ग्राम रोजगार सेवकांच्या तक्रारी संदर्भात शासन नियम
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत असलेल्या ग्राम रोजगार सेवकांची कर्तव्ये, जबाबदा-या व नियुक्तीच्या संदर्भात मागील लेखामध्ये मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच ग्रामरोजगार सेवकांनी नियुक्ती व त्यांना पदावरुन काढून टाकण्याबाबत अनुसरावयाच्या कार्यपध्दतबाबत स्पष्ट निर्देश खालील शासन निर्णयामध्ये नमूद केले आहेत. तथापि, महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघ महाराष्ट्र यांनी ग्राम रोजगार सेवकांच्या समस्यांचे निवारण करण्याबाबत शासनाकडे निवेदन सादर केले होते. सदर निवेदनानुसार मा.मंत्री (रोहयो) यांनी दिनांक २४ मार्च, २०१७ रोजी आयोजित केलेल्या बैठकीत झालेल्या निर्णयाच्या अनुषंगाने पुढीलप्रमाणे शासन निर्णय घेण्यात आला आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत असलेले ग्राम रोजगार सेवक यांच्या कामासंदर्भात या योजनेचे लाभार्थी, मजूर, ग्रामपंचायतीचे ग्राम सेवक, सरपंच व पदाधिकारी, जिल्हा परिषद/पंचायत समितीचे पदाधिकारी, अशासकीय संस्था, सामान्य नागरिक व या योजनेशी संबंधित इतर घटक यांच्याकडून तक्रार अर्ज प्राप्त होतात. अशी तक्रार प्राप्त झाल्यास अथवा त्यांना गैरवर्तणुकीमुळे पदावरुन काढून टाकण्याची मागणी झाल्यास विस्तार अधिकारी (पंचायत) यांनी सदर तक्रारीची चौकशी करण्याबाबत शासन निर्णय दिनांक २२ जानेवारी, २०१४ अन्वये कार्यपध्दती निर्गमित करण्यात आली आहे. मा.मंत्री (रोहयो यांचेकडे बैठकीत झालेल्या निर्णयान्वये आणि शासन निणर्य दिनांक – ०४ सप्टेंबर २०१७ नुसार आता ग्राम रोजगार सेवकांची चौकशी विस्तार अधिकारी यांचेमार्फत करण्याऐवजी संबंधित गट विकास अधिकारी यांनी चौकशी करावी.
ग्राम रोजगार सेवकांच्या तक्रारीसंदर्भात दिनांक २२ जानेवारी, २०१४ च्या शासन निर्णयामधील अ.क्र.१ ते ७ येथे नमूद केल्यानुसार विहित केलेल्या कार्यपध्दतीचा अवलंब न करता, शासन निणर्य दिनांक – ०४ सप्टेंबर २०१७ नुसार कार्यपध्दतीचा अवलंब करावा:
१) ग्राम रोजगार सेवकाना पदावरुन दूर करण्याचा निर्णय घेण्यात आल्यास अशा प्रकरणी उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे फेरविचारार्थ अर्ज करता येईल.
२) उप मुख्य कार्यकारी अधिकारी हे अशा प्रकरणाची गुणवत्ता तपासून संबंधित ग्रामपंचायतीकडे उचित कार्यवाहीची शिफारस करतील.
३) ग्राम रोजगार सेवक यांच्या कामासंदर्भात अनियमितता निदर्शनास आल्यास उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अशा अनियमिततांबाबत स्वत: हून दखल घेतील.
४) उप मुख्य कार्यकारी अधिकारी संबंधित ग्राम रोजगार सेवकांच्या चौकशीचे निर्देश गट विकास अधिकारी (पंचायत) यांना देतील.
शासन निर्णय PDF फाईल डाउनलोड करा:
- ग्राम रोजगार सेवकांच्या तक्रारीसंदर्भात शासन निणर्य – ०४ सप्टेंबर २०१७
- ग्राम रोजगार सेवकांच्या तक्रारीसंदर्भात शासन निणर्य – २२ जानेवारी २०१४
हेही वाचा – ग्राम रोजगार सेवकांची कर्तव्य व जबाबदाऱ्या आणि त्यांच्या नियुक्तीच्या संदर्भात मार्गदर्शक सूचना
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!
बचत गट माहिती संघ व पद व त्यांच्या जबाबदाऱ्या यांच्या बद्दल माहिती पाहिजे .