आपले सरकार - महा-ऑनलाईनवृत्त विशेषसरकारी कामे

आपले सरकार सेवा केंद्र – महा ई सेवा केंद्र अर्ज सुरू, पहा अटी शर्ती – Aapale Sarkar Seva Kendra Wardha District

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ई गव्हर्नन्स कृती कार्यक्रमांतर्गत राज्यातील ग्रामिण व नागरी भागात नागरीकांपर्यंत शासकिय, निमशासकिय व खाजगी सेवा पोहचविण्यासाठी तसेच सदर सेवेकरीता नागरीकांचा वेळ व श्रम वाचविण्याचे दृष्टीने राज्यात आपले सरकार सेवा केंद्र मंजुर करुन सदर बाबी सुलभरित्या होण्याकरीता वर्धा जिल्ह्यात एकुण 664 आपले सरकार सेवा केंद्र मंजुर करण्याची कार्यवाही अंमलात आणण्यात येत आहे .

सदर बाबत ईच्छुक अर्जदारांनी वर्धा जिल्ह्याकरीता अधिकृत संकेतस्थळ https://wardha.gov.in वर प्रसिद्ध करण्यात आलेली लिंक http://forms.gle/7qMjwXLMY3sPU7TWA वर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज दिनांक 13 जून, 2022 ते 21 जून, 2022 पर्यंत सादर करण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.

आपले सरकार आपले सरकार सेवा केंद्र मंजुरीचे अटी / निकष:

>

1. अर्जदार यांना फक्त एका केंद्रासाठी अर्ज करता येईल.

2. आपले सरकार सेवा केंद्र ज्या ग्रामपंचायतीच्या ठिकाणी मंजुर करायचे आहे अर्जदार हा त्याच ग्रामपंचायतीचा रहवासी असावा / असावी .

3. अर्जदार हा 12 वी (HSC  उत्तीर्ण असावा / असावी .

4. अर्जदार हा संगणक परीक्षा (MSCIT) किंवा इतर शासनमान्य संगणक परीक्षा उत्तीर्ण असावा/असावी .

5. अर्जदार यांच्या कुटुंबात यापुर्वी आपले सरकार सेवा केंद्र मंजुर नसावे .

6 . अर्जदार हा शासकीय कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी नसावा.

7. अर्जदार हा CSC केंद्र किंवा इतर तत्सम डिजिटल सेवा केंद्र चालक असल्यास प्राधान्य देण्यात येईल.

8. शासकीय नियमाप्रमाणे अधिसूचित आरक्षण लागू राहील . (उदा. ३३४ महिला, ५४ अपंग ).

9. अर्जासोबत मागितलेले कागदपत्रे जोडा.

आवश्यक कागदपत्रे:

आपले सरकार अर्जदार यांनी अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावीत . .

  1. आधार कार्ड
  2. मतदार कार्ड / मतदार यादी
  3. बारावीचे बोर्ड प्रमाणपत्र
  4. डोमिसाईल प्रमाणपत्र
  5. संगणक परीक्षा ( MSCIT ) किंवा इतर शासनमान्य संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र
  6. पॅन कार्ड
  7. इलेक्ट्रिक बिल
  8. CSC ID ( असल्यास )
  9. मागील ६ महिन्याचे CSC B2C व्यवहार अहवाल (असल्यास)

जाहिरात: आपले सरकार सेवा केंद्र जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – CSC सेंटर साठी असा करा ऑनलाईन नोंदणी अर्ज (Common Service Centres)

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.