आपले सरकार - महा-ऑनलाईनजिल्हा परिषदमहानगरपालिकामहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीवृत्त विशेषसरकारी योजना

जनावरांचा लम्पीमुळे मृत्यू झाला तर नुकसान भरपाईसाठी ऑनलाईन अर्ज करा !

केंद्र शासनाच्या प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, २००९ अन्वये लम्पी चर्मरोग हा अनुसूचित रोग आहे. महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, नगरपालिका, कटकमंडळे या कार्यक्षेत्रातील रहिवाश्यांना आणि ग्रामीण भागातील रहिवाश्यांना त्यांच्या जनावरांचा लम्पी मुळे मृत्यू झाला तर नुकसान भरपाई चा लाभ घेता येईल.

जनावराचा लम्पी आजारामुळे मृत्यू झाल्यानंतर नजीकच्या पशु वैद्यकीय दवाखान्यातून पंचनामा करून घेणे बंधनकारक आहे. जनावराचा लम्पी आजारामुळे मुळे मृत्यू झाल्यानंतर लाभार्थीने तात्काळ नजीकच्या दवाखान्यात माहिती द्यावी अथवा ऑनलाईन भरपाई अर्ज सबमिट करणे बंधनकारक राहील. ज्या व्यक्तीच्या नावे नुकसान भरपाई अर्ज कराल त्याच व्यक्तीचे बँक खात्याचे तपशील द्यावे अन्यथा नुकसान भरपाई मिळणार नाही.

शेतकरी, पशुपालक यांच्या मृत पशुधनास द्यावयाचे अर्थसहाय्य:

अ.क्र. मृत पावलेल्या पशुधनाचा प्रकार अर्थसहाय्याची अधिकतम मर्यादा रक्कम (प्रति जनावर)
1 दुधाळ जनावरे (गाय) रु. 30,000/-
2 ओढकाम करणारी जनावरे (बैल) रु. 25,000/-
3 वासरे रु. 16,000/-

शासन निर्णय 1 पहा    शासन निर्णय 2 पहा

जनावरांचा लम्पीमुळे मृत्यू झाला तर नुकसान भरपाईसाठी ऑनलाईन अर्ज करा !

जनावरांचा लम्पी मुळे मृत्यू झाला तर नुकसान भरपाईसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील पोर्टल ओपन करा. टॉप बार मध्ये अर्जदार नोंदणी या मेनू वर क्लिक करून अर्जदार आवश्यक माहती भरून नोंदणी करू शकतो.

https://www.mhpashuaarogya.com

नोंदणी केल्यानंतर टॉप बार मध्ये भरपाईसाठी अर्ज करा या मेनू वर क्लिक करा. अर्जदार आधार क्रमांक आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा, नंतर आवश्यक माहती भरून अर्ज सादर करा. जर अर्जदार आपला पासवर्ड विसरला तर पासवर्ड विसरला या वर क्लिक करून आधार क्रमांक आणि मोबाइल नंबर भरून पासवर्ड बदलू शकतो.

केलेला अर्ज माहिती कशी पाहावी ? / अर्जाची प्रत कशी काढावी ?

टॉप बार मध्ये केलेले अर्ज या मेनू वर क्लिक करा, नंतर अर्जदार आधार क्रमांक आणि पासवर्ड नि लॉगिन करा. अर्जदार नि ज्या नुकसान भरपाई साठी अर्ज केला आहे त्या अर्जा ची प्रत काढण्यासाठी प्रत काढा वर क्लिक करा.

संपर्क: तांत्रिक अडचणी संदर्भात खालील ई-मेल / मोबाईल वर संपर्क करा.

  • फोन १ – 1962 – कॉल सेंटर.
  • फोन २ – 18002330418 – टोल फ्री.

पशु सहायता मोबाइल अप्लिकेशन (Pashu Sahayata) : पशु सहायता (Pashu Sahayata)अप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – वन्यप्राणी हल्ल्यात मृत, जखमी झाल्यास देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ; नुकसान भरपाईसाठी असा करा ऑनलाईन अर्ज

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.