वृत्त विशेषआपले सरकार - महा-ऑनलाईनसरकारी कामे

आधार सेंटर अर्ज सुरू; आवश्यक कागदपत्रे, पात्रता व अटी-शर्ती (कोल्हापूर जिल्हा)

शासकीय कार्यालयीन जागेत तात्पुरत्या स्वरुपात खाजगी आधार संच सुरु करणेसाठी अर्ज करणेबाबत महाराष्ट्र शासन माहिती व तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) विभाग यांच्याकडील पत्र व मा. जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या सुचने अन्वये कोल्हापूर जिल्ह्यातील निश्चित केलेल्या ठिकाणामधील शासकीय कार्यालयीन जागेत तात्पुरत्या स्वरुपात खाजगी आधार संच सुरु करण्याची कार्यवाही सुरु करण्यात येत असून दि. 01 नोव्हेंबर 2021 ते 10 डिसेंबर 2021 या कालावधीमध्ये कार्यालयीन वेळेत स्वतःचे खाजगी आधार संच असणाऱ्या इच्छूक ग्रामपंचायत अथवा आपले सरकार सेवा केंद्र चालक (VLE) यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर (टपाल शाखा)” येथे समक्ष कागदपत्रासह अर्ज जमा करणे बंधनकारक आहे. 10 डिसेंबर 2021 या अंतिम दिनांकानंतर आलेले कोणतेही अर्ज किंवा कागदपत्रे स्विकारले जाणार नाहीत.

सेंटर उभारणीसाठी आवश्यक सूचना व अर्जासोबत जोडण्याची कागदपत्रे:

१. स्वतःचा आधार संच असल्याबाबतचा व ते विवरण पत्रातील शासकीय जागेत सुरु करण्यास मान्य असलेले प्रतिज्ञापत्र (परिशिष्ठ अ).

२. शासकीय अधिकारी यांचे VLE च्या नावे परवानगी पत्र अथवा ना हरकत दाखला अथवा शासकीय जागेचे VLE च्या नावाचे करारपत्र

>

३. आधार कार्डची प्रत व रहिवासी पुरावा

४. आधार सुपर वायझर प्रमाणपत्र

५. १ जानेवारी २०२० ते 30 सप्टेंबर २०२१ अखेर आपले सरकार सेवा केंद्राची व्यवहारांची संख्या (Transaction Entry) gerar

६. वयाचा दाखला

७.जाहिरात प्रसिध्द झालेल्या दिनांकानंतरचे पोलिस अधिक्षक यांचेकडील चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र.

८. परिशिष्ठ अ व परिशिष्ठ ब

सेंटर उभारणीसाठी आवश्यक सूचना:

1. माहिती व तंत्रज्ञान विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील क्र.मातंसं 1717/ सीआर / 83/39 दिनांक 16/09/2017 रोजीच्या शासन निर्णयानुसार आधार केंद्र चालक हा स्वतः आपले सरकार सेवा केंद्राचा VLE असावा. त्या संदर्भातील KIOSK ID अर्जासोबत सादर करणे बंधनकारक राहील.

2. एका VLE /ग्रामपंचायतीच्या नांवे एका पेक्षा अधिक KIOSK ID असल्यास अशा VLE/ग्रामपंचायतीस एकच आधार केंद्र सुरु करण्याची परवानगी देण्यात येईल.

3. आधार सेंटर व परवानगी देताना खालीलप्रमाणे पसंतीक्रम देण्यात येईल.

a. ग्रामपंचायत स्वतः चालविण्यास तयार असेल.

b. ग्रामपंचायत मालकीचे गाळे असल्यास भाडेतत्वावर घेणार असेल.

c. शासकीय कार्यालय BSNL, MSEB व इतर शासकीय कार्यालय

d. ग्रामपंचायत स्वत: वगळून एकाच ठिकाणासाठी एका पेक्षा जास्त VLE नी अर्ज केल्यास त्यांच्या आधार केंद्र चालवण्याच्या अनुभवाच्या आधारे आणि आपले सरकार केंद्राच्या व्यवहारांच्या संख्येच्या आधारे पसंती क्रम देण्यात येईल.

4. विवरण पत्रातील शासकीय जागेत सुरु करणे संबंधी VLE च्या नावे संबंधित शासकीय अधिकाऱ्यांची मान्यता आणि जागा उपलब्ध असल्या संबंधी पत्र व कागदपत्र असणे आवश्यक राहील.

5. VLE अथवा ग्रामपंचायत यांचे स्वतःचे आधार संच असणे बंधनकारक आहे.

6. आधार केंद्रचालक यांचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मा. जिल्हा पोलिस अधिक्षक, कोल्हापूर यांचे देणे बंधनकारक राहील.

7. आधारचे कामकाज हे सकाळी 10 ते सांयकाळी 6 या कालावधीतच शासकीय कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी करणे बंधनकारक राहील.

8. आधार कॅम्प किंवा होम एनरॉलमेंटचे आदेश वरिष्ठ कार्यालयाकडून आपणास प्राप्त झाल्यास कोणतेही जादा आकारणी न करता आदेशाचे पालन करुन कामकाज करणे व संबंधित अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करणे बंधनकारक राहील.

9. UIDAI यांनी नेमून दिलेल्या आकारणीपेक्षा जास्त रक्कमेची आकारणी केल्यास किंवा इतर कोणतीही तक्रार आल्यास थेट UIDAI मार्फत अथवा नियंत्रण अधिकारी द्वारे कारवाई करण्यात येईल

10. खाजगी आधार संच हे शासकीय जागेमध्ये सुरु करण्यासाठी मान्यता मिळाल्यानंतर संबंधित Enrollment Agency यांना आवश्यक असणाऱ्या बाबींची पूर्तता (बँक गॅरंटी इ.) लवकरात लवकर पूर्ण करणे बंधनकारक राहील.

11. आधार संच सुरु झाल्यानंतर शासकीय जागेत आधार संच सुरु असल्याबाबतचा अहवाल संबंधित शासकीय अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे तात्काळ पाठविणे बंधनकारक राहिल.

12. आधार केंद्र हे एका VLE  कडून दुसऱ्या VLE कडे परस्पर हस्तांतरण करता येणार नाही.

13. VLE अथवा ऑपरेटर यांनी आधारचे कामकाज करताना जर काही चुका केल्या असतील तर त्या संबंधी लागणारे दंडात्मक रक्कम भरणेची जबाबदारी अथवा आधार कायद्यानुसार जी काही शिक्षा असेल ती संबंधित VLE अथवा ऑपरेटर यांची असेल.

14. आधार केंद्रांमध्ये दर्शनी भागात दरपत्रक व नियंत्रण अधिकारी (SPOC) यांची संपर्कासाठी माहितीचे फलक लावणे बंधनकारक राहील.

15. जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांचे परवानगी शिवाय शासकीय आधार केंद्राचे स्थलांतर परस्पर करता येणार नाही. असे आढळून आल्यास संबंधित केंद्र तात्काळ बंद करण्यात येईल व संबंधित केंद्र चालका विरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल.

16. आधार केंद्र हे जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांचे परवानगी खेरीज कायम स्वरुपी बंद करता येणार नाही.

17. आधार केंद्रावर फक्त आधार संबंधित कामकाज करण्यात येईल इतर कोणतेही कामकाज आढळल्यास त्या VLE वर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

18. महाआयटी व UIDAI यांचेकडून वेळोवेळी जे निर्देश प्राप्त होतील त्यांचे पालन करणे बंधनकारक राहील.

19. नमूद केलेले सर्व कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे. तसेच अर्ज छाननीचे अंतिम अधिकार हे नोडल अधिकारी आधार तथा निवासी उपजिल्हाधिकारी, कोल्हापूर यांचेकडे राहतील.

20. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर (टपाल शाखा) येथे समक्ष अर्ज कागदपत्रासह जमा करणे बंधनकारक आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम दिनांकानंतर आलेले कोणतेही अर्ज किंवा कागदपत्रे स्विकारले जाणार नाहीत.

21. अर्जदार यांना आधार केंद्र मंजूर झाल्यानंतर विहीत नमुन्यात नोटरी समोर करुन दिलेला करारनामा पूर्ण करून देणे बंधनकारक राहील.

सेंटर उभारणीसाठी आवश्यक अटी व शर्ती:

१. सदर शासकीय कार्यालयीन जागेतील खाजगी आधार संच सुरु करणेत येणारे केंद्र हे तात्पुरत्या स्वरूपाचे असेल.

२. व्दितीय पक्षकार नियमित केंद्र करण्याची मागणी करणार नाही.

३. हा करार जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्याकडून पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत लागू असेल.

४. सेवेचे उत्तर दायित्व जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्यावर राहणार नाही.

५. कामकाजामध्ये निष्काळजीपणा दाखविल्यास अथवा करारातील अटी व शर्तीचा भंग केल्यास सद करारनामा संपुष्टात येईल व व्दितीय पक्षकारास कोणतीही पूर्वसूचना न देता केंद्र रद्द करण्यात येईल.

६. शासनाच्या धोरणामध्ये भविष्यात बदल झाल्यास, त्या धोरणानुसार या प्रकरणी कार्यवाही करण्यात येईल.

७. व्दितीय पक्षकार भारतीय दंड संहितेच्या कोणत्याही कलमान्वये शिक्षा झाली असल्यास अथवा त्यास काळया यादीत घोषित केले असल्याचे निदर्शनास आल्यास देण्यात आलेली मान्यता रद्द करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी यांना राहील.

८. आधारचे कामकाज हे सकाळी १० ते सांयकाळी ६ या कालावधीतच शासकीय कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी करणे बंधनकारक राहील.

९. आधार कॅम्प किंवा होम एनरॉलमेंटचे आदेश वरिष्ठ कार्यालयाकडून आपणास प्राप्त झाल्यास कोणतेही जादा आकारणी न करता आदेशाचे पालन करुन कामकाज करणे व संबंधित अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करणे बंधनकारक राहील.

१०. UIDAI यांनी नेमून दिलेल्या आकारणीपेक्षा जास्त रक्कमेची आकारणी केल्यास किंवा इतर कोणतीही तक्रार आल्यास थेट UIDAI मार्फत अथवा नियंत्रण अधिकारी द्वारे कारवाई करण्यात येईल.

११. खाजगी आधार संच हे शासकीय जागेमध्ये सुरु करण्यासाठी मान्यता मिळाल्यानंतर संबंधित Enrollment Agency यांना आवश्यक असणाऱ्या बाबींची पूर्तता (बँक गॅरंटी इ.) लवकरात लवकर पूर्ण करणे बंधनकारक राहील.

१२. आधार संच सुरु झाल्यानंतर शासकीय जागेत आधार संच सुरु असल्याबाबतचा अहवाल संबंधित शासकीय अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे तात्काळ पाठविणे बंधनकारक राहिल.

१३. आधार केंद्र हे एका VLE कडून दुसन्या VLE कडे परस्पर हस्तांतरण करता येणार नाही.

१४. VLE अथवा ऑपरेटर यांनी आधारचे कामकाज करताना जर काही चूका केल्या असतील तर त्या संबंधी दंडात्मक रक्कम भरण्याची जबाबदारी अथवा आधार कायद्यानुसार जी काही शिक्षा असेल ती संबंधित VLE अथवा ऑपरेटर यांची असेल

१५. आधार केंद्रांमध्ये दर्शनी भागात दरपत्रक व नियंत्रण अधिकारी (SPOC) यांची संपर्कासाठी माहितीचे फलक लावणे बंधनकारक राहील.

१६. जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांचे परवानगी शिवाय शासकीय आधार केंद्राचे स्थलांतर अथवा हस्तांतर परस्पर करता येणार नाही. असे आढळून आल्यास संबंधित केंद्र तात्काळ बंद करण्यात येईल व संबंधित केंद्र चालका विरुध्द कायदेशीर कारवाई केली जाईल.

१७. आधार केंद्र हे जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्या परवानगी खेरीज कायम स्वरुपी बंद करता येणार नाही.

१८. आधार केंद्रावर फक्त आधार संबंधित कामकाज करण्यात येईल इतर कोणतेही कामकाज आढळल्यास त्या VLE वर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

१९. महाआयटी व UIDAI यांचेकडून वेळोवेळी जे निर्देश प्राप्त होतील त्यांचे पालन करणे बंधनकारक राहील.

२०. वरील अटी व शर्तीमध्ये फेरबदल करण्याचा तसेच भविष्यात नविन अटी व शर्ती समाविष्ट करण्याचा तसेच कोणतेही कारण न देता केंद्र बंद करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचेकडे राखून ठेवण्यात आलेला आहे. व तो व्दितीय पक्षकारास बंधनकारक राहील.

आधार सेंटर अर्ज व अधिकृत अधिसूचना: शासकीय कार्यालयीन जागेत तात्पुरत्या स्वरुपात खाजगी आधार संच सुरु करणेसाठी अर्ज व अधिकृत अधिसूचना पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – आधार अपडेट सेंटरसाठी असा करा ऑनलाईन नोंदणी अर्ज (CSC Aadhaar UCL Center)

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.