मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजने अंतर्गत 7.5 एचपी पंपाचे पुरवठादार (Vendor) निवड प्रक्रिया सुरू, जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया

या लेखामध्ये मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेच्या संदर्भातील महत्वपूर्ण अद्यतनित माहिती पाहणार आहोत. आपण सप्टेंबर २०२० मध्ये मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजने अंतर्गत 7.5 एचपी पंपासाठी अर्ज भरले होते. बऱ्याच शेतकऱ्यांना पेमेंटचे ऑप्शन येऊन त्यांची पेमेंट केले होते आणि आता बऱ्याच जणांना आतुरता आहे ती पुरवठादार (Vendor) निवडीची. २६ जानेवारी पासून पुरवठादार (Vendor) निवडीची प्रक्रिया होईल अशी माहिती देण्यात आली होती परंतु थोडी दिरंगाई झाली होती, पण आता 7.5 एचपी पंपाचे विक्रेता निवड प्रक्रिया सुरु झाली आहे, हे पुरवठादार (Vendor) निवड कसे करायचे ते आपण पाहूया.

7.5 एचपी पंपाचे पुरवठादार (Vendor) निवड प्रक्रिया:

मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजने अंतर्गत 7.5 एचपी पंपाचे पुरवठादार (Vendor) निवड प्रक्रिया करण्यासाठी सर्वप्रथम खालील महावितरणच्या वेबसाईट वर जा. वेबसाईट ओपन झाल्यावर वरती आपली मराठी भाषा निवडा.

https://offgridagsolarpump.mahadiscom.in/AGSolarPump/

आपली मराठी भाषा निवडल्यानंतर वेबसाईट स्क्रोल करून खाली विविध पर्याय दिसतील त्यामध्ये “आपल्या अर्जाची सद्यस्थिती जाणून घ्या” या पर्यायावर क्लिक करा.

आपल्या अर्जाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इथे “लाभार्थी क्रमांकाद्वारे शोधा” मध्ये लाभार्थी क्रमांक टाका आणि “शोधा” बटन वर क्लिक करा.

लाभार्थीच्या अर्जाची सद्यस्थिती “भरणा यशस्वी“ असेल तर पुरवठादार बटण सक्रिय केले जाईल व ओटीपी आधारित सिस्टम वापरुन उपलब्ध निवडसूचीतील पुरवठादार निवडता येईल.

लाभार्थी क्रमांक टाकून अर्जाची स्थिती मध्ये तुम्हाला पेमेंट भरून विक्रेता निवड हा ऑप्शन आला असेल तर आपण तिथे पुरवठादार (Vendor) निवडा असा ऑप्शन दाखवला जाईल.

पुढे आपल्याला आपल्या जिल्ह्याची पुरवठादार (Vendor) यादी दाखवली जाईल त्यामध्ये आपल्याला पाहिजे तो पुरवठादार (Vendor) निवडा.

पंप पुरवठादार (Vendor) निवडतांना जर कोणताही निवडसूचीतील पुरवठादार उपलब्ध नसल्यास, त्या मंडळासाठी त्या क्षमतेच्या पम्पाची निर्धारित केलेली संख्या शिल्लक नाही, असा संदेश लाभार्थीला दिसेल.

ऑन होल्ड दस्तऐवज पुन्हा अपलोड करा: लाभार्थीच्या अर्जाची सद्यस्थिती शोधताना; जर लाभार्थीसाठी सद्यस्थिती “ए 1 फॉर्म सबमिट केलेला आहे” असेल तर अर्जाची सद्यस्थिती टॅब खाली अपलोड दस्तऐवज टॅब दिसेल व लाभार्थ्याला त्याच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर प्राप्त झालेल्या एस.एम.एस. नुसार दस्तऐवज पुन्हा-अपलोड करावे लागतील.

लाभार्थीच्या अर्जाची सद्यस्थिती “संयुक्त सर्वेक्षण नंतर नकार” असेल तर कोटेशनची रक्कम परत मिळविण्यासाठी बँकेच्या तपशीलांसह बँक विवरण गोळा केले जाईल उदा. खाते क्रमांक, बँक आयएफएससी कोड. बँक विवरण ओटीपी आधारित प्रणाली वापरुन लाभार्थ्यांकडून गोळा केले जाईल.

पुरवठादार (Vendor) निवडल्यानंतर एक ओटीपी पाठवला जाईल तो सबमिट केल्यानंतर तुमचे पुरवठादार (Vendor) निवड प्रक्रिया पूर्ण होईल.

पुरवठादार (Vendor) निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पुरवठादार (Vendor) कंपनीच्या माध्यमातून सर्वे होतील त्यानंतर सर्वे मंजूर झाल्यावर आपल्या पंपाचे इन्स्टॉलेशनचे काम सुरु होईल.

मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत सर्व प्रमुख टप्प्यांसाठी लाभार्थीला त्याच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एसएमएस पाठविला जातो आणि त्याच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर ई-मेल पाठविला जातो. नोंदणीकृत मोबाइल नंबरमध्ये बदल करावयाचा असल्यास (ए 1 फॉर्म भरताना भरलेला ) संबंधित मंडळाच्या अधिक्षक अभियंता यांच्याशी संपर्क साधावा.

तक्रार नोंदविण्यासाठी सुविधा उपलब्ध आहेः तक्रार निवारण कॉल सेंटर नंबर 18001023435/18002333435 वर कॉल करा किंवा agsolar@mahadiscom.in वर ई-मेल पाठवा.

लाभार्थी महावितरण मोबाइल ऍपद्वारे अर्जाची सद्यस्थिती जाणून घेऊ शकतो. एक वेगळा टॅब ऑफ-ग्रिड सोलर ऍग्री पंप स्टेटस आहे जेथे लाभार्थी अर्जाची सद्यस्थिती जाणून घेऊ शकतो. जर एखाद्या अर्जाची सध्याची स्थिती “ए 1 फॉर्म नाकारला आहे” असेल तर अस्वीकार करण्याचे कारण देखील नमूद केलेले असते.

हेही वाचा – महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!