दुचाकी विक्री करताना दोन हेल्मेट द्या, नाही तर कारवाई !
दुचाकीची विक्री करताना शोरूम चालकांनी ग्राहकाला दोन हेल्मेट (Free Two Helmets) देणे बंधनकारक आहे. आरटीओचे तसे निर्देश आहेत. मात्र, शोरूम चालक ग्राहकांना एकच हेल्मेट देत आहेत. तर ग्राहकांना दोन हेल्मेट मिळत नसतील तर त्यांनी तक्रार करावी, असे आरटीओ अधिकारी विनोद साळवी यांनी सांगितले.
दुचाकी विक्री करताना दोन हेल्मेट द्या, नाही तर कारवाई ! Free Two Helmets
आरटीओच्या निर्देशानुसार दुचाकी शोरूम चालकांना ग्राहकांना दोन हेल्मेट (Free Two Helmets) देणे बंधनकारक आहे. मात्र, दुचाकी खरेदी केल्यानंतर शोरूम चालकांनी दोन हेल्मेट (Free Two Helmets) दिली नाहीत, तर नागरिकांनी थेट आरटीओ कार्यालयात तक्रार करावी. संबंधित शोरूम चालकावर कारवाई केली जाणार आहे.
दोन हेल्मेट देणे बंधनकारक:
शहर आणि जिल्ह्यातील शोरूममध्ये दुचाकी विकत घेतल्यानंतर ग्राहकाच्या सुरक्षेसाठी दोन हेल्मेट (Free Two Helmets) देण्याचे शोरूम चालकाना आरटीओचे निर्देश आहेत. मात्र, त्याला केराची टोपली दाखवून एकच हेल्मेट (helmets) शोरूम चालकांकडून दिले जात आहे.
‘ग्राहकाला याबाबतची माहिती नसते’
शोरूममध्ये हप्त्यावर १ आणि काही जण रोख रक्कम घेऊन दुचाकीची खरेदी करतात. मात्र, दुचाकी खरेदी करणाऱ्या ग्राहकाला शोरुमकडून दोन हेल्मेट (Free Two Helmets) दिली जातात, याबाबतची माहिती नसते, असे शोरूम चालकांनी सांगितले.
२ दुचाकी खरेदी केल्यानंतर दोन हेल्मेट (Free Two Helmets) द्यायची आहेत. हे बंधनकारक असले तरी ते शोरूमधारकांना परवडण्यासारखे नाही. एखाद्या ग्राहकाने मागणी लावून धरल्यास दोन हेल्मेट (helmets) दिली जातात. मात्र, बहुतेक ग्राहकांना एकच हेल्मेट (helmets) दिले जाते, असे शोरूम चालकांचे म्हणणे आहे.
नियम पाळला जातो का?
शहरातील शांतीनगर येथील दुचाकी शोरूमची पाहणी केली असता, दुचाकी खरेदीनंतर एकच हेल्मेट (helmets) दिले जाते, अशी कबुली शोरूम व्यवस्थापकांनी स्वतः दिली. या प्रकाराने आरटीओनी घालून दिलेल्या दोन हेल्मेट (helmets) देण्याच्या नियमाला शोरूम चालकच केराची टोपली दाखवत असल्याचे उघड झाले. आहे.
शांतीनगर परिसरातील दुसऱ्या शोरूममध्येही एकच हेल्मेट (helmets) दिले जाते, असे शोरूम चालकांचे म्हणणे आहे. आरटीओचा दोन हेल्मेट (helmets) देण्याचा नियम त्यांना माहीत आहे, मात्र, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असून, बहुतांश ग्राहकांकडूनही तशी मागणी होत नाही.
मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम १२९ व मा. उच्च न्यायालय, मुंबई जनहित याचिका क. ८६/२००३ नुसार:
मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम १२९ नुसार दुचाकी वाहन चालक व त्याचा मागे बसून प्रवास करणाऱ्या व्यक्तीने ‘संरक्षक शिरोवेष्टन’ (हेल्मेट) वापरणे बंधनकारक आहे. तसेच मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी जनहित याचिका क. ८६/२००३ मध्ये दिलेल्या आदेशानुसार दुचाकी वाहन चालक व त्याच्या मागे बसून प्रवास करणाऱ्या व्यक्तीने हेल्मेट वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे.
मा. उच्च न्यायालयाच्या आदेशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची शासनाची जबाबदारी आहे. सदर आदेशांचे पूर्ण पालन होण्याच्या दृष्टीने दुचाकी वाहन चालकास दुचाकी वाहन चालविण्यासाठी शिकावू अनुज्ञप्ती देतेवेळी त्याचेकडून हेल्मेटच्या वापराविषयी बंधपत्र घेवूनच त्यास सध्या अनुज्ञप्ती दिली जाते. त्याचबरोबर मा. न्यायालयाचे आदेशांची पूर्ण पूर्तता होण्याच्या दृष्टीकोनातून आता दुचाकी वाहन उत्पादकांमार्फत त्यांच्या राज्यातील सर्व वाहन विक्रेत्यांनी दुचाकी वाहन विकतेवेळी खरेदीदारास दोन हेल्मेटस् (Free Two Helmets) पुरविण्याविषयी निर्देशित करण्यात येत आहे. तसेव वाहन नोंदणी प्राधिकाऱ्याने वाहन नोंदणीसाठी त्यांचेकडे सादर केल्या गेलेल्या कागदपत्रात वाहनासोबत दोन हेल्मेटस् पुरविण्यात आल्याचे नमूद असल्याबाबत खातरजमा करण्यास निर्देशित करण्यात येत आहे.
वाहन अपघातात दुचाकी वाहन चालविणाऱ्या व्यक्तीने आणि त्याच्या मागे बसणाऱ्या व्यक्तीने हेल्मेट परीधान केले असल्यास अपघाताची तीव्रता नक्कीच कमी होते ही वस्तुस्थिती आहे व त्यामुळे ही बाब विचारात घेवून, तसेच मा. उच्च न्यायालयाने याविषयी दिलेल्या आदेशांचे पालन होण्याच्या दृष्टीकोनातून व हेल्मेट (helmets) परीधान न केल्यास होणारी संभाव्य कारवाई टाळण्यासाठी दुचाकी वाहन चालकांनी आणि त्याचे मागे बसलेल्या व्यक्तीने वाहन चालविताना हेल्मेट (helmets) अनिवार्यपणे परीधान करावे असे सूचित करण्यात येते.
पुढील लेख देखील वाचा!
- वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविणे बंदनकारक; HSRP नंबर प्लेटसाठी असा करा ऑनलाईन अर्ज !
- घरबसल्या पसंतीचा वाहन क्रमांक मिळण्यासाठी असा करा ऑनलाईन अर्ज!
- वाहन 4.0 पोर्टलवर RTO च्या विविध सेवांचा घरबसल्या ऑनलाईन लाभ घ्या !
- नवीन बांधणी झालेल्या वाहनांची विक्रेत्यांमार्फत होणार नोंदणी !
- राज्यात RTO च्या सहा सेवा ऑनलाईन आणि फेसलेस; वाहन चालकांना फायदा होणार!
- लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स काढा फक्त आधार कार्डने, जाणून घ्या सविस्तर ऑनलाईन प्रोसेस
- दुचाकी विक्री करताना दोन हेल्मेट द्या, नाही तर कारवाई !
- गाडीचे आरसी बुक ऑनलाईन कसे डाउनलोड करायचे? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस !
- CSC ट्रान्सपोर्ट पोर्टल नवीन पोर्टल सुरु; आता CSC सेंटर मध्ये होणार RTO ची सर्व कामे !
- या वाहनांना वेग नियंत्रक उपकरण बसविणे बंधनकारक !
- वाहनांच्या सुगम स्थलांतरणाकरिता केंद्र सरकारने सुरु केली भारत मालिका (बीएच-सिरीज) ही नवी वाहन नोंदणी मालिका
- वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी ५० रुपये प्रति दिवस विलंब शुल्क आकारण्यास स्थगिती
- पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहन धोरण
- जुनी वाहने भंगारात काढण्याच्या धोरणा अंतर्गत सवलतींबाबतची अधिसूचना जारी !
- ट्राफिक पोलिसांनी वाहन टोइंग करण्याच्या कार्यपध्दती !
- मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल योजनेसाठी दिव्यांग व्यक्तींना अर्ज करण्याचे आवाहन !
- पर्यावरणपूरक वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल) मोफत ई रिक्षा वाटप लाभार्थी यादी पहा ऑनलाईन !
- पिंक ई-रिक्षा योजना; सुधारित शासन निर्णय !
- परदेशात कार चालवायची असेल तर इथेच काढा परवाना !
- रिक्षासह टॅक्सी परवानाधारकाची गैरवर्तणुकीची तक्रार मुंबईत व्हॉटसॲपद्वारे नोंदवू शकणार !
- खड्ड्यांच्या तक्रारीसाठी आता खड्डे तक्रार निवारण प्रणाली वर अशी करा तक्रार !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!
दोन हेल्मेट न दिल्याने किंवा देण्यास नकार केल्यास मालकाची तक्रार कोठे दाखल करावी?
या बद्दल माहिती पाठवा दाद.