जिल्हा परिषदनोकरी भरतीमहानगरपालिकामहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीवृत्त विशेषसरकारी कामे

अंगणवाडी सेविका मदतनिस भरती (नाशिक) – Anganwadi Servant Assistant Recruitment – 2022-2023

एकात्मिक बाल विकास सेवा योजना, बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) मालेगांव, जि. नाशिक यांचे कार्यालय अंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनिस भरती प्रक्रिया सन २०२२-२०२३ साठी महानगरपालिका मालेगांव व नगरपालिका सटाणा शहरातील अंगणवाडी सेविका व मदतनिस रिक्त पदांसाठी अनुक्रमे रु. ८३२५/- प्रति महिना व रु. ४४२५/- प्रति महिना असे एकत्रित मानधनी या निवडीसाठी नियुक्तीने (By Nomination) भरण्यासाठी मालेगांव व सटाणा शहरातील पात्र महिला उमेदवारांकडून खालील अटी व शर्तीनुसार विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.

अंगणवाडी सेविका मदतनिस भरती (नाशिक ) – Anganwadi Servant Assistant Recruitment – 2022-2023:

१. शैक्षणिक पात्रता : अंगणवाडी सेविका व मदतनिस पदासाठी अर्जदार किमान १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. इ. १२ गुणपत्रकाची सत्यप्रत आवश्यक असून सदरील गुणपत्रक नसल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. यापेक्षा उच्चत्तम शैक्षणिक अर्हता धारण करणा-या उमेदवाराने आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या व गुणपत्रिकांच्या सत्यप्रती सादर कराव्यात.

२. वास्तव्याची अट : उमेदवार महिला स्थानिक रहिवाशी असावी. स्थानिक रहिवाशी म्हणजेच ज्या शहरातील अंगणवाडी सेविका व मदतनिस पदासाठी अर्ज केलेला असेल त्याच शहरातील रहिवाशी महिला अर्जदार असणे आवश्यक आहे. यासाठी रहिवाशी दाखला म्हणून शासकिय दस्तऐवज (जसे आधारकार्ड / मतदान ओळखपत्र इ.) जोडणे आवश्यक आहे.

३. वयाची अट : अंगणवाडी सेविका व मदतनिस या पदासाठी वयोमर्यादा किमान १८ वर्ष व कमाल ३५ वर्ष राहिल. तसेच विधवा उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादा ४० वर्ष राहिल. त्याकीरता शाळा सोडल्याचा दाखला किंवा १०वी उत्तीर्ण बोर्डाचे प्रमाणपत्र किंवा जन्मदाखल्याची सत्यप्रत जोडणे आवश्यक राहिल. उमेदवाराचे किमान व कमाल वय हे जाहिरात प्रसिध्दीच्या दिनांकास गणण्यात येईल.

४. लहान कुटुंब : वरील पदासाठी अर्ज करणा-या उमेदवारांस लहान कुटुंबाची अट लागू राहिल. उमेदवारांस दोन पेक्षा जास्त हयात अपत्ये (दत्तक दिलेल्या अपत्यासह) नसावीत. अर्जासोबत दिलेल्या नमुन्यात लहान कुटुंबाबाबतचे प्रतिज्ञापत्र जोडणे आवश्यक राहिल. अन्यथा अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

५. मराठी भाषेचे ज्ञान :- रिक्त पदांचा तपशिल दर्शविणा-या तक्ता अ, ब व क मधील सर्व सेविका व मदतनिस रिक्त पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांस मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. रिक्त पदे दर्शविणा-या तक्ता अ मधील मालेगांव शहरातील अनुक्रमांक १,२,३,४ व तक्ता व मधील मालेगांव शहरातील अनुक्रमांक १४ ते ६४ या अंगणवाडी केंद्रात ५०% पेक्षा जास्त मुले मराठी भाषाव्यतिरिक्त हिंदी उर्दू भाषा बोलणारी असल्याने सदर अंगणवाडी केंद्रातील सेविका व मदतनिस पदासाठी अर्ज करणा-या महिला उमेदवारांना मराठी भाषेसोबतच हिंदी/उर्दु भाषेचे ज्ञान (लिहिता व वाचता येणे) असणे आवश्यक आहे. तथापि अशा उमेदवाराने इ.१० वी अथवा त्यापुढील शैक्षणिक अर्हतेपैकी किमान एक अर्हता मराठी भाषा विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक राहिल.

६. उमेदवार विधवा असल्यास :- महानगरपालिका/नगरपालिका यांचेकडील पतीचे मृत्यु प्रमाणपत्र जोडावे.

७. उमेदवार अनाथ असल्यास : संबंधित विभागीय उपआयुक्त, महिला व बाल विकास विभाग यांचे प्रमाणपत्र जोडावे.

८. मागासवर्गीय उमेदवारांनी : सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राच्या सत्यप्रतीसह अर्ज करावा.

९. अनुभव : उमेदवारास एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची अंगणवाडी सेविका / मिनी अंगणवाडी सेविका / अंगणवाडी मदतनिस म्हणून कामाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असल्याशिवाय अनुभवासाठी असलेले गुण देण्यात येणार नाहीत. असा अनुभव उमेदवारांस असल्यास त्याबाबतचे सक्षम अधिका-याचे अनुभव प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. मान्यता प्राप्त खाजगी व स्वयंसेवी, अनुदानित विना अनुदानित संस्थेतील कामाचा अनुभव ग्राहय धरला जाणार नाही व याबाबतचा कोणताही युक्तिवाद उमेदवाराने केल्यास अपात्र ठरविण्यात येईल.

१०. उमेदवाराने अर्जामध्ये शहराचे नांव, सेविका व मदतनिस यापैकी ज्या पदासाठी अर्ज करावयाचा आहे त्या पदाचे नांव याचा स्पष्ट उल्लेख करावा. सेविका व मदतनिस दोन्ही पदासाठी अर्ज करावयाचा असल्यास दोन्ही पदाच्या नावांचा स्पष्ट उल्लेख अर्जामध्ये करावा. अन्यथा अर्जाचा विचार केला जाणार नाही.

११. एका उमेदवाराने एकच अर्ज सादर करावा. उमेदवाराने एकापेक्षा जास्त केंद्रांच्या पदांसाठी वेगवेगळे अर्ज सादर केल्यास एकच अर्ज विचारात घेण्यात येईल व त्याबाबत उमेदवाराशी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.

१२. अर्जासोबत जन्मतारखेचा पुरावा, शैक्षणिक पात्रतेचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र (स्वतःचे नावाचे), अनुभव प्रमाणपत्र, विधवा (अटी व शर्तीमधील क्र.६ नुसार दाखला) अनाथ महिला असल्यास (अटी व शर्तीमधील क्र.७ नुसार दाखला) इ.च्या सक्षम प्राधिका-याकडून साक्षांकित केलेल्या प्रती जोडणे आवश्यक आहे, जोडले नसल्यास अगर साक्षांकित नसल्यास याबाबतचे गुण दिले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी. तसेच अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक २३.०३.२०१३ नंतर कोणत्याही प्रकारचे दस्तऐवज स्विकारले जाणार नाही.

१३. शहराचे नांव व पदाचे नांव नमुद केलेले नसणे, अर्ज अपूर्ण भरलेला असणे, खाडाखोड असणे, उमेदवाराची विहित ठिकाणी स्वाक्षरी नसणे तसेच अर्जाच्या सोबत आवश्यक त्या प्रमाणपत्राच्या छायांकित व साक्षांकित प्रती नसणे इ. कारणांमुळे अर्ज अपात्र ठरविण्यात येतील व त्यासंबंधी उमेदवारांस कळविण्यात येणार नाही.

१४. अंतिम दिनांकानंतर आलेल्या किंवा डाकेने (पोष्टामुळे) विलंब झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

१५. निवड कार्यपध्दती महाराष्ट्र शासन, महिला व बाल विकास विभाग, शासन निर्णय क्र. एवावि-२०२२/प्र.क्र. २४/का-६, दिनांक ०२.०२.२०२३ नुसार उमेदवारांनी अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्रांवरुन इयत्ता १०वी/१२वी / पदवी/ पदव्युत्तर/ पदविका डिएड बीएड संगणक परिक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र यामध्ये त्यांना मिळालेल्या गुणांनुसार तसेच विधवा/ अनाथ, जात प्रवर्ग अनुभव इ.साठी त्यांचे प्रमाणवरुन मिळालेल्या एकुण गुणांनुसार गुणानुक्रमाने पात्र उमेदवारांची शहरातील रिक्त पदांच्यानुसार निवड करण्यात येईल. या पदांकरीता लेखी परिक्षा अथवा मुलाखत घेतली जाणार नाही. अर्जा सोबत जोडलेल्या प्रमाणपत्रांनुसार शासन निर्णयात नमुद केल्याप्रमाणे उमेदवारांना गुण देऊन प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिध्द करण्यात येईल. त्यावर अर्ज करणा-या उमेदवारांना आक्षेप / तक्रार असल्यास अर्ज केलेल्या उमेदवारांनी १० दिवसांचे आंत लेखी तक्रार बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) मालेगांव कार्यालयाकडे सादर करावी. सदर तक्रारीची शहानिशा करून अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

१६. अंतिम निवड झालेल्या उमेदवारांनाच निकालाबाबत कळविण्यात येईल. इतर उमेदवारांना कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.

१७. निवड प्रक्रिया सुरु झाल्यानंतर किया नियुक्तीनंतर कोणत्याही क्षणी उमेदवारानेअर्जात व / किंवा अर्जासोबत दिलेली माहिती अगर कागदपत्रे खोटी सादर केल्याचे किंवा खरी माहिती दडवून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास त्या उमेदवाराची उमेदवारी नियुक्ती सदर प्रक्रियेच्या कोणत्याही टप्यावर किंवा निवड झाल्यानंतरही रद्द करण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीवेळी मुळ कागदपत्रे सादर करणे बंधनकारक राहिल, अन्यथा निवड प्रक्रियेतून अपात्र ठरविण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारांना सर्व अटी व शर्ती मान्य असल्याचे रु.१००/- चे स्टॅम्प पेपरवर करारनामा करून देणे बंधनकारक राहिल.

१८. एखादा उमेदवाराने त्याच्या निवडीसाठी प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष दबाव आणल्यास त्यांस निवड प्रक्रियेतून बाद करण्यात येईल.

१९. अंगणवाडी सेविका व मदतनिस यांना शासन दरानुसार दरमहा मानधन देय आहे. शासकिय नियमानुसार एकत्रित मानधनात करण्यात आलेली वाढ नियमानुसार अनुज्ञेय राहिल. मात्र मानधना व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे भत्ते सवलती अनुशेष नाही.

२०. अंगणवाडी सेविका व मदतनिस हे एकत्रित मानधनावरील मानधनी स्वरुपाचे पद आहे. सदर पद बढती / बदली/ सेवानिवृत्ती वेतनवाढ इ. शासकिय सवलतीस पात्र नाही.

२१. संबंधित शहरातील अंतिम निवड यादी जाहिर झाल्यानंतर गुणानुक्रमे सेविका व मदतनिस यांची निवड करण्यात येईल व गुणानुक्रमानुसार अंगणवाडी केंद्र देण्यात येईल. त्यामुळे निवड झालेल्या उमेदवारांना त्या-त्या शहरातील कोणत्याही अंगणवाडी केंद्रावर काम करावे लागेल. उमेदवाराची एकदा नियुक्ती झाल्यावर कोणत्याही परिस्थितीत त्यांची इतर ठिकाणी बदली करता येणार नाही, तसेच त्यांचे निवास स्थानापासून नियुक्ती देण्यात आलेल्या ठिकाणापर्यंत कोणताही प्रवासभत्ता अनुज्ञेय राहणार नाही. त्याचप्रमाणे नियुक्ती झालेल्या ठिकाणी सतत गैरहजर राहिल्यास त्यांची नियुक्ती खंडीत करणेत येईल. निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपूर्वी विहित नमुन्यात करारनामा करून देणे बंधनकारक राहिल.

२२. प्रतिक्षा यादी : एकूण प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारावर उमेदवारांची प्रतिक्षा यादी ठेवण्यात येईल. काही कारणामुळे उमेदवार नियुक्ती आदेशाच्या दिनाकांपासून ३० दिवसांत रुजु न झाल्यास किंवा त्यांस अपात्र ठरविण्यात आल्यास प्रतिक्षा यादीतील गुणानुक्रमानुसार पुढील उमेदवारांस नियुक्ती देण्यात येईल व सदर क्षेत्रात कोणत्याही कारणास्तव पद रिक्त झाल्यास अथवा नविन पद निर्मिती झाल्यास प्रतिक्षा यादीतील उमेदवारांस गुणानुक्रमे नियुक्ती देण्यात येईल. सदर प्रतिक्षा यादी निकाल जाहीर झाल्यापासून एक वर्ष वैध राहिल.

२३. अपिल : सेविका व मदतनिस या पदावरील घोषित निवडी संदर्भात कोणत्याही उमेदवाराची तक्रार असल्यास निवड यादी घोषित झाल्यापासून ३० दिवसांचे आत विभागीय उप-आयुक्त, महिला व बाल विकास, नाशिक विभाग, नाशिक यांचेकडे तक्रार करावी व मा. विभागीय उप आयुक्त, महिला व बाल विकास, नाशिक विभाग, नाशिक यांनी दिलेल्या निर्णयामुळे तक्रारदाराचे समाधान झाले नसल्यास मा. आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई यांचेकडे पुढील ६० दिवसांत अपिल दाखल करता येईल.

२४. सेवा समाप्तीसाठी वयाची अट : या शासन निर्णयान्वये नियुक्त होणा-या अंगणवाडी सेविका व मदतनिस यांची सेवा वयाची ६० वर्ष पूर्ण होईपर्यंत किया त्या शारीरिक दृष्ट्या काम करण्यास सक्षम नसल्यास यापैकी जे आधी घडेल तोपर्यंतच सुरु ठेवण्यात येईल.

२५. जाहिरातीही याबाबत साशंकता अगर संदिग्धता निर्माण झाल्यास संबंधित शासन निर्णयातील तरतुदी अंतिम राहतील.

२६. पत्रव्यवहार : भरती प्रक्रियेसंबंधी अर्जदारास कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही. सर्व सुचना जाहिरातीमधील अटी व शर्ती प्रमाणे असून वेळोवेळी देण्यात येणा-या सूचना कार्यालयीन नोटीस बोर्डवर लावण्यात येतील.

२७. महत्त्वाची सुचना : सदर भरती प्रक्रिया उपरोक्त शासन निर्णय दि.०२.०२.२०२३ अन्वये राबविण्यात येणार असून निवड व नियुक्ती गुणवत्ता यादीनुसार करण्यात येणार आहे. करीता उमेदवारांनी कोणत्याही भूलथापांना अथवा अफवांना बळी पडू नये. तसेच कोणाशीही आर्थिक व्यवहार करू नये. कोणीही व्यक्ती नोकरी लावुन देण्याच्या बहाण्याने पैशांची मागणी करीत असल्यास तात्काळ पोलिसांना संपर्क साधावा.

भरती प्रक्रिया वेळापत्रक :-

  • प्रकल्प स्तरावर अर्ज स्विकारण्याचा कालावधी : दि.०९.०३.२०२३ ते दि.२३.०३.२०२३ सायंकाळी ०६.०० वाजेपर्यत (कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस वगळून)
  • प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे : दि.०६.०४.२०२३.
  • आक्षेप तक्रारी अर्ज सादर करण्याचा कालावधी : दि.०६.०४.२०२३ ते दि. १७.०४. २०२३.
  • आक्षेप / तक्रारी अर्ज तपासण्याचा कालावधी : दि. १८.०४.२०२३ ते दि. २७.०४.२०२३.
  • अंतिम निवड यादी व प्रतिक्षा यादी प्रसिध्द करणे : दि.२८.०४.२०२३. (आक्षेप/तक्रारी प्राप्त न झाल्यास दि. १८.०४.२०२३)

अर्ज सादर करण्याचा पत्ता :- बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) मालेगांव, जि.नाशिक यांचे कार्यालय, नंदादीप बिल्डिंग, संदेश सिनेमागृहाजवळ, मालेगांव, जि. नाशिक.

दुरध्वनी क्रमांक : ०२५५४-२५५७८०.

अर्ज (Application Form): अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती अर्ज पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – आशा स्वयंसेविकांची संपूर्ण माहिती – नियुक्ती प्रक्रिया, प्रशिक्षण, मानधन आणि जबाबदाऱ्या/कामे

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.