लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ वितरणाचा दुसरा टप्पा 31 ऑगस्ट रोजी !
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 31 जुलैपर्यंत मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार दि. 17 ऑगस्ट पर्यंत लाभ वितरण करण्यात आले आहे. ई- केवायसी (आधार सिडींग) अभावी प्रलंबित अर्ज व नव्याने मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार लाभ वितरणाचा दुसरा टप्पा (Ladki Bahin Yojana Labh Vitaranacha Dusra Tappa) 31 ऑगस्ट पर्यंत होणार आहे, तरी सर्व लाभार्थी महिलांनी त्यांचे बँक खात्याची आधार सिडींग करुन ई – केवायसी प्रक्रीया तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन शासनामार्फत केले आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ वितरणाचा दुसरा टप्पा – Ladki Bahin Yojana Labh Vitaranacha Dusra Tappa:
राज्यातील अनेक महिला लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करुन लाभ वितरणासाठी शासनाकडे पाठविण्यात आले आहेत. या पैकी आधार सिडींग नसलेल्या लाभार्थ्यांना व्यक्तीशा बँकेत / पोस्टात जाऊन आधार सिडींग करणेबाबत आवाहन करण्यात येत आहे. तसेच नव्याने प्राप्त अर्जही विधानसभा क्षेत्रनिहाय समितीच्या अंतिम मंजुरीने शासनाकडे लवकरच पाठविण्यात येणार आहेत.
पहिल्या टप्प्यातील महिलांना प्रत्येकी 3 हजार रुपये लाभ वितरीत करण्यात आला आहे. आधार सिडींग करुन ई – केवायसी पूर्ण नसल्याने ज्या महिलांच्या खात्यात रक्कम अद्यापपर्यंत जमा झाली नाही त्या लाभार्थी महिलांनी आधार सिडींग करुन ई – केवायसी पूर्ण केल्यावर त्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे.
आधार सिडींग करुन ई केवायसी प्रलंबित असलेल्या महिलांना शासनातर्फे मोबाइल संदेश पाठविण्यात आला आहे, त्यांनी तातडीने आपले खाते आधार सिडींग करुन ई – केवायसी पूर्ण करावी, असे आवाहन केले आहे. लाडकी बहीण योजनेचा दुसरा राज्यस्तरीय (Ladki Bahin Yojana Labh Vitaranacha Dusra Tappa) मेळावा नागपूरमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.
हा मेळावा 31 ऑगस्टला होणार आहे. या माध्यमातून ऑगस्ट महिन्यात अर्ज दाखल केलेल्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली. दुसरा राज्यस्तरीय डीबीटी निधी वितरण सोहळा 31 ऑगस्टला नागपूरमध्ये होत आहे. ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर केले आहेत. त्यांच्या अर्जांची छाननी सुरु असून त्यांना 31 ऑगस्टला पैसे मिळतील, असं अदिती तटकरे म्हणाल्या.
ऑगस्ट महिन्यात आलेल्या अर्जांनुसार नागपूरच्या ((Ladki Bahin Yojana Labh Vitaranacha Dusra Tappa) कार्यक्रमात 45 ते 50 लाख महिलांच्या खात्यात 3 हजार रुपये वर्ग केले जाणार आहेत. यापूर्वी पुण्यात पहिला राज्यस्तरीय निधी वितरण सोहळा पार पडला होता. त्यावेळी जुलै महिन्यात अर्ज सादर करणाऱ्या महिला अर्जदारांपैकी पात्र ठरलेल्या 1 कोटी आठ लाख लाभार्थी महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये वर्ग करण्यात आले होते.
राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नारीशक्ती अॅप मधून अर्ज दाखल करुन घेतले होते. ज्या महिलांच्या खात्यात सरकारनं पैसे पाठवले होते त्यामधील काही रक्कम बँकांनी कपात केली होती. मात्र, राज्य सरकारनं बँकांना आदेश देत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पैशांची कपात न करता ते महिलांना द्यावेत, असे आदेश दिले होते.
राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रचार प्रसारासाठी विविध जिल्ह्यात कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. त्याशिवाय पुण्यातील पहिल्या राज्यस्तरीय निधी वितरण सोहळ्यानंतर आता दुसरा सोहळा (Ladki Bahin Yojana Labh Vitaranacha Dusra Tappa) नागपूरमध्ये आयोजित केला जाणार आहे.
हेल्पलाइन टोल फ्री संपर्क क्रमांक : १८१ (महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र)
खालील लाडकी बहीण योजनेच्या संबंधित महत्वपूर्ण लेख वाचा !
- मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना; असा भरा वेबपोर्टल वरून ऑनलाईन अर्ज !
- लाडकी बहीण योजनेच्या अर्जाचे स्टेट्स ऑनलाईन चेक करा !
- मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना : रद्द झालेले अर्ज, दुरुस्तीसह पुन्हा दाखल करण्याचे आवाहन, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया !
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजेनेची लाभार्थी यादी ऑनलाईन पाहण्याची प्रोसेस!
- लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यामध्ये आले नाही तर हे काम करा !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!