अंतिम मतदार यादी 2022 वार्डनुसार PDF फाईल मध्ये ऑनलाईन कशी डाउनलोड करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती – Final Electoral Roll (Voter list) 2022 PDF (Part Wise)
मतदान करायचं म्हटलं तर गावातील मतदार यादीत आपलं नाव आहे की नाही याची माहिती असणं आवश्यक असतं. बऱ्याचदा मतदार यादीतून नाव गाळलं जाऊ शकतं, त्यामुळे आपलं नाव मतदार यादीमध्ये आहे की नाही हे तपासून पाहावं. हीच माहिती घरबसल्या मोबाईल/लॅपटॉपवर ऑनलाईन कशी पाहायची, हे आपण आता जाणून घेऊया.
अंतिम मतदार यादी 2022 वार्डनुसार PDF फाईल मध्ये ऑनलाईन डाउनलोड करण्याची प्रोसेस:
मतदार यादी पाहण्यासाठी सगळ्यांत आधी खालील लिंक वर क्लिक करा, त्यानंतर तुमच्यासमोर मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र ही वेबसाईट ओपन होईल.
https://ceo.maharashtra.gov.in
मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र या वेबसाईटच्या Electoral Roll या मुख्य मेनूमध्ये PDF Electoral Roll (Partwise) या पर्यायावर क्लिक करा.

त्यानंतर मतदार यादी पाहण्यासाठी तुम्हाला तुमचा जिल्हा, विधानसभा मतदारसंघ आणि गावाचं नाव निवडायचं आहे आणि मग कॅप्चा टाकायचा आहे, म्हणजे काय तर समोरच्या रकान्यात दिसणारे आकडे आणि अक्षरं जशीच्या तशी तुम्हाला इथे टाकायची आहेत.
त्यानंतर Open PDF या पर्यायावर क्लिक करा, मग तुमच्यासमोर तुमच्या गावाची मतदार यादी PDF फाईल मध्ये ओपन होईल, ती फाईल तुम्ही डाउनलोड करू शकता.

मतदार यादी असं या यादीचं शीर्षक असतं. इथे सुरुवातीला आपले गाव ज्या विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघात येतं त्या मतदारसंघाचं नाव, क्रमांक आणि आरक्षणाची स्थिती दिलेली असते.
पुढे आपल्या मतदान केंद्राच्या तपशीलात मतदान केंद्राचं नाव, क्रमांक आणि पत्ता दिलेला असतो आणि त्यानंतर मतदारांची संख्या (महिला, पुरुष, तृतीयपंथी) दिलेली असते.
त्यानंतर आपल्या गावातील मतदारांच्या नावाची यादी दिलेली असते. यात मतदाराचं नाव, पती किंवा वडिलांचं नाव, घर क्रमांक, वय, लिंग ही माहिती दिलेली असते. अशा पद्धतीनं तुम्ही या यादीत तुमचं नाव शोधू शकता.
मतदार मदत केंद्रे : प्रभारी नाव आणि संपर्क क्रमांक मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.
जिल्हा संपर्क यादी : जिल्हा संपर्क यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
मतदार यादी फॉर्म : विविध मतदार यादी फॉर्म डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
वगळणी केलेल्या मतदारांची यादी : वगळणी केलेल्या मतदारांची यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेल्पलाईन क्रमांक – 1800221950/1950
फोन नंबर – 022-22021987
ई-मेल आयडी – [email protected]
हेही वाचा – घरबसल्या मतदान कार्ड ऑनलाईन कसे काढायचे? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस – Voting Card Apply Online?
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!
मतदानाची यादी
Graduate constituency!