आपले सरकार - महा-ऑनलाईनमहाराष्ट्र शासन निर्णय - GRमहिला व बाल विकास विभागवृत्त विशेषसरकारी योजना

लाडकी बहीण योजनेचे अर्ज करण्यास मुदत वाढ; शासन निर्णय जारी !

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना या योजनेंतर्गत नोंदणी (Ladki Bahin Yojana Arj Karnyas Mudat Vad) सुरु ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे. राज्यभरातून लाखो महिलांना माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे. मात्र अद्यापही योजनेसाठी अर्ज न भरलेल्या लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना महिना दीड हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेसाठी राज्यातील लाखो महिलांनी अर्ज दाखल केले आहेत. असे असलेतरी अद्यापही काही लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळालेला नाहीये.

या योजनेपासून अद्यापही वंचित असलेल्या महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची अखेरची तारीख ३१ जुलैपर्यंत होती, मात्र राज्य सरकारच्या या लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत (Ladki Bahin Yojana Arj Karnyas Mudat Vad) आता एक महिना वाढवली आहे.

‘लाडकी बहीण योजने’साठी अर्ज करण्यास मुदतवाढ – Ladki Bahin Yojana Arj Karnyas Mudat Vad:

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. शासन निर्णय दि. ०३.०७.२०२४ मधील परिच्छेद (ड) मध्ये सदर योजनेत आता दि. ३१.०८.२०२४ पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच दि. ३१.०८.२०२४ पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दि. ०१.०७.२०२४ पासुन दरमहा रु. १५००/- आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.

या माहिमेंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाहीसंदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना दि. ३१.०८.२०२४ नंतर नोंदणी करण्यास मुभा (Ladki Bahin Yojana Arj Karnyas Mudat Vad) देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर, २०२४ मध्ये या योजनेंतर्गत नोंदणी सुरु ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे. तथापि, या योजनेंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाहीसंदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील.”

अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३१ जुलै २०२४  ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत मुदत वाढ.

योजनेसाठी पात्रता:
  • महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक.

  • विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या, निराधार महिला.

  • वयाची किमान २१ वर्ष पूर्ण व कमाल ६० वर्ष मर्यादा.

  • अर्ज करणाऱ्या महिलांचे बँक खाते असणे आवश्‍यक.

  • अर्जदार महिलेच्या कुटुंबांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजारांपेक्षा जास्त नसावे.

  • अन्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दीड हजार रुपयांपेक्षा जास्त लाभ घेतला नसेल.

  • ट्रॅक्टर वगळून चारचाकी वाहन नावावर नसेल, अशा महिला.

आवश्यक कागदपत्रे:
  • ऑनलाइन संकेतस्थळावर अथवा प्रत्यक्ष अर्ज करावा.

  • आधार कार्ड आवश्‍यक.

  • राज्याचे अधिवास प्रमाणपत्र अथवा राज्यातील जन्म दाखला.

  • बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.

  • पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशनकार्ड.

  • योजनेच्या अटी-शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.

  • अर्ज दाखल करताना अर्जदार महिला प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्‍यक.

अर्ज भरण्याची सुविधा:
  • अंगणवाडी केंद्रे

  • बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये

  • ग्रामपंचायत कार्यालये

  • महापालिकेचे वॉर्ड (झोन) ऑफिस

  • सेतू सुविधा केंद्र व महा ई सेवा केंद्रे

हेल्पलाइन टोल फ्री संपर्क क्रमांक : १८१ (महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र)

खालील लाडकी बहीण योजनेच्या संबंधित महत्वपूर्ण लेख वाचा !
  1. लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यामध्ये आले नाही तर हे काम करा !
  2. मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना : रद्द झालेले अर्ज, दुरुस्तीसह पुन्हा दाखल करण्याचे आवाहन, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया !
  3. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादी मध्ये नाव नसेल तर अर्जाचे स्टेट्स ऑनलाईन चेक करा !
  4. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजेनेची लाभार्थी यादी ऑनलाईन पाहण्याची प्रोसेस!
  5. मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना; असा भरा वेबपोर्टल वरून ऑनलाईन अर्ज !
  6. लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ वितरणाचा दुसरा टप्पा सुरु !
महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय :
  1. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढविणेबाबत (अर्ज करण्यास मुदत वाढ – Ladki Bahin Yojana Arj Karnyas Mudat Vad) शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
  2. महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण – CM Majhi Ladki Bahin Yojana योजना सुरु करण्यास मान्यता देण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
  3. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेतील सुधारणाबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
  4. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढविणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!
शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.