |
ब) २००१ ते ८००० पर्यंत लोकसंख्येच्या ग्रामपंचायती | ४,०००/- | १,५००/- | ७५.००% | ३,०००/- | १,१२५/- |
क) ८००१ पेक्षा जास्त लोक संख्येच्या ग्रामपंचायती | ५,०००/- | २,०००/- | ७५.००% | ३,७५०/- | १,५००/- |
ग्रामपंचायतीची लोकसंख्यानिहाय वर्गवारी विचारात घेऊन सरंपचांना आणि उपसरपंचांना खालीलप्रमाणे दरमहा (Sarpanch Upsarpanch Mandhan Duppat) मानधन अनुज्ञेय राहील.
ग्रामपंचायतींची लोकसंख्यानिहाय वर्गवारी | सरपंचांना मानधनाची दरमहा रक्कम (रुपये) | उपसरपंचांना मानधनाची दरमहा रक्कम (रुपये) | सरपंचांसाठी शासन अनुदानाची रक्कम | उपसरपंचांसाठी शासन अनुदानाची रक्कम |
अ) ० ते २००० पर्यंत लोक संख्येच्या ग्रामपंचायती | ६,०००/- | २,०००/- | ४,५००/- | १,५००/- |
ब) २००१ ते ८००० पर्यंत लोकसंख्येच्या ग्रामपंचायती | ८,०००/- | ३,०००/- | ६,०००/- | २,२५०/- |
क) ८००१ पेक्षा जास्त लोक संख्येच्या ग्रामपंचायती | १०,०००/- | ४,०००/- | ७,५००/- | ३,०००/- |
सरपंच व उपसरपंच यांना देण्यात येणा-या मानधनावरील खर्चापैकी ७५% खर्च शासन उचलेल व उर्वरित २५% मानधनाची रक्कम संबंधित ग्रामपंचायत स्वनिधीमधून देईल. प्रस्तुत शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून सुधारित मानधन अनुज्ञेय राहील. तसेच पुर्वीच्या शासन निर्णयातील इतर अटी कायम राहतील.
ग्राम विकास विभाग शासन निर्णय – Sarpanch Upsarpanch Mandhan Duppat GR :
सरपंचांच्या व उपसरपंचांच्या मानधनात वाढ करण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
पुढील लेख देखील वाचा!
- ग्रामपंचायतीचे काम कसे चालते? सरपंच, उपसरपंच व सदस्यांना मानधन किती? ग्रामस्थ म्हणून गावच्या विकास कामात कसं सहभागी व्हायचं आणि विकासकामांवर लक्ष कसे ठेवायचं? जाणून घ्या सविस्तर माहिती
- आपल्या गावासाठी सरकारने दिलेला निधी ग्रामपंचायतीने कुठे खर्च केला? ग्रामपंचायतीच्या विकासकामांवर लक्ष कसं ठेवायचं? जाणून घ्या सविस्तर माहिती
- एका ग्रामपंचायतीला दरवर्षी किती निधी मिळतो? सरपंच गावाच्या विकासासाठी किती निधी गावात आणू शकतो? जाणून घ्या सविस्तर माहिती
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!