महाराष्ट्र ग्रामपंचायतवृत्त विशेषसरकारी कामे

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या व कर्तव्य; कर्मचाऱ्यांची संपूर्ण माहिती आणि पेमेंट स्टेटस ऑनलाईन कसे पाहायचे? जाणून घ्या सविस्तर माहिती

ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे. यामध्ये ग्रामपंचायत मधील शिपाई, दिवाबत्ती, पाणीपुरवठा कर्मचारी, लिपिक, सफाई कर्मचारी यांचा समावेश होतो. आता हिथे गावच्या लोकसंख्येनुसार किती कर्मचारी नेमायचे, त्यांना कोणत्या स्वरूपाचे काम द्यायचे हे निर्णय गावाने घ्यायचा असतो. मागील लेखामध्ये आपण ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची नेमणूक करताना घ्यावयाची दक्षता (परिपत्रक क्र.व्हीपीएम २६८९/२२९७/२१ नुसार) विषयीची सविस्तर माहिती पाहिले आहे. या लेखामध्ये आपण ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या व कर्तव्य; ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची संपूर्ण माहिती आणि आणि पेमेंट स्टेटस ऑनलाईन कसे पाहायचे? या विषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या व कर्तव्य:

 • आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली व मानांकनाप्रमाणे ग्रामपंचायतचे कामकाज करणे.
 • ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजनेचे संपूर्ण कामे करणे.
 • पाणीपुरवठा योजनेचे व सार्वजनिक विहीर/विंधन विहिरीचे नियमित जलशुद्धीकरण करणे.
 • पाणीपुरवठा योजनेमध्ये वारंवार होणारे बिघाड दुरुस्ती करणे.
 • नियमितपणे पाणी नमुने तपासून त्याचा अहवाल जतन करून ठेवणे.
 • ग्रामपंचायतीने ठरविलेल्या वेळापत्रकाप्रमाणे गावात पाणीपुरवठा करणे.
 • आदेशानुसार नवीन नळ कनेक्शन जोडणे अथवा नळ कनेक्शन खंडित करणे.
 • ब्लिचिंग पावडर साठा नोंदवही व पाणीपुरवठा नोंदवही अद्यावत ठेवणे.
 • जलशुद्धीकरण रजिष्टर अद्यावत ठेवणे.
 • पाणीपुरवठा योजनेची टाकी वेळापत्रकानुसार नियमित साफ करणे.
 • शासनाकडून वेळोवेळी मिळणारे पाणी पुरवठा प्रशिक्षणास हजर राहणे.
 • गावातील पथदिवे दररोज चालू/ बंद करणे.
 • पथदिव्यांमध्ये वारंवार होणारे बिघाड दुरुस्ती करणे.
 • कराच्या वसुलीसाठी वसुली कारकून यांना सहकार्य करणे.
 • दरवर्षी तयार करण्यात आलेली मागणी बिले व मागणी लेख संबधित खातेधारकांना बजावणे.
 • वेळोवेळी ग्रामपंचायतीचे सरपंच/ सचिव/लिपिक यांनी दिलेल्या आदेशांचे पालन करणे.
 • कार्यालयीन वेळेत कार्यालयातील संपूर्ण कामकाज करणे.
 • ग्रामपंचायतीतील सर्व नमुने व इतर अभिलेखे अद्यावत ठेवणे.
 • ग्रा.पं. आवक व जावक विभागाचे संपूर्ण कामकाज करणे.
 • नागरिकांनी मागणी केलेले दाखले व इतर नकला/परवानग्या तयार करून सरपंच/सचिवांच्या स्वाक्षरीस्तव ठेवणे.
 • केंद्रचालकाच्या सहाय्याने ग्रा.पं. चे सर्व अभिलेखे विविध आज्ञावलीमध्ये अद्यावत ठेवणे.
 • ग्रामपंचायतीचे विविध मासिक/ वार्षिक प्रगती अहवाल बनविणे.
 • ग्रामपंचायतीची सर्व प्रकारची कर वसुली करून संबधिताना पावती अदा करणे, सेवा शुल्क स्वीकारून नमुना नं. ७ ची पावती देणे.
 • वसूल झालेल्या सर्व रकमा नियमितपणे बँकेत जमा करून त्याचा दैनिक अहवाल सरपंच/ सचिवांना देणे.
 • दरवर्षी माहे एप्रिल मध्ये ग्रामपंचायतीची कर मागणी नोंदवही (नमुना नं. ०९) तयार करणे.
 • दरवर्षी माहे मे-जून मध्ये प्रत्येक खातेधारकांना कराची बिले व मागणीलेख तयार करून वजावणे.
 • प्रत्येक मासिक सभेचीग्रामसभेची नोटीस काढून सभेचे इतिवृत्त नोंदवही लिहिणे.
 • इतर ग्रामपंचायत कर्मचारी व मजूर यांचेवर नियंत्रण ठेऊन आवश्यकतेप्रमाणे कामे सुचविणे.
 • जन्म, मृत्यूविवाह नोंदणी अर्ज स्वीकारून निबंधकाच्या परवानगीने अभिलेख्यात त्याची नोंद घेणे.
 • ग्रामपंचायतीने लावलेले इतर तात्पुरते मजूर जसे सफाई कामगार/तात्पुरता पाणीपुरवठा नोकर/पाणीपुरवठा योजना दुरुस्ती वरील मजूर यांच्याकडून कामे करून घेणे.
 • महाराष्ट्र लोकसेवा अध्यादेश अधिनियम २०१५ रजिष्टर अद्यावत ठेवणे.
 • आधुनिक तंत्रज्ञानाचा/ संगणकाचा वापर करून ग्रामस्थांना डिजिटल सेवा देण्याचा प्रयत्न करणे.
 • वारंवार शासनाच्या आदेशानुसार होणारे विविध सर्वेक्षणात सचिवांना सहकार्य करणे.
 • ग्रा.पं. कर्मचाऱ्यांचे सेवापुस्तक व भविष्य निर्वाह निधी च्या सर्व नोंदी अद्यावत ठेवणे.
 • वेळोवेळी ग्रामपंचायतीचे सरपंच/सचिव यांनी दिलेल्या आदेशांचे पालन करणे.
 • नियमितपणे ग्रा.पं. कार्यालय व कार्यालय परिसराची स्वच्छता करणे.
 • ग्रामपंचायत कार्यालयात येणाऱ्या वृद्ध नागरिकांना/अपंग व्यक्तींना सहकार्य करणे.
 • नागरिकांना अर्ज लिहिण्यासाठी सहकार्य करणे अर्जदार निरक्षर असल्यास अर्ज लिहून देणे.
 • गुरांचा कोंडवाड्यात येणाऱ्या सर्व जनावरांची चारा-पाण्याची योग्य व्यवस्था करणे/निगा राखणे.
 • ग्रामपंचायत वसुली कारकुनास वसुली दरम्यान सहकार्य करणे.
 • ग्रामपंचायत कार्यालयात धुम्रपानास प्रतिबंध घालणे.
 • मासिक सभा/ग्रामसभेच्या नोटीसा संबधितांना बजावणे.
 • ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे पाणीपुरवठा योजनेचे कामे करणे.
 • जलसुरक्षक म्हणून सर्व कर्तव्ये व जबाबदारी पार पाडणे.

ग्रामपंचायत कर्मचारी यांची माहिती आणि कर्मचारी पेमेंट स्टेटस ऑनलाईन कसे पाहायचे?

ग्रामपंचायत कर्मचारी यांची माहिती ऑनलाईन पाहण्यासाठी खालील अधिकृत ई-गव्हर्नन्स पोर्टल भेट द्या आणि ग्रामसेवकाचे युजरनेम पासवर्ड घेऊन लॉगिन करा.

https://mh.gov2egov.com/NewTheme/login.aspx

User Login
User Login

ग्रामपंचायत कर्मचारी तपशील (GP Employee Details):

वरील पोर्टल मध्ये लॉगिन केल्यानंतर मुख्य मेनूमध्ये Dashboard पर्यायावर क्लिक करून GP Employee Details Dashboard या पर्यायावर क्लिक करा.

आता पुढे तुमच्या ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती दिसेल (उदा. पाणी पुरवठा कर्मचारी, शिपाई, इ.). यामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचे नाव, पदनाम, कर्मचारी प्रकार, कर्मचारी कधीपासून कार्यरत आहे – कधी निवृत्त होणार याची तारीख, मोबाईल नंबर, इमेल आयडी, कर्मचारी बँकेचे नाव आणि खाते क्रमांक, कर्मचाऱ्याचा GPF खाते क्रमांक, इ. माहिती आपण पाहू शकतो.

हि माहिती आपण एक्सेल फाईल मध्ये एक्स्पोर्ट करू शकतो, त्यासाठी Click to Export वर क्लिक करा आणि एक्सेल फाईल मध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची माहिती सेव्ह करा.

ग्रामपंचायत कर्मचारी पेमेंट स्टेटस (GP Employee Payment Status):

ई-गव्हर्नन्स पोर्टल मध्ये मुख्य मेनूमध्ये Dashboard पर्यायावर क्लिक करून GP Employee Payment Status Dashboard या पर्यायावर क्लिक करा.

आता पुढे पेमेंट स्टेटस डॅशबोर्ड ओपन होईल त्यामध्ये ज्या वर्षाचे/महिन्याचे तुम्हाला पेमेंट स्टेटस पाहायचे असेल ते वर्ष आणि महिना निवडा.

आता पुढे तुमच्या ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती दिसेल, तसेच पुढे No. of Working Days मध्ये कर्मचाऱ्याचे कामाच्या दिवसांची संख्या, आणि Salary Details मध्ये राज्य शासन आणि ग्रामपंचायतचा पगारा मध्ये किती भाग आहे आणि किती जमा झाला तो पाहायला मिळेल. तसेच GPF म्हणजेच सामान्य भविष्य निधी किती जमा झाला आहे तो हि तुम्ही पाहू शकता.

हि माहिती आपण एक्सेल फाईल मध्ये एक्स्पोर्ट करू शकतो, त्यासाठी Click to Export वर क्लिक करा आणि एक्सेल फाईल मध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पेमेंट स्टेटसची माहिती सेव्ह करा.

हेही वाचा – ग्राम रोजगार सेवकांची कर्तव्य व जबाबदाऱ्या आणि त्यांच्या नियुक्तीच्या संदर्भात मार्गदर्शक सूचना

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.