आपले सरकार - महा-ऑनलाईनवृत्त विशेषसरकारी कामे

तलाठी कार्यालयातील विविध सुविधा आता ऑनलाईन!

भूमी अभिलेख प्रणालीमार्फत अनेक सुविधा पुरविल्या जातात. त्यातील काही सुविधा मोफत तर काही सुविधा पैसे घेऊन पुरविल्या जातात. ‘ई-हक्क’ प्रणालीवरील वारस नोंद, मृताचे नाव कमी करणे, बोजा चढविणे अथवा गहाणखत करण्यासारख्या ११ प्रकारच्या सुविधांसाठी आता केवळ (Online Talathi Seva) ऑनलाइनच कार्यवाही होणार आहे. त्यामुळे अर्ज कोणत्या टेबलवर प्रलंबित आहे, याची माहिती सहज कळणे शक्य होणार असून, ई-हक्कची १०० टक्के अंमलबजावणी होण्यासाठी ऑनलाइनद्वारे अर्ज घेण्याचे सक्तीचे करण्यात आले आहे. अनेकदा नागरिकांकडून ‘ऑफलाइन’ अर्ज दाखल केले जातात.

तलाठी कार्यालयातील विविध सुविधा आता ऑनलाईन! – Online Talathi Seva:

नागरिकांना ई-हक्क प्रणालीद्वारे ११ प्रकारच्या फेरफार नोंदीचे अर्ज करण्याची सुविधा (Online Talathi Seva) उपलब्ध करून दिली आहे. मात्र, ग्रामीण भागात अनेकांना ऑनलाइनद्वारे अर्ज करणे शक्य होत नाही किंवा त्याबाबत फारशी माहिती नसते. त्यामुळे ते लिखित स्वरूपात अर्ज तलाठ्यांकडे देतात. मात्र, अनेक दिवस त्यावर कार्यवाही न झाल्याने नागरिकाला ती सुविधा उपलब्ध होत नाही. तसेच त्या अर्जाबाबत ऑनलाइन नोंद नसल्याने वरिष्ठांना संबंधितांवर कारवाई करता येत नाही.

ई-हक्क प्रणालीद्वारे फेरफार उपलब्ध करण्याच्या (Online Talathi Seva) सोयीसुविधा उपलब्ध आहेत. मात्र, त्याची जिल्ह्यात १०० टक्के अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे नागरिकांकडून ई-हक्क प्रणालीद्वारे अर्ज दाखल करण्याचे प्रमाण कमी झाले. दुसरीकडे, महसूल विभागाच्या वतीने ई-हक्क माध्यमातून केलेले अर्ज मंजूर करण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.

या सर्व सुविधा (Online Talathi Seva) ऑनलाईन स्वरूपात सुरु केल्यामुळे अर्जदाराने केलेल्या अर्जाची स्थिती नेमकी काय आहे हे प्रत्येक अधिकाऱ्यासह संबंधित अर्जदारालाही कळू शकेल. यातून कारभारात पारदर्शकता येणार आहे.

यासाठी खालील भूमिअभिलेख विभागाच्या वेबसाईटला भेट द्या.

https://bhumiabhilekh.maharashtra.gov.in/

Online Talathi Seva Bhumiabhilekh
Online Talathi Seva Bhumiabhilekh

वेबसाईट ओपन झाल्यावर वरती तुम्हाला गाव नमुना नंबर ७/१२, ८अ, मालमत्ता पत्रक व क – प्रत पाहणे या प्रकारची माहिती येथे पाहू शकता.

विविध ऑनलाईन सुविधा – (Online Talathi Seva):

यामध्ये खालील सुविधांचा ऑनलाईन (Online Talathi Seva) लाभ घेऊ शकता.

  • ७/१२ उतारा डाउनलोड
  • ८ अ उतारा डाउनलोड
  • फेरफार प्रत डाऊनलोड
  • मालमत्ता पत्रक उतारा डाउनलोड
  • ७/१२ फेरफारासाठी अर्ज ई – हक्क
  • मिळकत पत्रिका फेरफार अर्ज
  • फेरफार स्थिती
  • अधिकार क्षेत्र जाणून घ्या
  • प्रलंबीत दिवाणी न्यायालयीन प्रकरणे
  • अभिलेख पडताळणी
  • ई-रेकॉर्डस्
  • ई-नकाशा / भू नकाशा
  • ई-मोजणी
  • ई-मोजणी – 2 New
  • ई-क्यू जे कोर्ट
  • ई- पीक पाहणी
  • आपली चावडी
  • ई-चावडी – जमीन महसूल भरणा
  • महाभूमी API सेवा

या लेखात, आम्ही तलाठी कार्यालयातील विविध ऑनलाईन (Online Talathi Seva) सुविधा विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

पुढील लेख देखील वाचा!

    1. स्वामित्व योजना म्हणजे काय? प्रॉपर्टी कार्डचे फायदे काय? जाणून घ्या सविस्तर !
    2. डिजिटल स्वाक्षरीत प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन कसे डाउनलोड करायचे? जाणून घ्या सविस्तर
    3. गाव नमुना सातबारा (७/१२) उतारा म्हणजे काय? सातबारा उताऱ्या विषयीची संपूर्ण माहिती !
    4. 1880 सालापासूनचे जुने फेरफार, सातबारा, खाते उतारे ऑनलाईन कसे पाहायचे? जाणून घ्या सविस्तर!
    5. सातबारा (7/12) वरील चुकांची दुरुस्ती कशी करावी? जाणून घ्या सविस्तर
    6. सातबारा (7/12) उताऱ्यातील चूक दुरुस्त करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?
    7. जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती
    8. सर्व्हे नंबर, भूमापन क्रमांक आणि गट नंबर याबाबत सविस्तर माहिती !
    9. जमिनीची सरकारी किंमत ऑनलाईन कशी पाहायची? जाणून घ्या सविस्तर
    10. जमीन किंवा बिगर शेती जमीन (NA Plot) खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी ? जाणून घ्या सविस्तर
    11. जमीन मोजणीसाठी अर्ज कसा करायचा? जमीन मोजणीसाठी किती शुल्क आकारले जाते? जाणून घ्या सविस्तर माहिती
    12. जमिनीचे वारस नोंद करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती
    13. तलाठी कार्यालयातील गाव नमुना १ ते २१ नोंदवही विषयीची संपूर्ण माहिती
    14. सातबारावर नाव लावून घेण्यासाठी काय केले पाहिजे? जाणून घ्या महत्वाच्या बाबी !
    15. डिजिटल स्वाक्षरीचा ८अ खाते उतारा ऑनलाईन कसा डाउनलोड करायचा? जाणून घ्या सविस्तर
    16. गावातील तलाठ्याचे सर्व जमिनीचे फेरफार आणि जमिन मोजणीचे व्यवहार पहा ऑनलाईन !
    17. ई-पीक पाहणी ॲपद्वारे खातेदार नोंदणी कशी करायची? सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा!
    18. ई-पीक पाहणी ॲपद्वारे पिकांची माहिती कशी नोंदवावी? सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा!
    19. इनाम आणि वतन जमिनी बद्दल सविस्तर माहिती !
    20. तलाठी कार्यालयातील गाव नमुना १ ते २१ नोंदवही विषयीची संपूर्ण माहिती !
    21. तलाठ्याची कर्तव्ये कोणती आहेत? तलाठ्याकडून माहिती मिळवण्यासाठी माहिती अधिकार अर्ज कसा करायचा?

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.