सरकारी कामे

“तौक्ते” चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या नागरिकांना मदत देण्याबाबतचा शासन निर्णय जारी

राज्यामध्ये तोक्ते चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या आपत्तीग्रस्तांना वाढीव दराने मदत देण्याचा निर्णय दिनांक २७ मे २०२१ रोजीच्या झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता आणि “तौक्ते” चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या नागरिकांना मदत देण्याबाबतचा शासन निर्णय आज दिनांक ३ जून २०२१ रोजी जारी केला.

दिनांक १७ मे, २०२१ रोजी” तौक्ते” चक्रीवादळाचा तडाखा राज्यातील किनारपट्टीच्या व इतर काही जिल्हयांमध्ये बसला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या व्यक्तींना विविध बाबींच्या नुकसानीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी/राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी मधून केंद्र शासनाने विहित केलेल्या दरानुसार मदत देण्यासाठी संदर्भाधीन शासन निर्णयान्वये आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

खालील शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेल्या मदतीच्या दरामध्ये सदर घटनेसाठी “निसर्ग” चक्रीवादळामध्ये देण्यात आलेल्या दरानुसार “तौक्ते” चक्रीवादळातील बाधित व्यक्तींना मदत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या दि.२७.०५.२०२१ रोजी झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. सदर बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार “तौक्ते” चक्रीवादळातील बाधित व्यक्तींना मदत देण्याच्या संदर्भात आदेश निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

१. पूर्वी रोजगार हमी योजनेखाली जशी फळबाग योजना लागू होती त्याच धर्तीवर सचिव, जलसंधारण व रोजगार हमी योजना यांनी योजना कार्यान्वित करणेबाबत कार्यवाही करावी.

२. चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना दिनांक २६.०८.२०२० च्या शासन निर्णयान्वये अनुज्ञेय करण्यात आल्याप्रमाणे मोफत अन्न धान्य व केरोसीन वाटप करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

३. “तौक्ते” चक्रीवादळामुळे झालेल्या मनुष्यांच्या मृत्यूसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून रू.४.०० लक्ष इतक्या रक्कमेसोबतच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अतिरिक्त रू. १.०० लक्ष इतकी मदत देण्यात येणार. यासाठी संबंधित जिल्हाधिकारी यांनी सविस्तर तपशीलासह प्रस्ताव मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडे पाठवावा.

४. राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDR) मधील विहित दरापेक्षा अधिक दराने देण्यात येणाऱ्या वाढीव मदतीची रक्कम राज्य शासनाच्या निधीतून खर्च करण्यात येणार.

५. पंचनामे करण्यात आल्यानंतर लाभार्थी निश्चित करण्यात येणार. त्यानंतरच यासाठी निधी वितरित केल्यानंतर रक्कम आहरित करून लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हस्तातंरित करणार.

“तौक्ते” चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या नागरिकांना मदत देण्याबाबत दि. ०३ जून २०२१ चा शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

तौक्ते चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या व्यक्तींना मदत वाटप करण्यासाठी जिल्हयांना निधी वितरित करण्याबाबत दि. २३ जून २०२१ चा शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.