आपले सरकार - महा-ऑनलाईनमहानगरपालिकामहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीवृत्त विशेष

आपले सरकार सेवा केंद्र – महा ई सेवा केंद्र अकोला जिल्ह्यासाठी अर्ज सुरू, पहा अटी शर्ती – Aapale Sarkar Seva Kendra Akola District

अकोला जिल्हातील 176 महापालिका प्रभाग / नगर परिषद / नगर पंचायत / ग्रामपंचायतीमध्ये आपले सरकार सेवा केंद्रासाठी मान्यता द्यावयाची आहे, त्याकरिता CSC व स्थानिक केंद्र चालकांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे.

जिल्ह्यातील महापालिका, नगरपरिषद, नगरपंचायत ,ग्रामपंचायत क्षेत्रात ‘आपले सरकार सेवा केंद्र’ करिता इच्छुक सेवा केंद्र, स्थानिक केंद्रधारकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक अर्जदारांनी दि. २० पर्यंत आपले अर्ज ऑनलाईन सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

आपले सरकार सेवा केंद्र – महा ई सेवा केंद्र अकोला जिल्ह्यासाठी अर्ज सुरू, पहा अटी शर्ती – Aapale Sarkar Seva Kendra Akola District:

इच्छुक अर्जदारांनी दि. ८ ते २० दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ www.akola.gov.in या संकेतस्थळावरून अर्ज डाऊनलोड करावा. जिल्हा सुचना विज्ञान केंद्रास कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत दि.२० पर्यंत सादर करावा. त्यानंतर प्राप्त अर्जांचा विचार होणार नाही. यापूर्वी ज्यांनी आधार सेवा केंद्र मिळण्यासाठी अर्ज केले असतील त्यांनीही पुन्हा अर्ज करावे. यासंदर्भातील सर्व अटी शर्ती संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. जे अर्जदार पात्र ठरतील त्यांनी अर्ज भरतेवेळी ज्या भागात केंद्र मागितले असेल तेथेच केंद्र सुरु करणे बंधनकारक असेल.

>

ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर सर्व अनुषंगिक कागदपत्रे अर्ज स्विकृती केंद्रात भरलेल्या अर्जासोबत जमा करावे. पात्र अपात्र उमेदवारांची सर्व माहिती www.akola.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या जागांमध्ये वा वेळापत्रकांमध्ये बदल करण्याचे संपूर्ण अधिकार जिल्हाधिकारी तथा जिल्हा सेतू समिती अध्यक्ष यांचेकडे राखीव आहेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. तरी इच्छुकांनी अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अर्जासोबत सादर करावयाचे कागदपत्रे :

1. नमुना अर्ज

2. आधार कार्ड

3. पॅन कार्ड

4. जन्म नोंदणी प्रमाणपत्र अथवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र (सत्यप्रत )

5. शैक्षणिक गुणवत्ता प्रमाणपत्र (किमान दहावी SSC )

6. CSC केंद्र चालक असल्यास CSC प्रमाणपत्र.

7. MSCIT किंवा तत्सम संघनक प्रमाणपत्र.

अटी व शर्थी:

1. इच्छुक अर्जदारांनी दिनांक 08/02/2023 ते 20/02/2023 या कालावधीत या कार्यालयाचे संकेतस्थळ www.akola.gov.in वरुन विहीत अर्ज डाऊनलोड करुन जिल्हा माहिती तंत्रज्ञान कार्यालयास कार्यालयीन दिवशी कार्यालयीन वेळेत दिनांक 20/02/2023 रोजी साय 5:00 वा. पावेतो सादर करावा. त्यानंतर प्राप्त अर्जाचा विचार होणार नाही याची नोंद घ्यावी. अर्जामध्ये सर्व माहिती परिपूर्ण भरावी तसेच कोणत्याहि प्रकारची खोडतोड करू नये. जिल्हधिकारी कार्यालाच्या आवक जावक विभागात अथवा पोस्टाने अर्ज सादर करून नयेत, अशा अर्जाचा विचार केला जाणार नाही.

2. ज्या रिक्त महापालिका प्रभाग / नगर परिषद / नगर पंचायत / ग्रामपंचायतीकरिता जाहिरात प्रसिद्ध केली आहे तेथीलच CSC केंद्रचालक व स्थानिक नागरिक (इतर केंद्र चालक) आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करण्यास पात्र असेल.

3. अर्जदार किमान दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.

4. महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय क्र मातस – 1716 / प्र.क्र.557 / 39 दि. 19 जानेवारी 2018 मधील नमूद निर्देशानुसार प्राप्त अर्जधारकांपैकी ज्या CSC अर्जधारकाचे मागील सहा महिन्याचे (1 ऑगस्ट 2022 ते 31 जानेवारी 2023 पर्यंत) केंद्रावरील व्यवहार अधिकतम असतील अश्या अर्जदारास प्राधान्य देण्यात येऊन आपले सरकार सेवा केंद्राची नियुक्ती व कार्यान्वयीत केले जाईल.

5. तसेच, समान csc व्यवहार असल्यास अथवा एकही अर्जदार CSC केंद्र धारक नसल्यास वय जे नुसार प्राधान्य देण्यात येईल. आवेदकाना सर्व अटी व शर्तीचे पालन करणे बंधनकारक राहील.

6. अर्जदार फक्त एकच आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करू शकतात. त्यांचे कुटुंबातून दुसरा अ असल्यास तो ग्राह्य धरण्यात येणार नाही यापूर्वी ज्या अर्जधारकाकडे आपले सरकार सेवा केंद्र मंजूर आहे. अथवा जिल्हा परिषदेचे संग्राम केंद्र आहे, अशे अर्जदार व त्यांचे कुटुंबातून कोणताही व्यक्ती अर्ज करण्यात पात्र असणार नाही. अर्जामध्ये जर माहिती चुकीची असेल तर त्याचा अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.

7. आपले सरकार सेवा अर्जधारकांकडून कार्यालयाद्वारा कोणतेही शुल्क घेतले जात नाही, जर कोणताही इसम अथवा एजेंट यांचे कडून पैशाची मागणी होत असल्यास असा कोणताही व्यवहार करू नये याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय जबाबदार असणार नाही. त्याबाबतची कार्यालयास रीतसर कार करावी.

8. आपले सरकार सेवा केंद्र ज्या ठिकाणी देण्यात येईल त्याच ठिकाणी से कार्यरत असणे आवश्यक राहील केंद्राची जागा बदल्यास त्यांचे आपले सरकार सेवा केंद्र तात्काळ बंद करण्यात येईल.

9. जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी दिलेल्या आदेशाचे वेळोवेळी पालन करावे लागेल. तसेच त्यांनी दिलेल्या कॅम्प मध्ये केंद्र लावून नागरिकांना सेवा देऊन अहवाल सादर करावा लागेल.

10. नागरिकांची तक्रार आल्यास आपले सरकार सेवा केंद्राची चौकशी करून त्यावर कार्यवाही करण्यात येईल.

11. आपले सरकार सेवा केंद्र कोणत्याही परिस्थितीमध्ये हस्तांतर केले जाणार नाही मासनाने ठरून दिलेल्या वेळापत्रकानुसार केंद्र चालू ठेवणे, शासनाने ठरून दिलेले दर पत्रक केंद्रावर प्रसिद्ध करून शासकीय दरापेक्षा जास्त शुक्ल आकारणी करू नये तसे केल्यास केंद्र चालकावर कार्यवाही करून फौजदारी दाखल करण्यात येईल.

12. आपले सरकार सेवा केंद्रांना शासनाचे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात येणारे निर्देशांचे पालन करावे आपले सरकार केंद्र चालकास केंद्रबाबत कोणताही मागितलेला अहवाल तात्काळ सादर करणे बंधनकारक राहील.

13. आपले सरकार सेवा केंद्राच्या निवड प्रक्रियेदरम्यान जागा कमी व अधिक करणचे सर्व मा. जिल्हाधिकारी अकोला यांचकडे राखीव राहील.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – CSC सेंटर साठी असा करा ऑनलाईन नोंदणी अर्ज (Common Service Centres)

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.