आपले सरकार - महा-ऑनलाईनवृत्त विशेषसरकारी कामे

आपले सरकार सेवा केंद्र – महा ई सेवा केंद्र अर्ज सुरू, पहा अटी शर्ती – Aapale Sarkar Seva Kendra Gadchiroli District

महाराष्ट्र शासन माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) शासन निर्णय दिनांक १९ जानेवारी, २०१८ अन्वये राज्यातील ग्रामिण व शहरी भागात नागरिकांपर्यंत शासकीय, निमशासकिय व खाजगी सेवा पोहचविण्याकरीता प्रत्येक ग्राम पंचायतस्तरावर व नगर परिषद, नगर पंचायतस्तरावर आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करावयाचे असल्यामुळे, गडचिरोली जिल्हयातील रिक्त असलेल्या ३४३ ग्राम पंचायतस्तरावर व ०३ नगर पंचायतस्तरावर आपले सरकार सेवा केंद्र रिक्त असल्याने महाराष्ट्र शासन माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) शासन निर्णय दिनांक १९ जानेवारी, २०१८ च्या परिच्छेद १ (अ) व (आ) मधिल निकषानुसार ग्राम पंचायतस्तरावर ३५१ व नगर पंचायतस्तरावर ०३ आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करावयाचे आहे.

गडचिरोली जिल्हयात रिक्त असलेल्या ३४३ ग्राम पंचायत व ०३ नगर पंचायतची यादी व अर्जाचा नमुना जिल्हयाच्या वेबसाईट (https://gadchiroli.gov.in) या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. तसेच रिक्त असलेल्या ग्राम पंचायत व नगर पंचायतस्तरची यादी व नमुना जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालयाचे नोटिस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आलेली असून, अर्जदारांनी दिनांक २५/०७/२०२२ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथील सेतू शाखेत विहित नमुन्यात अर्ज सादर करावे.

जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करणे बाबत (अटी व शर्ती)

१. आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज सेतू शाखा जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे सादर करावा.

>

२. अर्ज करणारा नागरिक हा त्या गावचाच रहिवासी असावा, जर त्या गावासाठी अर्ज आले नसेल तर जवळच्या गावाचा विचार करण्यात येईल.

३. अपंगत्व असलेल्या अर्जदारांना प्राधान्य देण्यात येईल.

४. नागरिक फक्त एकाच आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करू शकतात.

५. अर्जामध्ये जर माहिती चुकीची असेल तर त्याच्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही तसेच त्याच्यावर कायदेशीर कार्यवाही सुध्दा करण्यात येईल.

६. आपले सरकार सेवा केंद्र चालकांना शासनाचे तसेच जिल्हाधिकारी कार्यालय यांचे कडून येणारे आदेश मान्य करावे लागतील.

७. आपले सरकार सेवा केंद्र ज्या ठिकाणी देण्यात येईल त्याच ठिकाणी ते कार्यरत असणे आवश्यक राहील. आपले सरकार सेवा केंद्राची जागा बदलविल्यास ते आपले सरकार सेवा केंद्र बंद करण्यात येईल.

८. शासन निर्णय १९ जानेवारी २०१८ नुसार सर्व अटी व शर्ती मान्य राहिल.

९. शासनाव्दारे दिलेल्या सर्व सेवा आपले सरकार सेवा केंद्रातुन देणे अनिवार्य राहिल.

१०. शासन निर्णय १९ जानेवारी २०१८ नुसार आपले सरकार सेवा केंद्राचे रेट बोर्ड, केंद्राच्या समोर दर्शनी भागात नागरिकांसाठी बसण्याची सोय करण्यात यावी व आवश्यक तशा सर्व बाबींची परिपूर्तता करावी लागेल.

११. उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांचे वेळोवेळी आदेशांचे पालन करावे लागेल. तसेच त्यांना अहवाल सादर करावा लागेल.

१२. सर्व प्रकारची डिजीटल पेमेंट ला प्राधान्य द्यावे लागेल.

१३. शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार आपले सरकार सेवा केंद्र सुरू ठेवावे लागेल.

१४. शासनाचे सर्व साहित्य यांचे काटकसरीने वापर, संरक्षण व जतन करणे अनिवार्य राहील.

१५. महाराष्ट्र माहिती महामंडळ यांनी नियुक्त केलेल्या तांत्रिक अधिकारी हे आपले सरकार सेवा केंद्राची संपूर्ण चौकशी करू शकतील.

१६. नागरिकांची तक्रार आल्यास आपले सरकार सेवा केंद्राची चौकशी करून त्यावर कार्यवाही करण्यात येईल.

१७. आपले सरकार सेवा केंद्राकरिता कोणत्याही शासकीय परिसरामध्ये जागा मिळणार नाही याची अर्जदाराने दक्षता घ्यावी.

जाहिरात: आपले सरकार सेवा केंद्र जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – CSC सेंटर साठी असा करा ऑनलाईन नोंदणी अर्ज (Common Service Centres)

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.