सेवा प्रवेश नियमानुसार टंकलेखन प्रमाणपत्र आवश्यक असलेल्या परीक्षांकरीता टंकलेखन कौशल्य चाचणी लागू
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित लिपिक-टंकलेखक (मराठी), लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) तसेच कर सहायक या टंकलेखन अर्हता आवश्यक असलेल्या दोन संवर्गाच्या परीक्षांकरीता टंकलेखन कौशल्य चाचणी (Typing Skill Test) लागू करण्याची बाब आयोगाच्या विचाराधीन होती.
यासंदर्भात संबंधित संवर्गाच्या सेवाप्रवेश नियमातील तरतुदी व इतर बाबींचा साकल्याने विचार करुन आयोगाकडून पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे.
(१) लिपिक-टंकलेखक (मराठी), लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) तसेच कर सहायक या तीन संवर्गातील पदभरतीकरीता संगणक प्रणालीवर आधारित स्वतंत्र टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्यात येईल.
(२) टंकलेखन कौशल्य चाचणी ही केवळ अर्हताकारी/पात्रता (Qualifying) स्वरुपाची असेल.
(३) लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे संबंधित संवर्गाच्या भरावयाच्या पदांच्या तीनपट उमेदवार टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता पात्र ठरविण्यात येतील.
(४) लिपिक-टंकलेखक (मराठी), लिपिक-टंकलेखन (इंग्रजी) व कर सहायक संवर्गाकरीता स्वतंत्रपणे टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्यात येतील. कर सहायक संवर्गाकरीता मराठी व इंग्रजी या दोन्ही चाचणीमध्ये अर्हताकारी/पात्र (Qualifying) ठरणे आवश्यक असेल.
(५) टंकलेखन कौशल्य चाचणीचा तपशील:
(६) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: संकीर्ण -२०१८/प्र.क्र.१८०/२८, दिनांक १३ जून, २०१९ अन्वये माजी सैनिक उमेदवारांना गट – क संवर्गातील पदावर नियुक्ती मिळाल्यास टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी नियुक्तीच्या दिनांकापासून २ वर्षांचा कालावधी व २ संधी अनुज्ञेय असल्यामुळे माजी सैनिक आरक्षणाचा दावा करणा-या उमेदवारांना टंकलेखन चाचणी अनिवार्य नाही.
(७) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक: अपंग २०१६/प्र.क्र.११६/१६ – अ, दिनांक १६ नोव्हेंबर, २०१६ अन्वये दिव्यांग उमेदवारांना लिपिक – टंकलेखक पदावर नियुक्ती मिळाल्यास टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी नियुक्तीच्या दिनांकापासून २ वर्षाचा कालावधी व २ संधी अनुज्ञेय असल्यामुळे पात्र दिव्यांग आरक्षणाचा दावा करणा-या उमेदवारांना टंकलेखन चाचणी अनिवार्य नाही.
(८) लेखनिक/सहायकाची मागणी करणा-या अंध/ अल्पदृष्टी उमेदवारांना त्यांच्या मागणीनुसार परिच्छेदाचे लेखन • सांगणारा व्यक्ती (Passage Dictator) उपलब्ध करुन देण्यात येईल. (लागू असेल त्याप्रमाणे)
(९) टंकलेखनातील त्रुटी/ चुकांसंदर्भात एकूण कळ अवनमन (Key Depression) च्या शेकडा प्रमाणात त्रुटी/चुका पात्रतेसाठी ग्राह्य धरण्यात येतील.
- टंकलेखन कौशल्य चाचणी करीता उपस्थित उमेदवारांना संगणक/किबोर्ड/इत्यादी हाताळताना सुलभता व्हावी, याकरीता उमेदवारांना प्रत्यक्ष चाचणी सुरु होण्यापूर्वी १० मिनिटांची सराव चाचणी देता येईल. त्यानंतर ३ मिनिटांचा विश्रांतीकाळ राहील व तदनंतर १० मिनिटांची प्रत्यक्ष चाचणी घेण्यात येईल.
- टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता उमेदवारांना संबंधित भाषेतील परिच्छेद तसेच सदर परिच्छेदातील कळ अवनमन संख्या उपलब्ध करुन देण्यात येईल.
- लिपिक – टंकलेखक (मराठी/ इंग्रजी) व कर सहायक संवर्गाच्या सेवाप्रवेश नियमातील तरतुदीनुसार प्रस्तुत पदांकरीता टंकलेखन प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
- प्रस्तुत कार्यपध्दत सन २०२१ मध्ये यापुढे प्रसिध्द होणा-या जाहिरातीपासून लागू राहील.
लिपिक टंकलेखक व कर सहायक या पदांच्या भरतीसाठी मुख्य परीक्षेनंतर घ्यावयाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीचे निकष व सविस्तर कार्यपद्धत आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. pic.twitter.com/CPz165x4wN
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) November 16, 2021
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!