सरकारी कामेअन्‍न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागआपले सरकार - महा-ऑनलाईनवृत्त विशेष

रेशनकार्डवर आपल्याला किती धान्य मिळते हे ऑनलाईन कसे तपासायचे? जाणून घ्या सविस्तर माहिती!

आपण या लेखामध्ये रेशनकार्डवर आपल्याला किती (Ration Dhanya Status) धान्य मिळते व जर धान्य मिळत नसेल तर तक्रार कशी करायची याची माहिती पाहणार आहोत. तसे बगायला गेलं तर आज जवळपास सगळ्याच लोकांकडे रेशनकार्ड आहेत. त्यातील बरेच जण रेशन घेतात, पण आपल्याला किती (Ration Dhanya Status) रेशन मिळते? किंवा किती रेशन मिळायला हवे? याचा विचार कोण करत नाही दुकानदाराने आपल्याला रेशन दिले की ते आपण घरी घेऊन येतो.

दुकानदार जे काही सांगेल तसे आपण करत असतो. पण हे चुकीचे आहे कारण आपल्याला माहित असायला पाहिजे कि तुम्हाला किती (Ration Dhanya Status) धान्य मिळायला हवे. हे आपण आपल्या मोबाईलवर सुद्धा पाहू शकतो. आपल्याला डाळ, गहू, रॉकेल यांच्यापैकी काही गोष्टी मिळत आहेत की नाही हे आपण अधिकृत वेबसाईटवर जाऊन (Ration Dhanya Status) पाहू शकतो.

रेशनकार्डवर आपल्याला किती धान्य मिळते हे ऑनलाईन कसे तपासायचे? Ration Dhanya Status:

रेशनकार्डवर आपल्याला किती धान्य मिळते (Ration Dhanya Status) हे ऑनलाईन चेक करण्यासाठी सर्वप्रथम खालील अन्न पुरवठा विभागाच्या वेबसाईटवर भेट द्या.

http://mahafood.gov.in/website/marathi/home.aspx

त्या वेबसाईटवर गेल्यानंतर ऑनलाईन सेवा (Online Seva) हा टॅब दिसेल त्यामध्ये ऑनलाईन रास्तभाव दुकाने या पर्यायावर क्लिक करा .

ऑनलाईन रास्तभाव दुकाने (Ration Dhanya Status)
ऑनलाईन रास्तभाव दुकाने

पुढे AePDS-सर्व जिल्हे हा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करा.

AePDS-सर्व जिल्हे (Ration Dhanya Status)
AePDS-सर्व जिल्हे

त्यानंतर वेबसाईट ओपन होईल या वेबसाईटवर डाव्या बाजूला RC Details हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.

RC Details (Ration Dhanya Status)
RC Details
रेशन धान्य स्टेट्स – Ration Dhanya Status:

आता हिथे पहिल्यांदा ज्या महिन्याचे धान्य चेक करायचे (Ration Dhanya Status) आहे तो महिना (Month) निवडा आणि वर्ष (Year) निवडा आणि पुढे आपला १२ अंकी रेशनकार्डवर असलेला SRC No नंबर टाकायचा आहे. आणि मग पुढे Submit बटन वर क्लिक करा.

RC Details - SRC (Ration Dhanya Status)
Ration Dhanya Status

सबमिट बटनवर क्लिक केल्यावर आपले सदस्य तपशील दिसेल, त्यामध्ये कुटुंबातील व्यक्तीची नावे दिसतील, तिथेच दुसऱ्या खालील रकान्यामध्ये मध्ये आपल्या कुटुंबाला किती धान्य (Ration Dhanya Status) मिळणार आहे त्याची माहिती दिली जाते.

सरकारने जेवढे आपल्याला धान्य मंजूर केलेले असते ते वेबसाईटवर दाखवले जाते. त्यापैकी आपल्याला किती मिळते हे आपण चेक (Ration Dhanya Status) करू शकतो. अशा प्रकारे आपल्याला आपले धान्य बरोबर मिळते का नाही याची चौकशी करू शकतो.

रेशन दुकानावरील तक्रारी:

आता माहिती अधिकाराच्याद्वारे आपण आपल्या दुकानातील कारभार सुरळीत चालू आहे का? याची माहिती मिळवू शकतो. कारण रेशननिंग व्यवस्थेवर खूप गरिबांचे पोट चालू आहे. खूप वेळ दुकानदारांच्या तक्रारी येत असतात की, महिन्याचे जे रेशन आहे ते फक्त ८ दिवस वाटले जाणार किंवा आठवड्यातून फक्त २ वेळ रेशन दिले जाणार. यावेळी धान्य कमी आले आहे त्यामुळे तुम्हाला पण कमी दिले जाईल. अशा अनेक तक्रारी वारंवार येत असतात. जर कामकाज नीट चालत नसेल तर आपण माहितीच्या अधिकाराद्वारे कारभार कसा चालतो याची माहिती मिळवू शकतो.

ही माहिती केंद्रीय माहितीच्या अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत येते. याच्या अर्जामध्ये ३ प्रकार पडतात. पहिला म्हणजे जनमाहिती अधिकार, दुसरा अपिली अधिकारी यांना द्यायचा अर्ज, तिसरा म्हणजे अर्ज थेट आयुक्तांना द्यायचा. त्यांना अ, ब, क असे गट पाडण्यात आले आहेत.

हा अर्ज आपण साध्या कागदावरसुद्धा करू शकतो. अर्जामध्ये अर्जदाराचे नाव टाकायचे. अर्जदाराचा पूर्ण पत्ता टाकायचा. माहीतिचा विषय टाकायचा. खाली लिहायचे की, आपल्या कार्यालय अंतर्गत असलेल्या दुकान नंबर (जो असेल तो) स्वस्त धान्य दुकानांमध्ये आला आहे.

तसेच अन्नधान्य व तेल रॉकेलचा या व पुढील महिन्यातील समायोजित झालेला कोटा इत्यादी नोंदी असलेल्या रजिस्टरची सत्यप्रत द्यावी.व विक्री पावती बुकची सत्यप्रत द्यावी. आपल्या कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या घाऊल रॉकेल दुकानदारांची संख्या किती? आता माहिती कोणत्या प्रकारे हवी आहे ते लिहावे.

अर्जदार दारिद्र्य रेषेखालील आहे की नाही ते लिहावे. १० रुपयांचा कोर्ट फी स्टॅम्प पेपर जोडा. अर्जदाराची सही, ठिकाण, दिनांक, मोबाईल नंबर लिहा. असा अर्ज करून जमा करा.

रेशन दुकानदाराच्या तक्रारी सार्वजनिक वितरण तक्रार निवारण प्रणाली नि:शुल्क क्रमांक 1800-22-4950 व 1967 तसेच ई-मेल: helpline.mhpds@gov.in वर तक्रार करा.

खालील लेख देखील वाचा !

  1. रेशन कार्ड (Ration Card) आधार प्रमाणीकरनाचे स्टेटस ऑनलाईन चेक करण्याची प्रोसेस!
  2. रेशन कार्ड (Ration Card) ऑनलाईन डाऊनलोड करण्याची प्रोसेस !
  3. नवीन रेशनकार्डसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती!
  4. रेशन दुकानांमध्ये ‘फोर-जी ePOS मशिन’ व ‘IRIS’ स्कॅनची सोय !
  5. वन नेशन वन रेशन कार्ड (Ration Card) योजनेअंतर्गत ‘Mera Ration’ अ‍ॅप लाँच केले; आता देशामध्ये कोणत्याही राज्यातून रेशन मिळणार !
  6. रेशनिंगचे नियम, माहिती, हक्क आणि रेशनदुकानदारा विरुध्द तक्रार करण्यासाठी काय करावे? जाणून घ्या सविस्तर माहिती
  7. शिधापत्रिका रास्तभाव दुकानासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती!
  8. भटके, विमुक्तांना आता ओळखपत्र व वास्तव्याचा पुराव्याविना मिळणार शिधापत्रिका !
  9. अंत्योदय शिधापत्रिका धारक प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी मोफत !
  10. एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक (Ration Card) शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजना
  11. शिधापत्रिका धारकांच्या लाभार्थी संख्येत वाढ – नवीन शासन निर्णय जारी
  12. एपीएल केशरी रेशन (Ration Card) कार्डधारक शेतकऱ्यांना धान्याऐवजी आता रोख रक्कम; सुधारित योजना !
  13. पांढरे रेशन (Ration Card) कार्डधारकांनाही आयुष्यमान अंर्गत ५ लाखांपर्यंत मोफत उपचार !

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

6 thoughts on “रेशनकार्डवर आपल्याला किती धान्य मिळते हे ऑनलाईन कसे तपासायचे? जाणून घ्या सविस्तर माहिती!

  • प्रत्येक वेळेस उपयुक्त माहिती देतात. तुम्ही माहिती देतात याबद्दल आम्हाला खूप योजनांची माहिती मिळते तुमच्या माहितीच्या आधारे आम्ही या योजनेचे लाभ मिळू शकतो आमचे मित्र मंडळी तुमचे लेख वाचतात तुमची माहिती आम्हाला खूप छान वाटते

    Reply
  • Krishna shantaram Gholekar

    प्रत्येकी मानसी किती धान्य भेटते?

    Reply
  • Sushil Vilas kilje

    धान्यपूर्ती

    Reply
  • प्रमोद सोनवणे

    मला रेशन कार्डावर अजीबात धान्य मिळत नाही. अॅनलाइन करा असे दुकानदार बोलतो. तहसील मधे गेलो तर तुमचे आॅन लाईन झालेले आहे. मला बारा अंकी RC नंबर पण आहे पण रेशन दुकानात मशीन वर दाखवत नाही
    काय करावे खुफ चकरा मारल्या आहेत

    Reply
    • रेशन दुकानदाराच्या तक्रारी सार्वजनिक वितरण तक्रार निवारण प्रणाली नि:शुल्क क्रमांक 1800-22-4950 व 1967 तसेच ई-मेल: helpline.mhpds@gov.in वर तक्रार करा.

      Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.