आपले सरकार सेवा केंद्र – महा ई सेवा केंद्र अर्ज सुरू, पहा अटी शर्ती – Aapale Sarkar Seva Kendra Parbhani District
शासनाच्या राष्ट्रीय ई गव्हर्नन्स कृती कार्यक्रमा अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात शासकीय, निमशासकीय सेवा पोहोचण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत परभणी जिल्ह्यातील 218 ग्रामपंचायतीच्या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र मंजूर करण्यात येणार आहे.
अर्ज करण्यासाठी जाहिरातीचा नमुना अर्जाचा नमुना अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे, निकष/पात्रता/अटी या जाहिरातीसोबत जोडण्यात आलेली आहे.
- जाहिरात प्रसिध्दी (वर्तमानपत्र व वेबसाईट): १५/०३/२०२२
- जाहिरातीप्रमाणे अर्ज स्विकारणे: १५/०३/२०२२ ते २५/०३/२०२२ वेळ: स. ११.०० सायं ५.०० वा. पर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून)
- प्राप्त अर्जाची छाननी: ३१/०३/२०२२
- पात्र/अपात्र यादी प्रसिध्द करणे: ३१/०३/२०२२. सायं. ०५.००
पात्र/अपात्र यादीसोबत परभणी जिल्हयाचे संकेतस्थळ https://parbhani.gov.in वर प्रसिध्द करण्यात येईल.
आपले सरकार सेवा केंद्र मंजूरीचे अटी/निकष:
1. अर्जदार यांनी एका वेळी एकाच केंद्रासाठी अर्ज करावा.
2. आपले सरकार सेवा केंद्र ज्या ग्रामपंचायतीच्या ठिकाणी मंजूर करावयाचे आहे अर्जदार हा त्याच ग्रामपंचायतीचा रहीवासी असावा.
3. अर्जदार ज्या ग्रामपंचातीचा रहीवासी आहे त्याच ग्रामपंचायतीसाठी अर्ज करावा. इतर ग्रामपंचायतीसाठी अर्ज केल्यास तो अपात्र समजण्यात येईल.
4. अर्जदार हा 10 वी (SSC) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
5. अर्जदार हा संगणक परीक्षा (MS – CIT)/ संगणक संबंधित शासन मान्य परीक्षा उत्तीर्ण असावा.
6. अर्जदार यांचे कुटुंबात यापूर्वी आपले सरकार सेवा केंद्र मंजूर नसावे.
7. अर्जदार हा शासकीय कर्मचारी कंत्राटी कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी नसावा .
अर्जदार यांनी अर्जासोबत खालील कागदपत्र जोडावीत:
1. आधार कार्डची प्रत.
2. रहिवासी प्रमाणपत्र (ग्रामपंचायत)
3. शैक्षणीक पात्रता प्रमाणपत्र.
4. संगणक परीक्षा (MS – CIT)/ संगणक संबंधित शासन मान्य परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र.
5. अट क्र. 6 व 7 नसलेबाबत शपथपत्र.
जाहिरात: परभणी जिल्हयातील ग्रामपंचायतीच्या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र मंजूर करणे बाबत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
नोंदणी फॉर्म लिंक (Link for Registration): आपले सरकार सेवा केंद्र नोंदणी अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – CSC सेंटर साठी असा करा ऑनलाईन नोंदणी अर्ज (Common Service Centres)
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!