वृत्त विशेषग्राम विकास विभागजिल्हा परिषदमहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र शासन निर्णय - GRसरकारी योजना

उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला बचत गटांना शासनाची खुशखबर !

राज्यातील ग्रामीण भागातील गरीबी निर्मुलनासाठी केंद्र शासनामार्फ़त दीन दयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान (DAY-NRLM) राबविण्यात येत असून यासाठी राज्यात या अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (Maharashtra State Rural Livelihoods Mission) अर्थात “उमेद” ची सन २०११ मध्ये स्थापना संदर्भिय शासन निर्णयान्वये करण्यात आलेली आहे.

सदर अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरीबी निर्मूलनाचे प्रयत्न करण्यात येत असून त्यासाठी केंद्र शासनामार्फत ६०% तर राज्य शासनामार्फत ४०% अनुदान देण्यात येत आहे. या अभियानाची अंमलबजावणी करताना राज्यात ग्रामीण भागातील गरीब व जोखीमप्रवण महिलांना समृध्द, आत्मसन्मानाचे व सुरक्षित जीवन जगता यावे, यासाठी त्यांच्या सर्वसमावेशक, लोकशाही तत्वावर आधारीत स्वयंचलित समुदाय संस्थांची निर्मिती करण्यात येत आहे. अभियानाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरापासून ते क्लस्टरस्तरापर्यत स्वतंत्र, समर्पित व संवेदनशील यंत्रणा निर्माण करण्यात आलेली आहे.

सदर अभियान राज्यातील ३४ जिल्हे व ३५१ तालुक्यांमध्ये राबविण्यात येत असून यामध्ये गरीब महिलांचे स्वयं सहाय्यता गट व स्वयं सहाय्यता गटांचे ग्रामसंघ व ग्रामसंघाचे प्रभागसंघ तयार करुन गरीब महिलांचे संघटन तयार करण्यात येते. तसेच गरीब कुटुंबांना शाश्वत उपजीविका उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतात. समुदायस्तरीय संस्थांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रेरिका (Internal Community Resource Person ICRP ) व विविध प्रकारच्या समुदाय संसाधन व्यक्ती (Community Resource Person CRP) कार्यरत आहेत.

सदर कार्यरत प्रेरकांच्या (Internal Community Resource Person ICRP ) मुल्यमापन करून “अ”, “ब” व “क” वर्गवारीनुसार दरमहा मानधन अदा करण्यात येते. तर इतर समुदाय संसाधन व्यक्ती (Community Resource Person CRP) / सखी यांना महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाने निश्चित केलेल्या उद्दिष्टानुसार (Task Base) त्यांच्या कामाचे मुल्यमापन करुन त्यांच्या कामाच्या प्रगती अहवालानुसार त्यांना दरमहा मानधन अदा करण्यात येते.

तसेच अभियानांतर्गत स्थापन झालेल्या स्वयं सहाय्यता गटांच्या “अ”, “ब” व “क” वर्गवारीत श्रेणीकरण करुन फिरता निधी (RF) वितरीत करण्यात येतो. सदर कार्यरत समुदाय संसाधन व्यक्तीं (समुदाय संसाधन व्यक्ती CRP) / प्रेरिका (ICRP) / सखी / व्यवसाय विकास support Person (BDSP) यांच्या मानधनात वाढ करणे व अभियानांतर्गत स्थापन झालेल्या स्वयं सहाय्यता गटांना देण्यात येणाऱ्या फिरता निधीमध्ये वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला बचत गटांना शासनाची खुशखबर !-

उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत सद्यस्थितीत कार्यरत समुदाय संसाधन व्यक्तींच्या मानधनात तसेच अभियानांतर्गत स्थापन झालेल्या स्वयं सहाय्यता गटांना देण्यात येणाऱ्या फिरता निधीमध्ये खालीप्रमाणे वाढ करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

अ) समुदाय संसाधन व्यक्ती (समुदाय संसाधन व्यक्ती-सीआरपी) / प्रेरिका (आयसीआरपी) / सखी / व्यवसाय विकास समर्थन व्यक्ती (बीडीएसपी) मानधन वाढ :-

अ. क्र.समुदाय संसाधन व्यक्त (समुदाय संसाधन व्यक्ती – CRP) / प्रेरिका (ICRP) / सखी / व्यवसाय विकास समर्थन व्यक्ती (BDSP)कामाच्या मुल्यमापन / कामाच्या वर्गवारीनुसार सद्य:स्थितीत देय असलेले कमाल मासिक मानधनमासिक मानधनामध्ये प्रती व्यक्ती वर्गवारीनुसार प्रति महा करावयाची मानधन वाढकामाच्या मुल्यमापन/कामाच्या वर्गवारीनुसार सुधारीत कमाल देय असलेले एकूण मासिक मानधन
1प्रेरिका (ICRP)३०००३०००६०००
2बँक सखी३०००३०००६०००
3आर्थिक साक्षरता सखी (FLCRP )३०००३०००६०००
4पशु सखी३०००३०००६०००
5कृषी सखी३०००३०००६०००
6मत्स्य सखी३०००३०००६०००
7वनसखी३०००३०००६०००
8मास्टर CRP (कृषी)४५००१५००६०००
9कृषी उद्योग सखी३५००२५००६०००
10Business Development support Person (BDSP)३५००२५००६०००
11कृतिसंगम सखी४५००१५००६०००

उपरोक्त समुदाय संसाधन व्यक्त (Community Resource Person-CRP) / प्रेरिका (ICRP) / सखी / Business Development support Person (BDSP) यांना त्यांच्या कामाचे प्रचलित पध्दतीने मुल्यमापन करुन कमाल रु.६०००/- दरमहा मानधन अदा करण्यात येईल. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सदर अभियानाचा कालावधी मार्च, २०२६ पर्यंत आहे. त्यामुळे माहे मार्च, २०२६ पर्यंत सदरील मानधन अभियानामार्फत अदा करण्यात येईल व त्यानंतर समुदाय संसाधन व्यक्तींचे मानधन संबंधित समुदायस्तरीय संस्था त्यांच्या स्व:उत्पन्नातून अदा करतील. याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्यास्तरावरुन निर्गमित करण्यात येतील.

ब) स्वयं सहाय्यता गटांना अतिरिक्त फिरता निधी-

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापन झालेल्या स्वयं सहाय्यता गटांना सद्य:स्थितीत “अ”, “ब” व “क” वर्गवारीत श्रेणीकरण करुन अधिकतम रु.१५,०००/- फिरता निधी (RF) वितरीत करण्यात येतो. यामध्ये वाढ करण्यात येत असून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनान्वये स्वयं सहाय्यता गटांची वर्गवारी करुन “अ” वर्गवारी प्राप्त होणा-या स्वयं सहाय्यता गटांना रु. ३०,०००/- देय राहील व वर्गवारी “ब” व “क” मध्ये येणा-या स्वयं सहाय्यता गटांना प्रचलित पध्दतीने फिरता निधी अनुज्ञेय राहील.

वरीलप्रमाणे अतिरिक्त फिरता निधी अदा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाने निश्चित केलेल्या कार्यपध्दतीचा अवलंब करण्यात येईल. यापूर्वी ज्या स्वयं सहाय्यता गटांना त्यांच्या वर्गवारीनुसार अभियानामार्फत फिरता निधी अदा केलेला आहे, अशा गटांना रु.१५०००/- अतिरिक्त फिरता निधी देय राहील. तसेच ज्या स्वयं सहाय्यता गटांना फिरता निधी अद्याप दिलेला नाही, परंतु जे स्वयं सहाय्यता गट फिरता निधी मिळण्यासाठी पात्र आहेत, अशा स्वयं सहाय्यता गटांना शासन निर्णयाच्या दिनांकापासून वरीलप्रमाणे फिरता निधी त्यांच्या वर्गवारीनुसार अभियानातील प्रचलित पध्दतीप्रमाणे अनुज्ञेय राहील.

सदर शासन निर्णय दिनांक १६.०९.२०२३ रोजीच्या संभाजीनगर येथील मंत्रीमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

ग्राम विकास विभाग शासन निर्णय : उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कार्यरत समुदाय संसाधन व्यक्तीं (Community Resource Person-CRP) / प्रेरिका (ICRP) / सखी/ Business Development support Person (BDSP) याच्या मासिक मानधनात वाढ करणे व अभियानांतर्गत स्थापन झालेल्या स्वयं सहाय्यता समूहांच्या फिरता निधी (RF) मध्ये वाढ करणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – DAY-NRLM अंतर्गत महिला बचत गट SHG सदस्यांना रु. 5,000 ओव्हरड्राफ्ट लाभ देण्याची योजना

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.