वृत्त विशेष

विदेशामध्ये जॉबसाठी महाराष्ट्र इंटरनॅशनलच्या सोशल मिडिया चॅनलमध्ये सहभागी व्हा

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या अंतर्गत महाराष्ट्र इंटरनॅशनल या उपक्रमाची स्थापना करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत राज्यातील प्रशिक्षित उमेदवारांना विदेशामध्ये विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून सोशल मिडिया चॅनलची स्थापना करण्यात आली आहे. या सोशल मिडिया चॅनलवर महाराष्ट्र इंटरनॅशनल अंतर्गत विदेशामध्ये असणाऱ्या विविध रोजगाराच्या संधीची सविस्तर माहिती प्रसारित करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्र इंटरनॅशनल अंतर्गत इस्त्राईलमध्ये बांधकाम क्षेत्रातील 10 हजार पदांसाठी, युकेमध्ये वैद्यकीय क्षेत्रातील अधिपरिचारिकेच्या 120 पदांसाठी तर फिनलँडमध्ये काळजीवाहकाच्या 50 पदांसाठी भरती होणार आहे. याबाबतची माहितीही या चॅनलच्या माध्यमातून घेता येणार आहे.

महाराष्ट्र इंटरनॅशनल अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या सोशल मिडिया चॅनलमध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक युवतींनी सहभागी होऊन विदेशामध्ये रोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा. या चॅनलमध्ये सहभाग नोंदविण्यासाठी https://rojgar.mahaswayam.gov.in/#/mic या लिंकला भेट द्यावी.

हेही वाचा – “महाराजा सयाजीराव गायकवाड-सारथी परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना”

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.