वृत्त विशेष

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून “जलशक्ती अभियान योजना”

भारत सरकारने वर्ष 2019 मध्ये ‘ जलशक्ती मंत्रालय -‘निर्माण केल्यानंतर एक महिन्याच्या आत लोकसहभागातून संपूर्ण देशात जलद गतीने जलसंधारण व्हावे या उद्देशाने धडक जलसंधारण मोहीम राबविण्यात आली आहे त्याच प्रमाणे वर्ष 2020 मध्ये ही अभियाना राबविण्याबाबत नियोजन करण्यात आले मात्र covid-19 महामारी च्या पार्श्वभूमीवर देशभरात टाळेबांदी झाली त्यामुळे सदर मोहीम राबविता आली नाही आता या मोहिमेचे तिसरे वर्ष सुरू आहे.

यावर्षी हे अभियान दि. 21 डिसेंबर 2020 पासून सुरु सुरू झाले असून दि. 30 जून 2021 पर्यत चालणार आहे .या मोहिमेअंतर्गत खालील बाबी करणे अपेक्षित आहे.

1.जलसंधारण आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग

2.पारंपरिक तसेच जलस्रोतांचे नूतनीकरण

3. पाण्याचा पुनर्वापर आणि स्त्रोतांचे पुनर्भरण

4. पाणलोट विकास

5 .गहन वृक्षारोपण

उपरोक्त सर्व परिस्थिती पाहता व केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यात जलशक्ती अभियान धडक मोहिमेद्वारे राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

जलशक्ती अभियान योजना:

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत जलशक्ती अभियान राबविण्यात करीत खालील कामे कालबद्ध पद्धतीने करण्यात येणार आहेत.

1. राज्यातील ज्या भागांमध्ये अजूनही शोषखड्डे तयार करण्यात आलेले नाहीत अशा उर्वरित सर्व भागात, पुढील तीन महिन्यात 100% गावांत, 100% घरासाठी शोषखड्डे तयार करण्यात येणार आहेत.

2. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत जनशक्ती अभियानाच्या माध्यमातून राज्यात ” सर्व शासकीय कार्यालये तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात येणार आहे.

याशिवाय जलशक्ती अभियानाच्या माध्यमातून खालील कामे ही धडक पद्धतीने राबविण्यात येणार आहेत.

1. मनरेगा अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या 100% विहिरी या कालावधीत पूर्ण करण्यात याव्यात.

2. तालुक्यातील प्रत्येक TPO मागे किमान दोन गावे आणि प्रत्येक कृषी सहाय्यक मागे किमान एका गावात शेततळ्याच्या माध्यमातून प्रत्येक शेतीला पाणी ही संकल्पना राबवून अधिकाधिक शेतकऱ्यांच्या शेतात शेततळी खोदण्यात यावे. यासाठी आवश्यकतेनुसार विविध आकारमानांचे शेततळयांना मान्यता देण्यात यावी.

3. या अभियानाअंतर्गत विविध जल स्त्रोतातून अधिकाधिक गाळ काढण्याची मोहीम हाती घेण्यात यावी.

4. वरील सर्व बाबी राबवून आपल्या जिल्हा /तालुक्यातील 100% ग्रामरोजगार सेवकांना या तीन महिन्याचे सरासरी मानधन किमान रुपये 5000/- मिळेल एवढे मनुष्यदिवस निर्माण होतील याबेताचे कार्य करण्यास ग्रामरोजगार सेवकांना प्रवृत्त करावे.

या अभियानाच्या अंतर्गत अनुषंगिक बाबी खालीलप्रमाणे राहतील :

1. सदर अभियानाच्या अंमलबजावणी व सनियंत्रण यासाठी स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाच्या शासन निर्णयाद्वारे तयार करण्यात आलेल्या जिल्हा ,तालुका तसेच गाव पातळीवरील समित्या कार्य करतील.

2. तथापि मनरेगा अंतर्गत तयार होणाऱ्या मत्तांची नोंद प्रचलित पद्धतीने जिओ -टॅगिंग सह करण्यात यावी.

3.राज्यातील प्रत्येक गावांमध्ये किती शोषखड्डे, रूफ रेन वॉटर हार्वेस्टिंग संरचना आणि शेततळे निर्माण होत आहेत त्याच्या सनियंत्रणाकरता मनरेगा आयुक्त ,नागपूर यांनी एक वेगळे ऍप तयार करावे.

4. प्रत्येक तालुक्यातील किती टक्के गावांमध्ये ग्रामरोजगार सेवकांना एप्रिल ते जून तिमाहित रु.5000/- दर महा मानधन मिळेल तेवढे काम करण्याचे नियोजन झाले आहेत याचा गोषवारा दाखवणारा डॅशबोर्ड तयार करण्यात यावा.

5.100% घरांमध्ये शोषखड्डे आणि ग्रुप रेन वॉटर हार्वेस्टिंग रचना करावयाचे असल्याने 100% कुटुंबाना जॉब कार्ड द्यावे लागेल. त्यासाठी सुद्धा मोहीम राबविण्यात यावी.( यापूर्वीच पुणे जिल्ह्यामध्ये याप्रमाणे मोठ्या प्रमाणावर कार्यवाही सुरू झाली आहे.)

6.तालुक्यातील 90% पेक्षा अधिक गावांमध्ये ग्रामरोजगार सेवकांना एप्रिल-जून 2021 तिमाहीत रक्कम रु.5000/- दरमहा किंवा त्याहून जास्त मानधन मिळवून देण्यात यश असल्यास त्या तालुक्यातील तालुकास्तरीय यंत्रणेला राज्य नियामक मंडळाच्या मान्यतेने प्रोत्साहनात्मक राज्य अतिरिक्त मानधन देण्यात येईल.

7.त्याचप्रमाणे किमान एका गावातील 90% पेक्षा अधिक खातेधारकांना शेततळे देण्यास यशस्वी झालेल्या कृषी सहायकांच्या आणि TPO याना प्रोत्साहन पर अतिरिक्त भत्ता नियामक मंडळाच्या मान्यतेने देण्यात येईल.

8. शेतकऱ्यांनी शेततळ्याला अस्तरीकरण केल्यास ते पाणी साठवण्यासाठी उपयोगी पडेल व त्याचा वापर संरक्षित सिंचन म्हणून केला जातो. मनरेगाअंतर्गत करण्यात येणाऱ्या शेततळ्यांना ६०:४० अकुशल:कुशल च्या प्रमाणात होत असल्यास अस्तरीकरण अनुज्ञेय करण्यात यावे व याबाबतच्या गाईडलाईन्स कृषी विभागाने ठरवून दिल्याप्रमाणे वापरण्यात याव्यात.

9. बरेच शेतकरी आपल्या शेतात शेततळे घेण्यास इच्छुक नसतात कारण त्यांना वाटते की जी जमीन शेततळ्याने व्यापली जाईल. मात्र यामुळे अधिक पीक पिकूवून अधिक उत्पन्न मिळविता येते. तसेच शेततळे बांधून त्याच्या पाण्याचे किफायतशीर वापर (ठिबक/ तुषार सिंचन इत्यादी) करून फळबाग लागवड तसेच मत्स्यपालन करून खूप अधिक उत्पन्न मिळणारे शेतकरी आपल्या राज्यात आहेत. त्याचप्रमाणे शेततळ्याच्या माध्यमातून 100% लखपती झालेली मौजे अजनाळे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर, मौजे कडवंची तालुका व जिल्हा जालना अशी गावे माहितीतली आहेत. या गावांचे व्हिडिओचा अभ्यास युट्यूब मधून पाहून आपण स्वतः प्रेरित होऊन शेतकऱ्यांना सुद्धा प्रेरित करावे.

10.किफायतशीर पाण्याचा वापर करून डाळवर्गीय तेलवर्गीय पिके घेऊन लखपती झालेल्या शेतकऱ्यांची माहिती पुढील काही दिवसात प्रसारित करण्यात येईल.

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.