वृत्त विशेषसरकारी कामे

कुलमुखत्यारपत्र म्हणजे काय? कुलमुखत्यार पत्राची कायदेशीर नोंदणी करणे का आवश्यक आहे?

आज आपण या लेखामध्ये कुलमुखत्यारपत्र दस्ताबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. कुलमुखत्यार म्हणजे काय ते कसे तयार करायचे, त्याचे प्रकार किती, कुलमुखत्यारपत्र तयार करताना मुख्यतः कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, त्याचे फायदे व नुकसान,कुलमुखत्यार रद्द कसे करायचे, कुलमुखत्यार पत्राची कायदेशीर नोंदणी करणे का आवश्यक आहे, कुलमुखत्यारपत्र करताना स्टॅम्प ड्युटी व रजिस्ट्रेशन चार्जेस कसे व किती लागतात, तसेच मुद्रांक शुल्कामध्ये बचत कशी करावी या सर्वांची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

कुलमुखत्यारपत्र म्हणजे काय? (Power of Attorney):

कुलमुखत्यारपत्र म्हणजे एक प्रकारचा सरकारी कामांसाठी केलेला दस्त अशा दस्तानामार्फत एखाद्या व्यक्ती त्याचे अधिकार दुसऱ्या व्यक्तीला देऊ शकतो अशा दस्ताला कुलमुखत्यारपत्र असे म्हणतात कुलमुखत्यारपत्र याला इंग्लिश मध्ये पावर ऑफ अटॉर्नी असे म्हणतात.

कुलमुखत्यारपत्र कायदा(Power of Attorney Act):

कुलमुखत्यारपत्र विशेषतः प्रॉपर्टी खरेदी विक्री, भाडेकरार व इतर अनेक वेगवेगळ्या शहरांमध्ये कुलमुखत्यारपत्राचा उपयोग केला जातो. हा कायदा १९८२ साली अस्तित्वात आला. या कायद्यामध्ये एकूण पाच कलमांचा समावेश केलेला आहे.

कुलमुखत्यार पत्राची कायदेशीर नोंदणी करणे आवश्यक:

पूर्वी कुलमुखत्यारपत्र किंवा इतर वेगळ्या करारांची नोंदणी करण्यास लोक टाळाटाळ करायचे पण कायद्यानुसार इथून पुढे सगळे महत्वाचे करार नोंदणीकृत करणे अनिवार्य झाले आहे. जर कुलमुखत्यारपत्र नोंदणीकृत केलेले नसेल तर त्याला कायदेशीर मान्यता नसते त्यामुळे कुलमुखत्यार पत्राची कायदेशीर नोंदणी करणे आवश्यक आहे.

मुद्रांक शुल्कामध्ये बचत कशी करावी:

जर आपण आपल्या नात्यातील म्हणजेच रक्ताच्या नात्यातील व्यक्तीस कुलमुखत्यारपत्र दिले तर कुलमुखत्यारपत्र तयार करण्यासाठी मुद्रांकशुल्क कमी लागते तसेच इतर व्यक्तीला कुलमुखत्यारपत्र आपण दिले तर त्यासाठी जास्त मुद्रांकशुल्क लागते.

मालमत्ता खरेदी/विक्रीसाठी लागणारे मुद्रांकशुल्क:

आपण जेव्हा मालमतेची खरेदी/विक्री तसेच डेव्हलपमेंट एग्रीमेंट तयार करतो तेव्हाच कुलमुखत्यारपत्र तयार केले असेल तर त्याला सुद्धा मुद्रांकशुल्क कमी आकारले जाते. त्यामुळे कोणत्याही मालमत्तेचा करार करताना आपल्याला मुद्रांकशुल्क खर्च कमी लागतो व खर्चात बचत होते.

कुलमुखत्यार पत्राचे अधिकार किंवा स्वरूप:

कुलमुखत्यारपत्र हे मुख्यतः दोन प्रकारचे असते त्यामध्ये मर्यादित अधिकार किंवा अमर्यादित अधिकार असे प्रकार असतात, म्हणजेच कुलमुखत्यार व्यक्तीस मर्यादित अधिकारच द्यायचे असल्यास मर्यादित कुलमुखत्यार अधिकार पत्राचा वापर केला जातो. तसेच जर सर्व अधिकार द्यायचे असल्यास अमर्यादित कुलमुखत्यार अधिकार पत्र तयार केले जाते.

कुलमुखत्यारपत्र देताना घ्यायची काळजी:

कुलमुखत्यारपत्र तयार करताना कुलमुखत्यारपत्र जी व्यक्ती देते त्या व्यक्तीच्या सुरक्षेचा विचार करणे गरजेचे आहे. जर त्या व्यक्तीचा सुरक्षेचा विचार केला तर करारावर सही करण्याचे अधिकार न देणे हे सुरक्षेच्या दृष्टीने फायदेशीर ठरते.कारण कोणत्याही करारावर आपण स्वतः केलेल्या कराराचा नोंदणीचे मर्यादित अधिकार कुलमुखत्यार व्यक्तीस दिल्यास आपल्याला सुरक्षा मिळते व कुलमुखत्यारपत्र देणाऱ्या व्यक्तीला नोंदणीला जाण्याची आवश्यकता नसते.

कुलमुखत्यार पत्राचे प्रकार:

साधारणपणे तीन प्रकारचे कुलमुखत्यारपत्र असतात.यामध्ये जनरल पॉवर ऑफ एटॉर्नी, स्पेसिफिक पावर ऑफ अटॉर्नी, व इर्वोकॅबल पॉवर ऑफ अटॉर्नी या सर्वांची सविस्स्तर माहिती आपण येथे फ़ार आहोत.

1.जनरल पॉवर ऑफ एटॉर्नी(General Power of Attorney):

या प्रकारामध्ये एखाद्या व्यक्तीच्या वतीने अनेक कामे करायची परवानगी त्याला दिलेली असते यामध्ये सरकारी कामांसाठी अर्ज करणे, कागदपत्र परत घेणे,पैशांचे व्यवहार करणे,पैशांच्या रिसीट घेणे व पावत्या देणे अशा अनेक कामांसाठी पॉवर ऑफ एटॉर्नी दिली जाते. अशा पॉवर ऑफ एटॉर्नी मध्ये ज्या व्यक्तीला तुम्ही पॉवर ऑफ ऍटर्नी दिली आहे त्याला कोणाकडूनही पैसे घ्यायचे अधिकार नसतात हे काम विनामोबदला असते. हे पत्र बनवताना पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटी आकारली जाते.

२.स्पेसिफिक पावर ऑफ अटॉर्नी:(Specific Power of Attorney):

या प्रकारामध्ये एखाद्या ठराविक कामाकरिता कुलमुखत्यारपत्र दिले जाते जसे कि एखादा माणूस बाहेरगावी आहे व त्याला एखाद्या फ्लॅटचे पझेशन घ्यायचे आहे किंवा द्यायचे आहे अशा वेळी सही करण्याचा अधिकार देणे किंवा ज्या बिल्डर बरोबर खरेदी खत करायचे आहे त्यावर त्या व्यक्तीच्या वतीने सह्या घेणे,किंवा जो व्यक्ती बाहेरगावी आहे त्याची जर मूळ गावी मालमत्ता असेल व ती भाड्याने द्यायची आहे त्यासाठी त्या व्यक्तीच्या वतीने रेंट एग्रीमेंट करण्याचे अधिकाऱ यांमध्ये दिले जातात. हे कुलमुखत्यारपत्र बनवण्यासाठी पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटी आकारली जाते.

३.इर्वोकॅबल पॉवर ऑफ अटॉर्नी:(Irrevocable Power of Attorney):

हा प्रकार म्हणजे कधीही रद्द न होणारे कुलमुखत्यारपत्र. हे कुलमुखत्यारपत्र प्रॉपर्टीशी संबंधित असते व कधीही रद्द न होणारे असते. हे तेव्हाच शक्य असते जेव्हा प्रॉपर्टीचे अधिकार एखाद्या व्यक्तिला विकलेले असते याच केसमध्ये कधीही रद्द न होणारे कुलमुखत्यारपत्र करता येते. जर तुम्हाला प्रॉपर्टीची संपूर्ण रक्कम अथवा मोबदला मिळाला आहे पण तुम्हाला अनेक जागी सह्या करण्यासाठी जाता येत नसेल अशा वेळी तुम्ही कधीही रद्द न होणारे कुलमुखत्यारपत्र देऊ शकता.

पण कधीकधी बिल्डर लोकांनी पूर्ण पैसे मालकाला दिलेले नसतात तरीही कधीही रद्द न होणारे कुलमुखत्यारपत्र करून घेतले जाते अशावेळी कुलमुखत्यारपत्र करता येत नाही असे जर पत्र करून घेतले असेल तर ते कुलमुखत्यारपत्र रद्द करता येऊ शकते.जर कुलमुखत्यारपत्र देणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास अशावेळी ते कुलमुखत्यारपत्र संपुष्टात येते. पण जर तुम्ही पूर्ण मोबदला घेऊन कुलमुखत्यारपत्र दिले असेल तर तर ते मृत्युपश्चातहि इफेक्टिव राहते. यासाठी रजिस्ट्रेशन चार्जेस जमिनीच्या किमतीच्या 6% स्टॅम्प ड्युटी व एक टक्का रजिस्ट्रेशन चार्जेस आकारले जातात.

कुलमुखत्यारपत्र रद्द करण्याची पद्धत:

कुलमुखत्यारपत्र आपल्याला रद्दही करता येते. जर रद्द करायचे असल्यास त्याबाबत कुलमुखत्यार व्यक्तीला लेखी अर्जाद्वारे कळवणे व कुलमुखत्यार पत्राची मूळ प्रत परत मिळवणे अत्यंत आवश्यक असते, किंवा कुलमुखत्यारपत्र रद्द झाल्याची नोटीस आपण वर्तमानपत्रातही देऊ शकतो. तसेच कुलमुखत्यारपत्र जर रजिस्टर नोंदणीकृत असेल तर इतर रद्द पत्राद्वारे नोंदणीकृत कुलमुखत्यार पत्राची नोंदणी रद्द करणे हे आवश्यक असते.

कुलमुखत्यारपत्र लिहून देणाऱ्याच्या मृत्यूनंतर हे पत्र वैध राहते की रद्द होते?:

कुलमुखत्यारपत्र लिहून देणाऱ्या मूळ मालकाचा जर मृत्यू झाला तर त्याने करून दिलेल्या कुलमुखत्यार पत्राला काहीच अर्थ उरत नाही, पण कधीकधी जिथे मालमत्तेचा मोबदला घेतलेला आहे, किंवा खरेदीखत लिहून दिलेले आहे तर अशा परिस्थितीमध्ये ते कुलमुखत्यारपत्र त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर सुद्धा वैध राहते.

भारतीय दूतावासातद्वारे कुलमुखत्यारपत्र बनवणे:

सध्याच्या काळात लोक शिक्षणासाठी किंवा नोकरीनिमित्त परदेशात स्थायिक असतात.व त्यांची सर्व मालमत्ता मूळ गावी असते, व या मालमतेची कामे करण्यासाठी त्यांना वेळोवेळी नेहमी मूळ गावी येणे शक्य नसते अशा वेळी भारतात वास्तव्यास असलेल्या जवळच्या व खात्रीलायक व्यक्तीला कुलमुखत्यारपत्र देता येते व हे कुलमुखत्यारपत्र भारतीय दूतावासात द्वारे बनवून पाठवता येते.

जर परदेशात असलेल्या व्यक्तीस जर भारतामधील व्यक्तीस कुलमुखत्यार नेमायचे असल्यास तसे कुलमुखत्यारपत्र त्या देशातील दूतवासाद्वारे व सक्षम अधिकाऱ्यांसमोर सही करून आणि त्यावर त्या दूतावासाची परवानगी घेऊन असे कुलमुखत्यारपत्र किंवा त्याची प्रत कुलमुखत्यार नेमलेल्या व्यक्तीकडे पाठवता येते अशाप्रकारे दूतावासाने प्रमाणित केलेले कुलमुखत्यारपत्र किंवा पावर ऑफ अटॉर्नी सर्व कायदेशीर बाबी करता ग्राह्य धरण्यात येते.

कुलमुखत्यार पत्राद्वारे झालेले फसवणुकीचा प्रकार:

उदाहरण : समजा एका शेतकऱ्याने म्हणजेच सुरेश ने जमिनीवर कर्ज काढण्याचे ठरविले व कर्ज प्रकरण मंजूर करताना अनेक वेळा त्याला तालुक्यातील बँकेत हेलपाटे मारायला लागतात अशा वेळी तालुक्याच्या जवळ जाणारा त्याचा नातेवाईक रमेश त्याला म्हणाला तुम्ही मला तुमचे कुलमुखत्यारपत्र लिहून द्या मग तुम्हाला सारखे तालुक्याला यायचा त्रास होणार नाही. मग सुरेश ने विश्वास ठेवून रमेश ला कुलमुखत्यारपत्र लिहून दिले.पण रमेश ला लिहिता वाचता येत नसल्याने नातेवाईकाने जमीन खरेदी विक्रीचे अधिकार सुद्धा स्वखुशीने कुलमुखत्यारपत्र मध्ये लिहून टाकले. सुरेशचे कर्ज मंजूर होऊन ते नील ही झाले. परंतु काही वर्षांनी गावातील एका माणसाने सुरेशला विचारले दोन एकर बागायत जमीन तू कशासाठी विकली? त्यावर आश्चर्यचकित होऊन सुरेश म्हणाला मला काय गरज शेती विकायची?  नंतर चौकशी केल्यावर सुरेशला समजले कि त्याच्या नातेवाईकांनी पत्राच्या आधारे परस्पर पैसे घेऊन जमीन दुसऱ्याला विकून सुद्धा टाकली होती. सुरेशला आता मात्र खूप पश्चाताप झाला कारण त्याच्या नातेवाईकांनी इथे त्याची फसवणूक केली होती. त्यामुळे कोणत्याही प्रस्तावावर सही करण्यापूर्वी त्याचा अर्थ काय होतो हे तपासले पाहिजे. कुलमुखत्यारपत्र सारखा महत्त्वाचा दस्तऐवज कोणत्याही व्यक्तीच्या नावे करताना अतिशय दक्षता घ्यायला हवी. हा खूप महत्वाचा दस्त आहे.

हेही वाचा – शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या नोंदणीबाबत सूचना (महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मधील कलम ८५ नुसार)

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

2 thoughts on “कुलमुखत्यारपत्र म्हणजे काय? कुलमुखत्यार पत्राची कायदेशीर नोंदणी करणे का आवश्यक आहे?

  • Onkar Belage

    Kulmuktyar ptra nondanikrut karane bandankarak ahe….g r asel tar pathava…plz

    Reply
  • संजय फाटक

    आमची 2 एकर जमीन होती त्यावर एकानी वडीलांची फसवुन कुलमुखत्यापत्र (नोटराईज )बनवुन त्यावर सह्या घेतल्या. व नंतर दुसर्या नावावर खरेदी खद करुन घेतले , कोनताही मोबदला दिला नाही तर ते कुलमुखत्यापत्र आपल्याला रद्द करता येईल का ?

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.