वृत्त विशेष

नवीन वेतन नियम काय आहेत जाणून घ्या सविस्तर माहिती

आपण या लेखामध्ये नवीन वेतन नियम काय आहेत,व त्याचा पगारावर कसा परिणाम होईल ते पाहणार आहोत. चालू वर्षांमध्ये कोरोनामुळे बरंच काही बदललं. या महारोगराईमुळे अनेकांचे रोजगार गेले,तसेच अनेक लोकांचे कामाचे तास कमी झाले,तर ज्या कंपन्या कोरोनामुळे बंद होत्या त्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून काढूनही टाकले व काही लोकांच्या पगारात कपात केली.

नवीन आर्थिक वर्षांपासून म्हणजेच २०२१ च्या एप्रिल महिन्यापासून आपल्या वेतनामध्ये बदल झालेला दिसून येईल,कारण गेल्या वर्षी केंद्र सरकारने The Code on Wages Bill, 2019 मंजूर केलं होतं.ते २०२१ पासून लागू होणार आहे.या बदलामुळे सर्वांच्याच हातामध्ये आतापेक्षा कमी पगार येईल.

पूर्वीचे अस्तित्वात असलेले नियम:

पूर्वीपासून वेतनासंदर्भात चार नियम हे अस्तित्वात आहेत यामध्ये १९४८ ला किमान वेतन कायदा अस्तित्वात आला. तर १९६५ ला बोनस वाटप कायदा अस्तित्वात आला.तसेच १९३६ ला वेतन वाटप कायदा अस्तित्वात आला.तर १९७६ ला समान मोबदला कायदा आला,तर असे चार नियम अस्तित्वात आहेत. मग नवीन नियम कशासाठी त्याचे काय महत्व आहे तर या चारही नियमांचे आतापर्यंत एक स्वतंत्र अस्तित्व होते.तर हे स्वतंत्र अस्तित्व संपवून हे चारही नियम नव्या वेतन संहितेमध्ये एकत्रित करण्यात आले आहेत.

नवीन नियमानुसार बदल:

आतापर्यंत प्रत्येक राज्यात वेगवेगळे किमान वेतन दिले जात होत.आता या नवीन नियमामुळे वेतनासंदर्भात एकसमान अशी व्याख्या अस्तित्वात येईल.याचा परिणाम सामान्य लोकांना कसा पडणार आहे ते पाहूया,

१)कर्मचाऱ्यांना दिले जाणारे भत्ते पगाराच्या 50 टक्क्यांहून जास्त असू शकणार नाहीत:

म्हणजेच कर्मचाऱ्यांना जी बेसिक सॅलरी दिली जाते त्यामध्ये वेगवेगळ्या भत्त्यांचे भाग असतात.यामध्ये खाजगी क्षेत्रामध्ये एखाद्या व्यक्तीचं पद जसजसे वाढते तसे त्याला मिळणाऱ्या भत्त्यांचं प्रमाण वाढतं,व हे भत्ते मिळणाऱ्या एकूण रकमेच्या निम्म्यापेक्षा जास्त असतात.म्हणजेच बेसिक सॅलरी कमी असते आणि भत्ते जास्त असतात.पण या नियमानुसार इथेच गोष्टी बदलणार आहेत.

२)वेतनामध्ये बदल:

तसेच बेसिक सॅलरीमध्ये सुद्धा बदल झालेला दिसून येईल,म्हणजेच बेसिक सॅलरी ही एकूण पगाराच्या 50 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असावी लागेल.त्यामुळे नवीन नियम लागू झालायनंतर तुमच्या वेतनामध्ये बदल झालेला दिसून येईल.

३) पी.एफ व ग्रॅच्युटी यामधील बदल:

नवीन नियमानुसार आपल्या पगारातून जो पी.एफ कापला जातो तो तो आपल्या बेसिक वेतनामधून कापला जातो.पण जर आपले वेतन वाढले म्हणजेच बेसिक सॅलरी मध्ये वाढ झाली तर पीएफ च्या हप्त्यातही वाढ होणार आहे.तसेच तूमची कंपनीही त्यांच्या तर्फे जास्त पीएफ जमा करेल.व हा नियम ग्रॅच्युटी ला हि लागू पडतो.

४)पगाराच्या वाटपामध्ये कसा बदल होईल:

आपण हे एका उदाहरणाद्वारे जाणून घेऊया

१)पहिल्या नियमानुसार बदल-समजा,सुरेशचा आताचा पगार 50,000 आहे.यामधील बेसिक पे तो आहे, 15000 तर त्यावर 12 टक्क्यांनी प्रॉव्हिडंड फंड सध्या कापला जातो म्हणजे साधारण 1800 रुपये.त्यामुळे त्याला हातात येणारा सध्याचा पगार म्हणजेच 48,200 रुपये

नवीन नियमानुसार होणारे बदल- समजा यामध्ये सुरेश चा पगार 50,000 आहे.तर त्याचा बेसिक पे होईल २५००० रुपये. व त्यावर १२ टक्क्यांनी पी. एफ. कापला जाईल तो असेल ३००० रुपये.त्यामुळे सुरेश च्या हातात येणारा पगार असेल ४७००० रुपये. म्हणजेच मागील पगारांपेक्षा १२०० रुपये सुरेश ला कमी मिळतील.

निवृत्तीनंतर कोणते फायदे होतील:

जरी नवीन नियमाप्रमाणे तुलनेने कमी पगार येणार असला तरी निवृत्तीनंतर आपल्या हातात आताच्या कॅलक्युलेशनपेक्षा जास्त पैसे येतील.कारण आपल्या पी. एफ. मध्ये वाढ होणार आहे.

नवीन नियमाप्रमाणे खासगी कंपन्यांना कर्मचाऱ्यांच्या पगाराची पुन्हा आखणी करावी लागेल.त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांचा पीएफ आणि ग्रॅच्युटी वाढणार असल्याने कंपन्यांसाठी हा वाढीव बोजा असेल.

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.