वृत्त विशेषस्पर्धा परीक्षा

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु – Std. 11th Centralised Online Admission Process 2021-22

सन. 2021-22 मध्ये इ. 11 वी प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा CET लागू करण्यात आलेली होती. शासन निर्णय दि. 11/08/2021 अन्वये सदर सामाईक प्रवेश परीक्षा CET रद्द करण्यात आलेली आहे. तसेच रिट याचिका क्र. 1413/2021 मध्ये मा.उच्च न्यायालय मुंबई यांचे इ. 11 वी ची केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु करण्याबाबत निर्देश आहेत. त्यानुसार राज्यातील इ. 11 वी प्रवेशाची कार्यवाही सुरु केली आहे.

सन. २०२१-२२ मध्ये राज्यातील, मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे, पिंपरी चिंचवड तसेच नागपूर, नाशिक, व अमरावती या पाच मनपा क्षेत्रातील इ. ११ वी चे सर्व प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पद्धतीने करण्यात येणार आहेत. सदर ५ ठिकाणच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक यासोबत संलग्न आहे. उक्त पाच क्षेत्र वगळता उर्वरित महाराष्ट्रातील प्रवेश स्थानिक परिस्थितीनुसार प्रचलित पद्धतीने केले जातील. त्याबाबत संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी सविस्तर सूचना निर्गमित करतील.

मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे, पिंपरी चिंचवड तसेच नागपूर, नाशिक, व अमरावती या पाच मनपा क्षेत्रातील इ. ११ वी प्रवेशाबाबत यापूर्वी वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले होते. न्यायालयीन आदेशानुसार प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करणेसाठी सदर वेळापत्रकामध्ये बदल करुन विद्यार्थ्यांसाठी संकेतस्थळावर प्रत्यक्ष अर्ज भरण्याची सुविधा दि. 14 ऑगस्ट, 2021 पासून सुरु करण्यात येत आहे. दि. 23/07/2021 रोजीच्या परिपत्रकानुसार देण्यात आलेल्या इतर सूचना कायम राहतील.

ऑनलाईन अर्ज भरणे, विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविणे, पसंतीक्रम देणे, प्रवेश फेरीमध्ये मिळालेल्या विद्यालयात प्रवेश निश्चित करणे याबाबत (पहिल्या फेरीसाठी) तपशील वेळापत्रकामध्ये देण्यात आलेला आहे. दिलेल्या वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रियेची कार्यवाही वेळेत केली जाईल याची दक्षता घ्यावी. यापूढील प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल. याबाबत सर्व संबंधित घटकांना अवगत करावे, व्यापक प्रसिद्धी देण्यात यावी.

अकरावी प्रवेशासाठीच्या संकेतस्थळाचे उद्घाटन शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या हस्ते दि.१४ रोजी करण्यात आले. अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी शालेय शिक्षण विभाग सज्ज असल्याची ग्वाही यावेळी देण्यात आली. बृहन्मुंबई क्षेत्र, ठाणे, पुणे, नागपूर, अमरावती आणि नाशिक शहरातील सुमारे साडेपाच लाख जागांसाठी ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. इतर ग्रामीण भागांत प्रचलित पद्धतीने प्रवेश देण्यात येणार आहेत. पहिल्या फेरीची सुरूवात दि. १४ ऑगस्ट पासून सुरु असून २२ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांनी नोंदणी करायची आहे.  दि. १७ ते २२ ऑगस्ट या दरम्यान सिट ची उपलब्धता बघता येईल त्याचप्रमाणे प्राधान्यक्रम भरता येणार आहे.  दि. २३ ते २५ ऑगस्ट दरम्यान मेरिट लिस्ट लागेल.  दि. २७ ते ३० ऑगस्ट दरम्यान महाविद्यालयात प्रवेश घेता येणार आहे.

 • पहिल्या फेरीची सुरूवात 14 ऑगस्ट.
 • दुसऱ्या फेरीची प्रक्रिया दि. ३१ ऑगस्ट.
 • तिसरी फेरी दि. ५ सप्टेंबर.
 • चौथी फेरी दि. १२ सप्टेंबर.

विद्यार्थ्यांना https://11thadmission.org.in या संकेतस्थळावर जाऊन प्रवेश घेता येणार आहे.

 • वेबसाईट ओपन झाल्यानंतर अर्ज करण्यासाठी प्रदेश (Region) निवडा.
Choose region to Apply
Choose region to Apply

Student Registration (विद्यार्थी नोंदणी):

आपला प्रदेश (Region) निवडल्यानंतर “Student Registration” वर क्लिक करा.

Student Registration
Student Registration

नोंदणी करताना खालील तपशील भरून Register वर क्लिक करा, नोंदणी केल्यानंतर तुम्हला लॉगिन आयडी मिळेल तो सेव्ह करून ठेवा.

 • Applicant’s 10th School Area – अर्जदाराची 10 वी शाळा क्षेत्र
 • Applicant’s Status – अर्जदाराची स्थिती
 • 10th Standard or Equivalent Examination Board – दहावी किंवा समकक्ष परीक्षा मंडळ
 • Applicant’s Contact Details – अर्जदाराचे संपर्क तपशील
 • Mobile Number – मोबाईल नंबर
 • Password Details – पासवर्ड तपशील

Login:

विद्यार्थी नोंदणी झाल्यानंतर, Proceed to Login क्लिक करा किंवा पुन्हा वेबसाईटच्या मुख्य पृष्ठावर या आणि “Login” बटन वर क्लिक करा.

लॉगिन करा
Login

आता इथे लॉगिन करण्यासाठी लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.

Login
Login

लॉगिन झाल्यानंतर अप्लिकेश फॉर्म भरून प्रिंट काढायची आहे.

लॉग इन करण्यात अडचण येत आहे?

आपण जर लॉगिन पासवर्ड किंवा अर्ज फॉर्म क्रमांक विसरला असेल तर खालील लिंक वर क्लिक करून परत मिळवा. जर तुमचा मोबाईल नंबर बदलला असेल तर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा.

https://pune.11thadmission.org.in/AccountRecovery/AccountRecovery.aspx

हेल्पलाईन संपर्काची माहिती:

ईमेल: [email protected]

फोन नं.: 9823009841

हेही वाचा – २०२१-२२ शैक्षणिक वर्षासाठी १५ टक्के फी कपात करण्याचा शासन निर्णय जाहीर

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.