आपले सरकार - महा-ऑनलाईनवृत्त विशेषसरकारी कामे

आधार सेंटर अर्ज सुरू; आवश्यक कागदपत्रे, निकष व अर्जाचा नमुना (परभणी जिल्हा)

सद्यस्थितीत शासकीय कामासाठी, बँकेच्या कामासाठी प्रत्येक नागरीकांकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. आधार कार्डमध्ये नावाची दुरुस्ती, जन्मतारखेत बदल यासारख्या दुरुस्ती व नविन नोंदणीसाठी नागरिकांना शहराच्या ठिकाणी जावे लागत आहे.

त्यामुळे नागरीकांची गैरसोय होऊ नये व त्यांना त्यांचे जवळच्या आधार केंद्रावर आधार नोंदणी व दुरुस्ती करता यावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत खालील मंडळाचे ठिकाणी निकष पात्र असणा-या आपले सरकार सेवा केंद्रचालक यांना आधार नोंदणी संचाचे वितरण करण्यात येणार आहे.

आधार सेंटरसाठी निकष:

>

तरी वरील मंडळ व शहरी भागाकरीता आधार केंद्र वितरीत करण्यासाठी खालीलप्रमाणे निकष असतील.

1. अर्जदार यांचेकडे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात येणारे आपले सरकार सेवा केंद्र (महा ई सेवा केंद्र) असणे आवश्यक आहे.

2. अर्जदार यांचेकडे स्वतःचे किंवा ऑपेरटरचे NSEIT मार्फत देण्यात येणारे Supervisor प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

3. आपले सरकार सेवा केंद्र हे त्याच मंडळात मंजूर असणे आवश्यक आहे.

वरील निकष पुर्ण करणारे आपले सरकार सेवा केंद्रचालक यांनी दि.  १५/११/२०२१ ते २४/११/२०२१ या कालावधीत त्यांचे अर्ज जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालयास परभणी येथे सादर करावेत.

सदर कालावधीत प्राप्त अर्जाचाच विचार करण्यात येईल. अर्जाचा नमुना खालील लिंक वरून डाउनलोड करा, सदर नमुन्यात अर्ज सादर करावा.

आधार सेंटर प्रेसनोट व अर्जाचा नमुना:

आधार संच वाटप करणेबाबत प्रेसनोट – जाहीर प्रगटन व अर्जाचा नमुना पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – आधार अपडेट सेंटरसाठी असा करा ऑनलाईन नोंदणी अर्ज (CSC Aadhaar UCL Center)

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.