आपले सरकार सेवा केंद्र – महा ई सेवा केंद्र उस्मानाबाद जिल्ह्यासाठी अर्ज सुरू, पहा अटी शर्ती – Aapale Sarkar Seva Kendra Osmanabad District
उस्मानाबाद जिल्हयातील खालील ग्रामपंचायत / नगरपालिका क्षेत्रात रिक्त असलेल्या “ आपले सरकार सेवा केंद्र ” साठी पात्र व्यक्ती / नागरिकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात दिनांक ०१/०१/२०२३ ते १६/०१/२०२३ कार्यालयीन वेळेत ( सार्वजनिक सुटी वगळून ) स्विकारले जातील.
आपले सरकार सेवा केंद्र – महा ई सेवा केंद्र उस्मानाबाद जिल्ह्यासाठी अर्ज सुरू, पहा अटी शर्ती – Aapale Sarkar Seva Kendra Osmanabad District:
रिक्त असलेल्या आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करण्यासाठी अर्जाचा नमुना, पात्रता, आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे, अटी व शर्ती या खालील प्रमाणे आहेत.
पात्रता निकष :
१. आपले सरकार सेवा केंद्र मिळविण्यासाठी ग्रामपंचायत / नगरपालिका / नगरपंचायत क्षेत्रातील CSC SPV नोंदणी कृत केंद्र चालक जिल्हाधिका-यांकडे अर्ज करू शकतात.
२. ज्या ग्रामपंचायत / नगरपालिका / नगरपंचायतीत आपले सरकार सेवा केंद्र नाही त्या भौगोलिक क्षेत्रात राहणारा कोणताही व्यक्ती आपले सरकार सेवा केंद्र मिळविण्यासाठी विहित केलेल्या अटी व शर्ती पुर्ण करत असेल असा व्यक्ती देखील आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करण्यास पात्र राहील.
३. आपले सरकार सेवा केंद्र मिळविण्यासाठी १८ वर्षे वय पुर्ण असणारी कोणतीही व्यक्ती अर्ज करण्यास पात्र राहील.
४. शैक्षणिक पात्रता कमीत कमी १२ वी उत्तीर्ण व संगणक अर्हता किमान MS – CIT.
५. महिलांना प्राधान्य देण्यात येईल.
६. मान्यताप्राप्त विद्यापिठाची संगणक पदविका / पदवी धारकास MS – CIT ची अट शिथील राहील.
आपले सरकार सेवा केंद्र चालकाची कर्तव्ये व जबाबदा-या:
१. शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार आपले सरकार सेवा केंद्र चालु ठेवून नागरिकांना सेवा पुरविणे.
२. शासनाने ठरवून दिलेले ब्रँडीग चा वापर करणे तसेच महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान मंडळाने स्थापन केलेल्या हेल्पलाईन क्रमांकाचा तपशिल आपले सरकार सेवा केंद्राच्या दर्शनी भागावर प्रसिध्दी करणे.
३. शासनाने ठरवून दिलेले दर केंद्रावर प्रसिध्द करणे तसेच ठरवुन दिलेल्या दरापेक्षा अधिक शुल्काची आकरणी न करणे.
४. शासनाने पुरविलेल्या वस्तु, आज्ञावली इत्यादीचे योग्य वापर, संरक्षण व जतन करणे.
५. सर्व ग्राहकांना सौजन्याची वागणुक देणे आणि आवश्यक मदत व सहकार्य करणे.
६. विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत ठरवुन दिलेले वेळापत्रक व निर्देश काटेकोरपणे पाळणे.
७. पर्यवेक्षीय संस्था, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान मंडळाने निश्चित केलेल्या कार्यपध्दतीनुसार माहिती पुरविणे व दिलेल्या निर्देशांचे पालन करणे.
आपले सरकार सेवा केंद्र मिळणेकरीता मागणी अर्ज आणि रिक्त असणा-या आपले सरकार सेवा केंद्राची यादी:
आपले सरकार सेवा केंद्र मिळणेकरीता मागणी अर्ज आणि रिक्त असणा-या आपले सरकार सेवा केंद्राची यादी डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – CSC सेंटर साठी असा करा ऑनलाईन नोंदणी अर्ज (Common Service Centres)
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!