POCRA Fund : नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पासाठी रु.1 कोटी निधी वितरित !
हवामान बदलास अतिसंवेदनशील असलेल्या विदर्भ व मराठवाड्यातील ४२१० गावे तसेच विदर्भातील पूर्णा नदीच्या खोऱ्यातील खारपाण पट्ट्यातील ९३२ गावे अशा एकूण ५१४२ गावांमध्ये ६ वर्षे कालावधीत जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने सुमारे रु. ४००० कोटी अंदाजित खर्चाचा (POCRA Fund) नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्प राबविण्यात येत आहे. दिनांक १७ फेब्रुवारी, २०२२ च्या शासन निर्णयान्वये नाशिक जिल्हयातील मालेगाव तालुक्यातील सर्व गावांचा समावेश या प्रकल्पामध्ये करण्यास मान्यता देण्यात आली आहे,
वित्त विभागाच्या शासन परिपत्रकान्वये सन २०२४ साठी महाराष्ट्र विनियोजन (लेखानुदान) अधिनियमानुसार मंत्रालयीन प्रशासकीय विभागांचे निधी वितरण निश्चित करण्यात आलेले आहे. त्यानुसार वित्त विशेषज्ञ, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प यांनी केलेल्या मागणीनुसार शासन निर्णयान्वये आतापर्यंत रुपये २.२० कोटी निधी (POCRA Fund) वितरीत करण्यात आला आहे.
वित्त विशेषज्ञ, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प २०२४-२५ मध्ये नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प व्यवस्थापन कक्ष आणि क्षेत्रीय स्तरावरील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या माहे मे देय जून, २०२४ च्या वेतन खर्चासाठी निधीची आवश्यकता असल्याचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे. त्यानुसार सन २०२४-२५ च्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून रु.१.०० कोटी निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याबाबत शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे.
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पासाठी रु. 1 कोटी निधी वितरित करण्याबाबत शासन निर्णय खालील प्रमाणे ! POCRA Fund :
१. सन २०२४-२५ करिता प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, मुंबई यांना रु. १ कोटी (POCRA Fund) निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
२. सदर निधी प्रकल्पाच्या राज्य हिश्श्याच्या ०१ वेतन या उपलेखाशीर्षाखाली वितरीत करण्यात येत असून सदर निधी प्रकल्पाच्या राज्य हिश्श्याच्या पुढील लेखाशिर्षाखाली सन २०२४-२५ मध्ये अर्थसंकल्पीत केलेल्या तरतुदीतून खर्ची टाकण्यात यावा.
३. या शासन निर्णयाद्वारे उपलब्ध करुन देण्यात येत असलेल्या निधीचे कोषागारातून आहरण व वितरणाकरिता प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, मुंबई यांना नियंत्रक अधिकारी आणि वित्त विशेषज्ञ, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.
४. या शासन निर्णयान्वये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या निधीचा विहित पद्धतीने तात्काळ विनियोग करण्यात यावा तसेच प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, मुंबई यांनी ०१-वेतन या उद्दिष्टशीर्षाखाली खर्च झालेल्या रकमांचे उपयोगिता प्रमाणपत्र वेळोवेळी शासनास सादर करावे.
५. प्रकल्प संचालकांनी सदर प्रकल्पांतर्गत खर्ची पडणाऱ्या निधीची जागतिक बँकेकडून सत्चर प्रतिपूर्ती मिळवावी व मिळालेल्या प्रतिपूर्तीबाबत शासनास वेळोवेळी अहवाल पाठवावा.
६. प्रकल्प संचालकांनी सदर प्रकल्पांतर्गत झालेल्या कामांचा प्रगती अहवाल शासनास वेळोवेळी सादर करावा,
कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग शासन निर्णय : सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पासाठी रु. 1 कोटी निधी (POCRA Fund) वितरित करण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत विविध पोकरा अनुदान योजना – POCRA Yojana
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!