महाराष्ट्र ग्रामपंचायतवृत्त विशेषसरकारी कामे

ग्रामपंचायत विकास आराखडा ऑनलाईन कसा पाहायचा? जाणून घ्या सविस्तर – GPDP

पंचायती राज मंत्रालयाने ग्रामपंचायत विकास आराखडा (GPDP) ही कल्पना मांडली – ग्रामपंचायतींची वार्षिक योजना जेथे पैसे खर्च करायचे तेथे ग्रामस्थ ठरवतात. राज्य सरकार “रिसोर्स लिफाफा” ने सर्व स्थानिक संस्था सूचित करते. शेवटी, प्रत्येक पंचायतीला हे माहित आहे की वेगवेगळ्या योजनांमध्ये किती पैसे आहेत आणि त्या कशा योजना आखल्या पाहिजेत. एकदा योजना तयार झाल्यानंतर ग्रामसभा ती पास करते.

पंचायत राज संस्थांना 73 व्या घटना दुरुस्तीने घटनात्मक दर्जा दिला आहे. मात्र स्थानिकस्तरावर शासन म्हणून काम करण्यासाठी आर्थिक पाठबळ कमी पडत होते. १५ व्या वित्त आयोगाने ग्रामपंचायतीला स्थानिक स्तरावर जाणवणाऱ्या समस्या त्यांच्याच पातळीवर सोडविण्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. सलग 5 वर्षे मोठ्या प्रमाणात निश्चितपणे लोकसंख्येच्या प्रमाणात मिळणाऱ्या निधीचे योग्य दिशा देवून नियोजन झाले तर ग्रामपंचायत स्तरावर स्थानिक समस्या सोडविण्यासाठी एक सुवर्णसंधी मिळणार आहे. ग्रामपंचायत विकास आराखड्याविषयीची माहिती आपण मागील लेखामध्ये घेतली आहे. आता आपण ग्रामपंचायतने तयार केलेला विकास आराखडा ऑनलाईन कसा पाहायचा? ते आपण या लेखात सविस्तर पाहूया.

ग्रामपंचायत विकास आराखडा ऑनलाईन पाहण्याची प्रोसेस:

ग्रामपंचायत विकास आराखडा ऑनलाईन पाहण्यासाठी सर्वप्रथम खालील भारत सरकारच्या ई-ग्राम स्वराज पोर्टलला भेट द्या.

https://egramswaraj.gov.in

देशभरातील पंचायती राज संस्थांमध्ये (पीआरआय) ई-गव्हर्नन्स मजबूत करण्यासाठी, पंचायती राज मंत्रालयाने (एमओपीआर) ई-ग्राम स्वराजHow to view Gram Panchayat Development Pl हे यूजर फ्रेंडली वेब-आधारित पोर्टल सुरू केले आहे. विकेंद्रित नियोजन, प्रगती अहवाल देणे आणि कार्य आधारित लेखा यामध्ये अधिक पारदर्शकता आणणे हे ईग्रामस्वराजचे उद्दीष्ट आहे.

ई-ग्राम स्वराज पोर्टल ओपन झाल्यावर वेबसाईट स्क्रोल करून खालील Reports टॅब मध्ये Planning या पर्यायावर क्लिक करा.

Planning
Planning

पुढे आपल्याला Planning Report – Dashboard पाहायला मिळेल, त्यामध्ये Planning या पर्यायावर क्लिक करून Approved Action Plan Report वर क्लिक करा.

Approved Action Plan Report
Approved Action Plan Report

आता इथे वर्ष निवडा, आपल्याला २०२१-२२ या वर्षाचा ग्रामपंचायत विकास आराखडा पाहायचा आहे, म्हणून ते वर्ष निवडून कॅप्चा कोड टाका आणि Get Report वर क्लिक करा.

Select Plan Year
Select Plan Year

Get Report वर क्लिक केल्यानंतर आपले राज्य सर्च करून त्यामध्ये Village Panchayat & equivalent या राखान्यातील निळ्या रंगातील अंकावर क्लिक करा.

 Village Panchayat & equivalent
Village Panchayat & equivalent

आता पुढे आपला जिल्हा/तालुका सर्च करून Total Approved plan count या राखान्यातील निळ्या रंगातील अंकावर क्लिक करा.

Total Approved plan count
Total Approved plan count

पुढे ग्रामपंचायत/गाव सर्च करून View Plan या पर्यायावर क्लिक करा.

View Plan
View Plan

आता मंजूर ग्रामपंचायत विकास आराखडा मध्ये तुम्ही ५ विभाग पाहू शकता, त्यामध्ये “SECTION 5 : Attached File” या पर्यायावर क्लिक करून ग्रामपंचायतने अपलोड केलेला विकास आराखड्याची फाईल दिसेल ती तुम्ही PDF फाईल मध्ये डाउनलोड करून पाहू शकता.

Attached File
Attached File

तसेच बाकी विभागामध्ये विकास आराखड्याचा सारांश, क्षेत्रीय तपशील, योजना तपशील, प्राधान्यक्रमानुसार उपक्रम तपशील असतो.

अशा प्रकारे आपण ग्रामपंचायत विकास आराखडा PDF फाईल डाउनलोड करून तुम्ही पाहू शकता कोण कोणती विकास कामे तुमच्या गावात होणार आहेत.

हेही वाचा – एका ग्रामपंचायतीला दरवर्षी किती निधी मिळतो? सरपंच गावाच्या विकासासाठी किती निधी गावात आणू शकतो? जाणून घ्या सविस्तर माहिती

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:

One thought on “ग्रामपंचायत विकास आराखडा ऑनलाईन कसा पाहायचा? जाणून घ्या सविस्तर – GPDP

  • Sunil Pandurang Darade

    Egram swaraj वर scrolling होत नाही व planning हे दिसत नाही

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.