महाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेषसार्वजनिक आरोग्य विभाग

गर्भधारणापूर्व माता व २ वर्षांपर्यंतच्या बालकांसाठी वात्सल्य उपक्रमाची राज्यात अंमलबजावणी

माता आणि बालमृत्यू कमी करण्यासाठी गर्भधारणेपूर्वीपासून ते शिशु दोन वर्षांचे होईपर्यंतचा कालावधी हा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यानुषंगाने गर्भधारणापूर्व, प्रसूतीपूर्व, प्रसूतीदरम्यान आणि प्रसूतीनंतर माता व बालसंगोपनाचे विविध कार्यक्रम राज्यात राबविण्यात येत आहेत. गर्भधारणेपूर्वीपासून महिलांच्या आरोग्यावर विशेष लक्ष केंद्रित करणे, गर्भधारणेपूर्वीपासून ते शिशु दोन वर्षांचे होईपर्यंत आरोग्य सुविधांचे- सेवांचे सातत्य राखणे, गर्भधारणापूर्व आरोग्य सुविधा अधिक बळकट करण्याबरोबरच इतर आरोग्य सुविधांचे एकत्रीकरण आणि पोषण व आहारविषयक कार्यक्रमांशी समन्वय साधून गर्भधारणेपूर्वीच मातांचे आरोग्य आणि कमी वजन यामध्ये सुधारणा करून गर्भधारणेसाठी आणि गर्भातील शिशुसाठी पोषक वातावरण निर्माण करणे, प्रसूतीपूर्व कालावधीत आणि प्रसूतीपश्चात कालावधीत दोन वर्षांपर्यंत नवजात शिशु व बालक यांच्या वाढीच्या निर्देशांकावर सातत्यपूर्ण लक्ष ठेवून अपेक्षित वाढ होण्यासाठी व आरोग्य निरोगी राहण्यासाठी विशेष लक्ष देणे, जननक्षम जोडप्यांच्या आरोग्यात सकारात्मक बदल करून कमी वजनाच्या बालकांच्या जन्माचे प्रमाण आणि जन्मजात व्यंग असलेल्या बालकांचे प्रमाण कमी करणे व कमी वजनाच्या बालकांचे जन्म रोखून आणि दोन वर्षापर्यंतच्या शिशुच्या आयुष्यातील महत्त्वाच्या कालावधीत सातत्यपूर्ण विशेष लक्ष देऊन नवजात मृत्यू व बालमृत्यू कमी करणे या बाबींवर लक्ष केंद्रीत करून प्रसूतीदरम्यान आणि प्रसूतीनंतर माता व बालसंगोपनाच्या विविध कार्यक्रमांचे एकत्रिकरण करून “वात्सल्य” हा एकछत्री कार्यक्रम नाशिक जिल्ह्यातील दोन तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर माहे एप्रिल, २०१८ पासून राबविण्यात आला. त्यामध्ये मिळालेल्या सकारात्मक परिणामांमुळे या कार्यक्रमाची अंमलबजावणी संपूर्ण राज्यात करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

गर्भधारणापूर्व माता व २ वर्षांपर्यंतच्या बालकांसाठी वात्सल्य उपक्रमाची राज्यात अंमलबजावणी शासन निर्णय :-

राज्यात गर्भधारणापूर्व, प्रसूतीदरम्यान आणि प्रसूतीनंतर माता व २ वर्षांपर्यंतच्या बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी पुढीलप्रमाणे “वात्सल्य” या नवीन उपक्रमाची अंमलबजावणी राज्यात करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे

कार्यक्रमाची उद्दिष्टे :-

>
  • कमी दिवसांचे आणि कमी वजनी बालकांच्या जन्माचे प्रमाण कमी करणे.
  • जन्मतः विकृतीचे प्रमाण कमी करणे.
  • उपजत मृत्यू प्रमाण कमी करणे.
  • निरोगी गर्भधारणा आणि प्रसूतीसाठी माता आरोग्यात सुधारणा करणे.
  • गर्भधारणेपूर्वीच मातेच्या आरोग्याची जोखीम ओळखणे व पाठपुरावा करणे.
  • बालकाच्या हजार दिवसाच्या वाढीची सातत्यपूर्ण देखरेख करणे.

कार्यक्रमाचे अपेक्षित लाभार्थी :-

  • कुटुंब नियोजन साधन न वापरणारी असंरक्षित जननक्षम योग्य जोडपी.
  • प्रसूतीपूर्व कालावधीतील माता आणि गरोदर महिलांच्या सहवासात सोबत करणारी व्यक्ती
  • दोन वर्षाखालील शिशु

कार्यक्रमातील निर्धारित आरोग्य सेवा :-

  • या कार्यक्रमात प्राधान्याने गर्भधारणापूर्व आरोग्य तपासणी सेवांचा अंतर्भाव असून सदर सेवा प्रचलित इतर आरोग्य कार्यक्रमांशी संलग्नित केलेली आहे.
  • कुटुंबनियोजन साधन न वापरणाऱ्या असंरक्षित जननक्षम जोडप्यांची तपासणी, उपचार आणि समुपदेशन सुविधा.
  • माता व बालकांना आरोग्यासाठी असलेली जोखीम गर्भधारणापूर्व, प्रसूतीदरम्यान आणि प्रसूतीनंतर कालावधीत ओळखणे व त्यांचे प्रभावी व्यवस्थापन.
  • मातांची वजन वाढ आणि बालकांची योग्य वाढ यावर नियमित देखरेख.
  • विशेष लक्ष- जन्मतः तात्काळ स्तनपान, जन्म ते सहा महिन्यापर्यंत निव्वळ स्तनपान आणि योग्य पुरक आहार याबाबत सनियंत्रण.
  • बालकांच्या वजन वाढीचे वाढीच्या आलेखाद्वारे सनियंत्रण.
  • आरोग्याचे इतर कार्यक्रम उदा. माँ, दक्षता, एच.बी.एन.सी. एच.बी.वाय.सी, पी.एम.एस.एम.ए. आर.के.एस.के. इत्यादी कार्यक्रमांचे समन्वय.
  • माता आणि बालकांच्या आरोग्याच्या सुविधांचे बळकटीकरण करण्यासाठी आय.सी.डी.एस. डब्ल्यू.सी.डी, आदिवासी विकास विभाग व इतर विभागांचा सहभाग.

वात्सल्य कार्यक्रमात प्राधान्याने समाविष्ट करण्यात आलेल्या बाबी :-

  • गर्भधारणापूर्व रक्तक्षय प्रतिबंध व रक्तक्षय उपचार करणे.
  • गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व मातांना रक्तक्षय प्रतिबंध करणे व रक्तक्षय असणा-या मातांवर लोहयुक्त गोळया व /MMS उपचार करणे.
  • तंबाखू, मिश्री व दारू यांचे सेवन न करणेबाबत सल्ला व समुपदेशन.
  • किशोरवयीन मुली गरोदर राहण्यापासून रोखणे व दोन गरोदरपणातील अंतर जास्तीत जास्त ठेवणेसाठी प्रोत्साहित करणे यासाठी कुटुंबनियोजनाबाबत समुपदेशन व जोडीदाराचे समुपदेशन.
  • प्रजनन मार्ग जंतुसंसर्ग व एच. आय. व्ही. होऊ नये म्हणून प्रतिबंध व उपचार करणे.
  • गर्भधारणेपूर्व रक्तदाब, मधुमेह, हायपोथायरॉईड, हदयरोग, रक्तक्षय व रक्तासंबंधी गुंतागुंत आजारांचे निदान, उपचार व व्यवस्थापन करणे.
  • अतिजोखिमेच्या मातांचे लवकर निदान, सतत पाठपुरावा व लवकर उपचार करणे.
  • नवजात शिशु व बालक यांना घरोघरी जाऊन भेटी देण्याचे प्रमाण वाढवणे व गुणवत्तापूर्ण सेवा देणे.
  • नवजात शिशु जन्मतः स्तनपान, निव्वळ स्तनपान व योग्य वेळी पुरक आहार देण्याबाबत खात्री करणे.

वात्सल्य कार्यक्रम अंमलबजावणीचे टप्पे :-

  • प्रशिक्षण व पुर्नप्रशिक्षण समुदाय आरोग्य अधिकारी / वैद्यकीय अधिकारी/आशा/अंगणवाडी सेविका/आरोग्य सेविका यांना नियमित प्रशिक्षण व पुनर्प्रशिक्षण देणे.
  • जननक्षम जोडपी सर्वेक्षण आणि असंरक्षित जननक्षम जोडपी (कुटुंब नियोजन साधने न वापरणारी) नोंदणी नियमित दरमहा पाठपुरावा करून नवीन नोंदणी करणे.
  • नोंदणी केलेल्या महिलांची आरोग्य तपासणी, आरोग्य सेवा सत्र / घरोघरी भेट देणे /MAA कार्यक्रम/RKSK/HWCशिबिरे / मानव विकास मिशन तज्ञ शिबिरे.
  • महिला व बाल विकास विभाग, आदिवासी विकास विभाग, शिक्षण विभाग व ग्रामपंचायत इत्यादी विभागांशी समन्वय व त्यांच्या सेवांचा वापर.
  • गर्भधारणापूर्व, गरोदरपणात व प्रसुती नंतर मातांच्या व नवजात शिशुंची २ वर्षापर्यत ठराविक निर्देशांकाबाबत पाठपुरावा करणे.

“वात्सल्य” कार्यक्रमाच्या फलनिष्पतीकरिता निर्देशांक खालीलप्रमाणे :-

अ) प्रक्रियेबाबत निर्देशांक (Process Indicators) :-

  • असंरक्षित जोडपे आणि नोंदणी संख्या.
  • पात्र जोडप्यांमधील असंरक्षित जोडप्यांच्या वयाची टक्केवारी.
  • अपेक्षित योग्य जोडप्यामधील गर्भधारणापूर्व नोंदणी झालेल्या महिलांची टक्केवारी.
  • Unmet need असलेली जोडपी संख्या.
  • गर्भधारणापूर्व BMI १८.५ पेक्षा कमी असलेल्या महिलांची संख्या.
  • असंरक्षित जोडप्यांची BMI १८.५ पेक्षा कमी असलेल्यांची टक्केवारी.
  • असंरक्षित जोडप्यांची BMI २५.५ पेक्षा जास्त असलेल्यांची टक्केवारी.
  • अति जोखमीचे निदान झालेल्या महिलांची टक्केवारी.
  • कुटुंबनियोजन साधनांच्या वापराबाबत सल्ला दिलेल्या १९ वर्षाच्या आतील महिलांची टक्केवारी.
  • Folic acid/MMN/FS/ Injectables सेवा घेतलेल्या महिलांची चालू महिन्यातील टक्केवारी.
  • एचबी तपासणी केलेल्या महिलांची टक्केवारी.
  • रक्तक्षय निदान झालेल्या महिलांची टक्केवारी.
  • तीव्र रक्तक्षय निदान झालेल्या महिलांची टक्केवारी.
  • RTI/STI आजाराचे निदान झालेल्या महिलांची टक्केवारी.
  • उच्च रक्तदाब आजाराचे निदान झालेल्या महिलांची टक्केवारी.
  • मधुमेह आजाराचे निदान झालेल्या महिलांची टक्केवारी.
  • तंबाखू / मद्य व्यसनाधीन महिलांची टक्केवारी.
  • Hyperthyroidism निदान झालेल्या महिलांची टक्केवारी.
  • Hemoglobinopathies निदान झालेल्या महिलांची टक्केवारी.
  • गरोदरपणापूर्व अति जोखमीचे घटक आढळलेल्या महिलांची टक्केवारी.
  • Behavioral Change Counselling (BCC) सेवा मिळालेल्या महिलांची टक्केवारी.
  • जिल्ह्यात चालू महिन्यात योग्य जोडप्यांची झालेली शिबिरे/संमेलने संख्या.
  • आरोग्य वर्धिनी केंद्रात चालू महिन्यात योग्य जोडप्यांची झालेली शिबिरे/संमेलने संख्या.
  • आशा कार्यकर्ती कार्यक्षेत्रात चालू महिन्यात योग्य जोडप्यांची झालेली शिबिरे/संमेलने संख्या.
  • चालू महिन्यात एकूण झालेले प्रशिक्षण, पुर्नप्रशिक्षण व उपस्थितांची संख्या.

ब) परिणामांबाबत निर्देशांक (Outcome Indicators):-

  • कमी BMI असलेल्या महिलांचे प्रसूतिपूर्व नॉर्मल BMI झालेल्या महिलांची टक्केवारी.
  • अति जोखमीच्या महिला ज्यांनी गर्भनिरोधक पध्दतीचा वापर करून गर्भधारणा लांबवली त्यांची टक्केवारी.
  • १९ वर्षापेक्षा कमी वय असलेल्या गरोदर महिलांची टक्केवारी.
  • RTI/STI आजाराचे निदान होऊन उपचार झालेल्या महिलांची संख्या.
  • दीर्घकालीन आजाराचे निदान होऊन तज्ञांनी उपचार घेत असलेल्या महिलांची संख्या.
  • जोखीम आटोक्यात येईपर्यंत गर्भनिरोधक साधनांचा वापर करून गर्भधारणा पुढे ढकलेल्या महिलांची संख्या.
  • गर्भधारणेपूर्वी तंबाखू / मद्य व्यसन थांबविलेल्या महिलांची संख्या.
  • गरोदरपणात १० ते १२ kg वजन वाढलेल्या महिलांची टक्केवारी.
  • कमी वजनाच्या बालकास जन्म दिलेल्या नोंदणीकृत महिलांची टक्केवारी.
  • मुदतपूर्व प्रसूती झालेल्या नोंदणीकृत महिलांची टक्केवारी.
  • उपजत मृत्यू (still birth) झालेल्या नोंदणीकृत महिलांची टक्केवारी.
  • अनुवांशिक व्यंग असलेल्या बालकास जन्म देणाऱ्या नोंदणीकृत महिलांची टक्केवारी.
  • सहा महिन्यांनातर पुरक आहार सुरू केलेल्या बालकांची टक्केवारी.
  • पोषण पुनर्वसन केंद्रात दाखल केलेल्या सहा महिन्यापेक्षा कमी असलेल्या कुपोषित बालकांची टक्केवारी.
  • घरी व रुग्णालयात KMC मिळालेल्या कमी वजनाच्या बालकांची टक्केवारी.
  • ४० आठवड्यापर्यंत Iron, Calcium व Vit-D मिळालेल्या कमी वजनाच्या बालकांची टक्केवारी.
  • १००० दिवसांच्या वाढीच्या निरीक्षणामध्ये SUW व SAM मध्ये गेलेल्या बालकांची टक्केवारी.
  • HBNC व HBYC मध्ये नोंदणी केलेल्या अति जोखमीच्या बालकांची टक्केवारी.
  • BF/HA/LHVs यांच्यामार्फत आठवडी HBNC व HBYC अहवाल झाला आहे का?
  • वात्सल्य कार्यक्रमात नोंदणी झाल्यापासून प्रथम तिमाहीमध्ये गरोदर राहिलेल्या पात्र महिलांची टक्केवारी.
  • गर्भधारणापूर्वी Folic acid पुरवठा मिळालेल्या महिलांची टक्केवारी.
  • आठ आठवड्यांच्या आत गर्भावस्थेचे निदान केलेल्यांची टक्केवारी.

क) प्रभाव निर्देशांक (प्रभाव निर्देशक):-

  • कमी वजनाच्या बालकांमध्ये घट.
  • उपजत मृत्युमध्ये घट.
  • मुदतपूर्व प्रसूतीमध्ये घट.
  • अनुवांशिक व्यंग असलेल्या बालकांमध्ये घट.
  • १००० दिवसांच्या SUW व SAM मध्ये जाणाऱ्या बालकांमध्ये घट.
  • वेळेवर पुरक आहार मिळालेल्या बालकांच्या संख्येत वाढ.
  • दोन प्रसूतीमधील अंतरामध्ये वाढ.

सदर कार्यक्रमाची अंमलबजावणी व संनियंत्रण अतिरिक्त संचालक, आरोग्य सेवा, कुटुंब कल्याण, पुणे यांनी करावे. तसेच सदर कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा निर्देशांकनिहाय अहवाल दरमहा शासनास सादर करण्यात येईल.

सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय : गर्भधारणापूर्व माता व २ वर्षांपर्यंतच्या बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी वात्सल्य या नवीन उपक्रमाची राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – निरोगी पिढीसाठी माता बाल आरोग्य योजना – Maternal Child Health Scheme

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.