ग्राम विकास विभागमहाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेष

ग्रामरोजगार सेवक मनरेगा हजेरीपट (e-muster) निर्गमित करणार

महाराष्ट्र राज्यात सन १९७७ (सन २००६ मध्ये बदल केल्यापासून) रोजगार हमी अधिनियमाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या योजनेंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना- महाराष्ट्र ही योजना सुरू आहे. या योजनेच्या कामावरील हजेरीपट (e-muster) प्रचलित पद्धतीप्रमाणे न काढता त्यासाठी ग्रामपंचायतीला प्राधिकृत करणे व ग्रामपंचायत पातळीवरच ई-मस्टर निर्गमित करण्याची कार्यवाही करणे, त्यासाठी ग्रामपंचायतीला क्षमताबांधणी करणे व ई-मस्टर निर्गमित करण्याची जबाबदारी ग्रामरोजगार सेवक यांचेवर सोपविणे उचित होईल.

ग्रामपंचायत स्तरावर मग्रारोहयो चे अभिलेखे व नोंदवहया ठेवल्या जातात. या कामात ग्रामसेवकाला मदत करण्याची व संगणकीय माहिती इत्यादी भरण्यासाठी मदतनीस म्हणून ग्रामरोजगार सेवकांच्या सेवा ग्रामपंचायती मार्फत घेतल्या जातात. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे अभिलेखे व नोंदवहया ठेवण्याची जबाबदारी व ग्रामसेवकांना सहाय्य म्हणून मदत करण्याची प्रत्यक्ष काम करण्याची जबाबदारी ग्रामरोजगार सेवकांची आहे. मनरेगा अंतर्गत ग्रामसेवकाला मदत करण्यासाठी ग्रामरोजगार सेवक यांच्या सेवा ग्रामपंचायतीमार्फत घेण्यात आल्या आहेत. व त्यांच्या सेवा महत्वाच्या आणि उपयुक्त ठरल्या आहेत.

हजेरीपट (e-muster) ग्रामपंचायत स्तरावरून निर्गमित करण्याबाबतची कार्यपध्दती महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचयातीमध्ये अवलंबिल्यास मजुरांची मागणी प्राप्त झाल्यानंतर तालुका स्तरावर न जाता ग्राम पंचायत स्तरावरून Demand Upload करून ई-मस्टरची प्रत वेळीच घेतल्यास ग्राम रोजगार सेवकाला तालुका स्तरावर कामाची मागणीनुसार मजुराची यादी तालुक्याला पोहचण्याकरिता लागणारा कालावधी तसेच ई मस्टर प्राप्त करून घेण्याकरिता लागणारा वेळ वाचेल तसेच डाटा एंट्री करिता होणारा विलंब टाळता येईल. त्यानुषंगाने महात्मा गांधी नरेगाच्या कामावरील हजेरीपट (e-muster) निर्गमित करण्याची जबाबदारी ग्रामरोजगार सेवक यांना देणेबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

ग्रामपंचायत स्तरावरील ग्रामरोजगार सेवकांच्या सेवा उपलब्धतेबाबत कार्यवाही करून, त्यांच्या सेवेचा वापर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी करण्याकरिता शासन निर्णय अधिक्रमित करून शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे.

>

शासन निर्णय :-

“महात्मा गांधी नरेगाच्या कामावरील हजेरीपट (e-muster) निर्गमित करण्याची जबाबदारी ग्राम रोजगार सेवक यांना देणेबाबत.”

सर्व ग्रामरोजगार सेवकांना एम.एस.सी.आय.टी. (संगणक परिक्षा) उत्तीर्ण असल्याचे निश्चित केल्याप्रमाणे सर्व ग्रामरोजगारसेवक ई-मस्टर निर्गमित करण्यासाठी सक्षम आहेत. रोजगार हमी योजनेच्या सर्व कायदेशीर कामाची जबाबदारी ग्रामरोजगारसेवक यांच्यावर आहे.

ई-मस्टर निर्गमित करण्यासाठी ग्रामरोजगार सेवक यांची जबाबदारी:

१) सदर कामावर हजर राहणा-या अपेक्षित मजुरांची यादी प्राप्त झाल्यानंतर www.nrega.nic.in या अधिकृत संकेतस्थळावरुन GP Login मध्ये जावून demand upload करणे. (D.३ Works Demand-demand for work entry)

२) www.nrega.nic.in या अधिकृत संकेतस्थळावरुन GP Login मध्ये जावून नविन कामाकरीता Work Code Generate करणे. (D.४ Works)

३) Demand upload झाल्यानंतर याच संकेतस्थळावरुन यादीतील मजुरांना Work allocation ची प्रक्रिया पूर्ण करणे (D.५ Works Allocation- work allocation entry) व तालुका स्तरावरील ई- मस्टरशी संबंधीत ऑपरेटर ला दुरध्वनीवरुन या बाबीची सुचना देणे.

४) तालुका स्तरावरील ऑपरेटर PO Login मधुन या Demand ला Approve/issue (D.७.१- Generate E-muster Roll) केल्यानंतर सदर ई-मस्टरची प्रिंट GP Login मधून काढणे. (D.७.२- E-Muster Roll-print E-Muster Roll)

५) प्रत्यक्षात काम सुरू झाल्यानंतर ७ दिवसांच्या कामांचे मोजमापानुसार मजुरी दराची नोंद घेऊन पूर्ण भरलेले ई-मस्टर ग्राम रोजगार सेवक डेटा एंट्री करेल (D.७.२-E-Muster Roll- Fill E- Muster Roll) व Wage list Generate(D.C Wage List-Generate wage list for payment) व मजुरी प्रदानाच्या पुढील कार्यवाहीकरीता AAO Login ला पाठवेल. (D.८ Wage List- Add payment details to wage list & send).

जिल्हा MIS समन्वयक यांनी स्वतः तालुकास्तरावर जाऊन ई मस्टर प्रक्रियेशी संबंधीत ग्राम पंचायतीतील संबंधित ग्रामरोजगार सेवक यांना प्रशिक्षण द्यावे तसेच सर्व ग्राम पंचयातींचे GP Log in करिता User Name व Password उपलब्ध करून द्यावे.

सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी व संनियंत्रण आयुक्त, मनरेगा नागपूर यांच्यामार्फत करण्यात येईल.

नियोजन विभाग शासन निर्णय: महात्मा गांधी नरेगा कामावरील हजेरीपट (e-muster) निर्गमित करण्याची जबाबदारी ग्रामरोजगार सेवक यांना देणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – मनरेगा संबंधित तक्रार आणि सुचना ऑनलाईन नोंदवा ! Register MNREGA related complaints and suggestions online!

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.