सरकारी योजनावृत्त विशेष

महावितरणच्या घरगुती वीजग्राहकांसाठी रुफटॉप सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी सरकारचं 40 टक्के अनुदान, महावितरण वीजही विकत घेणार, असा करा ऑनलाईन अर्ज – Apply Online for Solar Rooftop

महावितरणाच्या घरगुती वर्गवारीतील ग्राहकांसाठी (घरगुती, गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटना) छतावरील (रुफटॉप) सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी केंद्र शासनाकडून ४० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार आहे. सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणेमुळे मासिक घरगुती वीजबिलात मोठी बचत होणार आहे तर नेटमिटरिंगद्वारे महावितरणकडून वर्षाअखेर शिल्लक वीज देखील विकत घेतली जाणार आहे.

या योजनेसंदर्भात महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी काल आढावा घेतला आणि घरगुती वर्गवारीतील ग्राहकांना या योजनेचा लाभ देण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांनी तत्पर कार्यवाही करावी असे निर्देश त्यांनी दिले.

केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या रुफटॉप सौर योजना टप्पा दोन अंतर्गत महावितरणसाठी २५ मेगावॉटचे उद्दिष्ट मंजूर झाले आहे. या योजनेमधून घरगुती वर्गवारीतील ग्राहकांना किमान एक किलोवॅट क्षमतेची छतावरील (रुफटॉप) सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी केंद्र शासनाकडून वित्त सहाय्य देण्यात येणार आहे.

रुफटॉप सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी अनुदान:

 • घरगुती ग्राहकांसाठी १ ते ३ किलोवॅटपर्यंत ४० टक्के अनुदान.
 • गृहनिर्माण संस्था, निवासी संघटनांसाठी ३ किलोवॅटपेक्षा अधिक ते १० किलोवॅटपर्यंत २० टक्के अनुदान.

सामुहिक वापरासाठी ५०० किलोवॅटपर्यंत परंतु प्रत्येक घरासाठी १० किलोवॅट मर्यादेसह गृहनिर्माण रहिवासी संस्था (Group Housing Society) व निवासी कल्याणकारी संघटना (Residential Welfare Association) ग्राहकांना २० टक्के अनुदान मिळणार आहे.

महावितरणने रुफटॉप सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा आस्थापित करण्यासाठी परिमंडलनिहाय एजंन्सीजची नियुक्ती केली आहे. त्याची यादी व ऑनलाईन अर्जाची सोय महावितरणच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

रुफटॉप सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणेची किती असणार किंमत?

पाच वर्षांच्या देखभाल खर्चासह रुफटॉप सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणेसाठी १ किलोवॅट– ४६,८२०, १ ते २ किलोवॅट- ४२,४७०, २ ते ३ किलोवॅट- ४१,३८०, ३ ते १० किलोवॅट- ४०,२९० तसेच १० ते १०० किलोवॅटसाठी ३७,०२० रुपये प्रति किलोवॅट किंमत जाहीर करण्यात आली आहे.

 • १ किलोवॅट – ४६,८२०/
 • १ ते २ किलोवॅट – ४२,४७०/
 • २ ते ३ किलोवॅट – ४१,३८०/
 • ३ ते १० किलोवॅट – ४०,२९०/
 • १० ते १०० किलोवॅटसाठी – ३७,०२०/ रुपये प्रति किलोवॅट

उदा. या दराप्रमाणे ३ किलोवॅट क्षमतेसाठी सौर ऊर्जा यंत्रणेची १ लाख २४ हजार १४० रुपये किंमत राहील. त्यामध्ये ४० टक्के अनुदानाप्रमाणे ४९ हजार ६५६ रुपयांचे केंद्रीय वित्त सहाय्य मिळेल व संबंधीत ग्राहकास प्रत्यक्षात ७४ हजार ४८४ रुपयांचा खर्च करावा लागेल.

वीजबिलात दरमहा सुमारे 550 रुपयांची बचत:

रुफटॉप सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा कार्यान्वित केल्यानंतर दरमहा १०० युनिटपर्यंत वापर असलेल्या घरगुती ग्राहकांकडील एक किलोवॅट क्षमतेच्या सौर यंत्रणेमधून वीजबिलामध्ये सध्याच्या वीजदरानुसार दरमहा सुमारे ५५० रुपयांची बचत होऊ शकेल.

नेटमिटरिंगद्वारे ग्राहकांची वीज महावितरण विकत घेणार:

रुफटॉप सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणेला लावण्यात आलेल्या नेटमिटरिंगद्वारे वर्षाअखेर शिल्लक वीज प्रतियुनिटप्रमाणे महावितरणकडून विकत घेतली जाईल. त्याचाही आर्थिक फायदा संबंधीत घरगुती ग्राहकांना होणार आहे.

सौर यंत्रणा खर्चाची साधारणतः 3 ते 5 वर्षात परतफेड : 

सोबतच सौर यंत्रणा उभारणीच्या खर्चाची साधारणतः ३ ते ५ वर्षात परतफेड होणार आहे. दरमहा वीजबिलातील आर्थिक बचत तसेच पर्यावरणस्नेही ग्राहक म्हणून कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी महावितरणच्या घरगुती वर्गवारीतील वीजग्राहकांनी रुफटॉप सौर ऊर्जा योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

रुफटॉप सौरऊर्जा यंत्रणेसाठी ऑनलाईन अर्ज करा:

महावितरणने रुफटॉप सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा आस्थापित करण्यासाठी परिमंडलनिहाय एजंन्सीजची नियुक्ती केली आहे. त्याची यादी आणि ऑनलाईन अर्जाची सोय महावितरणच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – घरगुती छपरावरील रूफटॉप सोलर अनुदान योजना सुरु, असा करा ऑनलाईन अर्ज – Apply Online for Solar Rooftop

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

One thought on “महावितरणच्या घरगुती वीजग्राहकांसाठी रुफटॉप सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी सरकारचं 40 टक्के अनुदान, महावितरण वीजही विकत घेणार, असा करा ऑनलाईन अर्ज – Apply Online for Solar Rooftop

 • Joy bhavsar

  Ye roof solar panel ka kharch kitna 4+1 building ke liye

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.